Ravindra Kadus

Ravindra Kadus

Share

One person can make a difference, and everyone should try.

18/02/2023
Photos from ICC - International Cricket Council's post 29/01/2023
26/01/2023

तमाम देशवासियांना 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा! यानिमित्तानं भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे.
हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत विचारधारा पुढे नेण्याचा संकल्प करुया. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता अखंडता, सार्वभौमता आबाधित ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या ज्ञात-अज्ञात शहीद वीरांना विनम्र अभिवादन!

Photos from Ravindra Kadus's post 24/01/2023

सारोळा कासारच्या शिवेजवळ सुरु असलेले अनधिकृत ढाबे व दारूविक्री त्वरीत बंद व्हावी यासाठी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. राकेशजी ओला साहेब यांना सरपंच सौ. आरतीताई कडूस व मा. श्री. रविंद्र कडूस यांनी निवेदन दिले.

15/01/2023

नायलॉनचा मांजा जीवघेणा असून, या मांजाने एका महिलेचा गळा चिरून मृत्यूही झाला आहे. ग्रामीण परिसरात अनेक पक्षीदेखील या मांजामुळे जखमी झाले आहेत. काही जण पतंग उडविताना घातक नायलॉन मांजा वापरतात. नायलॉन मांजामुळे माणसे जखमी होण्याच्या घटना वाढल्यामुळे या मांजाविरोधात जनजागृती होणे, ही तातडीची गरज आहे. या मांजाचे दुष्परिणाम सांगून तो स्वतः वापरू नये, इतरांनाही वापरण्यापासून प्रवृत्त करण्याचे आवाहन मी करतो.

#ऑपरेशन_परिवर्तन #अहमदनगर

15/01/2023

महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेल्या पैलवान शिवराज राक्षे याचं मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

#महाराष्ट्र #केसरी

15/01/2023

सर्वांना मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं नाते संबंधांतील स्नेह - गोडवा वाढावा, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश, आर्थिक भरभराट व्हावी हीच सदिच्छा!

12/01/2023

स्वराज्य आणि सुराज्य निर्मितीसाठी मातृत्वाच्या छायेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या कर्तव्यदक्ष वीरमाता,
संयम व धैर्याची मूर्ती, स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन! मानाचा मुजरा!

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Sarola Kasar
Ahmednagar
414005