Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shankarrao Ghule, Ahmednagar.
* अध्यक्ष - हमाल माथाडी श्रमिक विकास संस्था
* अध्यक्ष -जिल्हा तीन चाकी टेम्पो पंचायत
* अध्यक्ष -सर्व धर्मिय शांतता परिषद, अहमदनगर
* विशवस्त- रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती ,अहमदनगर
* सचिव - श्री.स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्था
* अध्यक्ष - अहमदनगर जि.कामगार ,कष्टकरी,शेतकरी संघटना फेडरेशन
* कार्याध्यक्ष- जिल्हा तालिम संघ
* कार्याध्यक्ष- अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक कामगार संघटना
* उपाध्यक्ष- अहमदनगर जिल्हा हॉकी असोसिएशन
* उपाध्यक्ष- अहमदनगर जिल्हा अम्युचर्स अथलेटिक्स असोसिएशन
* उपाध्यक्ष- अहमदनगर जिल्हा बडमिन्टन असो.
* माझी चेअरमन- शहर सहकारी बँक ,अहमदनगर
* माजी अध्यक्ष - संजय गांधी निराधार स्वावलंबन योजना समिती
* अध्यक्ष- अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायत
शंकरराव घुले पहिलवान होते, लढवय्ये होते,श्रमजीवनाचे आधारस्तंभ होते,गोरगरीब असंघटीत कष्टकऱ्यांचे पाठीराखे होते ,कुशल संघटक आणि धुरीण होते, तेवढेच अण्णा रसिक वाचक, कलाप्रेमी , डोळस श्रद्धावंत, साहित्योपासक आणि कला,क्रीडा ,साहित्य,संस्कृती या क्षेत्रातले एक समजंस ,जबाबदार आणि सहृदयी कार्यकर्ते होते.
सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्य:
१. सन १९८१ पासून अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष .अहमदनगर जिल्हयातील कष्टकरी हमाल कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांचे जीवनात स्थेर्य प्राप्त झाले. अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्या माध्यमातून कष्टाची भाकर केंद्र , श्रमिक बाजार किराणा माल विक्री केंद्र , कापड विक्री केंद्र , भांडी भांडार , श्रमिक हॉस्पिटल , अहमदनगर जिल्हा माथाडी कामगारांची पतसंस्था यासारखे समाजिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीरित्या चालवीत आहे .
२.व्यसनमुक्तीसाठी व्याख्याने : कलापथके या कार्यक्रमाचे आयोजन करुन व्यसनमुक्त समाज निर्मितीचे कार्यात सहभाग . व्यसनमुक्त समज कार्यास व्यसनमुक्त पहात अभियानामध्ये ,महाराष्ट्र राज्यपाल मा .पी .सी. अलेक्झान्दर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
३. बंधुता प्रतिष्ठान पुणे यांनी ३०/९/२००१ रोजी समाजिक जाणिव पुरस्कार देऊन गौरविले आहे.
४. डिसेंबर २००१: हमाल संघटना , पतपेढी, ग्राहक भांडार, आरोग्यसेवा याद्वारे सामान्य ग्राहकाची सेवा करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती ग्राहक सेवा महासंघाचा ग्राहक सेवा गौरव पुरस्कार.
५. महाराष्ट्र शासनाचे माथाडी सल्लगार समितीवर सदस्य म्हाणून नियुक्ति.
६. महाराष्ट्र राज्य हमाल महामंडळ सल्लागार म्हाणून राज्यभर हमाल कष्टकरी यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी डॉ .बाबा आढाव यांचे समवेत कार्य
राजकिय क्षेत्रातील कार्य :
१. अहमदनगर नगरपरिषद सलग २५ वर्षे नगरसेवक
२.अहमदनगर नगरपरिषद, नगराध्यक्ष १९८५ ते १९९१
नगराध्यक्ष असतांना केलेली महत्त्वाची कामे :
१. नगर शहरास पाणीपुरवठा करणारी तिसरी पाईपलाईन योजना कार्यान्वित केली .
२. नगर शहरात दुष्काळी परिस्थितीत ठिकठिकाणी विंधन विहिर घेऊन पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न .
३.प्रसारमाध्यम , आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र नगरमध्ये सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करून नगरपालिकेची जागा देऊन आकाशवाणी दूरदर्शन केंद्र नगरमध्ये आणण्यात यश.
४.दुष्काळी परिस्थितीत ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचे मुक्या जनावरांकरिता गुरांची छावणी उघडून मुक्या जनावरांना जीवनदान दिले.
५.नगर शहरात विक्रीस येणाऱ्या फळे, भाजीपाला या नाशवंत वस्तूंवरील जकात माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय.
६.नगर शहरातील छोटे व्यावसायिकांसाठी ठिकठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करणयात आले.
७.जुना दाणे डबरा , माळीवाडा ,भोसले आखाडा भागात नगरपरिषदेचे रुग्णालय सुरु केले .
८.बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी स्थापन.
९.वादियापर्क स्टेडीयम चा दूसरा टप्पा उभारणी.
१०.डॉ .बाबासाहेब आंबेडकर , रावसाहेब पटवर्धन स्मारक उभारणी.
११.राज्यस्तरीय खो- खो , कबड्डी , अथेलेटिकंस , फुटबॉल स्पर्धेचे आयोजन .
१२.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन.
१३.अहमदनगर शहर सहकारी बँकेचे चेअरमन व संचालक म्हाणून यशस्वी कामकाज .
१४.सन 1995 साली नगर शहर विधानसभा निवडणूक लढविली .
१५.राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रांतीक सदस्य म्हाणून काम पाहिले .
१६..पारनेर भूषण पुरस्कार प्राप्त .
१७.तसेच विविध संस्था संघटनांच्यावतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे