युवक क्रांती दल राशीन

युवक क्रांती दल राशीन

Share

हर जोर जुल्म कि टक्कर मे संघर्ष हमारा ?

युक्रांदची मुख्य तत्त्वे:
१) जातिसंस्थेचा कडवा विरोध
२) स्त्रीचा आदर
३) आदिन्य दान स्वीकारण्यास नकार
४) लढाऊ अहिंसेचा अवलंब
५) सामान्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष

22/04/2021

*डॉ. आरोळेंच्या निःस्पृह रुग्णसेवेला झेप फौंडेशनचा युक्रांदीय सलाम....✊🏽✊🏽✊🏽*

भाजीपाला आणि किराणा साहित्याची मदत सूपूर्द.

रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे यांनी सुरू केलेला जामखेड (अहमदनगर जिल्हा) येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प आज चर्चेत आहे. सध्या डॉ. आरोळे यांचा मुलगा डॉ. रवी आरोळे आणि मुलगी डॉ. शोभा आरोळे हे या आरोग्य प्रकल्पाचं काम बघतात. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आरोळे दाम्पत्य कोरोना चाचणीपासून ते रुग्णांवरील उपचारापर्यंत स्वतः लक्ष घालून काम पाहत आहेत. सद्यस्थितीत 'आरोळे पॅटर्न' हा चर्चेचा विषय आहे. राज्यात रेमडिसिविर आणि इतर औषधांचा तुटवडा आहे. मात्र आरोळे दाम्पत्याने आहे त्या साधनांचा सुयोग्य वापर करून रुग्ण बरे केले आहेत. कुठल्याही रुग्णांच्यामागे रेमडीसीवीर औषध घेऊनच या असा तगादा लावला नाही. कोविड सेंटरमधून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

'युवक क्रांती दल' आणि 'झेप फाउंडेशन' यांच्यावतीने आज आरोळे रुग्णालयाला बटाटे, कांदे, कोबी, फ्लावर, चणाडाळ, तांदूळ, भेंडी, भोपळा, शेवगा, गवार असा आवश्यक भाजीपाला आणि धान्य देण्यात आले. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, राशीन शहर अध्यक्ष विनोद सोनवणे, जामखेड मेडिकल असोसिएशनचे सचिन जाधव, प्रा. तुकाराम घोगरदरे, विनीत पंडित, विजय घोलप, अशोक नेमाने, अक्षय सोनवणे, विशाल रेडे, माऊली राळेभात, विवेक शिंदे उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी मिनीनाथ दंडवते आणि डॉ. शोभा आरोळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांचे कौतुक केले. या कार्यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन युवक क्रांती दलाने केले आहे.

Photos from युवक क्रांती दल राशीन's post 24/03/2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे online परीक्षांमुळे होणारा गोंधळ कायम आहे. online परीक्षांमुळे विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासंदर्भात विद्यापीठाने अजून गोंधळ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी बाजू युवक क्रांती दलाचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसमोर मांडली .

Photos from युवक क्रांती दल राशीन's post 26/02/2021
Photos from युवक क्रांती दल राशीन's post 07/11/2020

हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा- युक्रांद

29/10/2020

दुरगावच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या छेडछाडीच्या घटनेबाबत युवक क्रांती दलाने कुटुंबीयांची भेट घेतली. आधार दिला. पाठपुराव्यानंतर आरोपीला अटक झाली. पुढील कार्यवाही बाबत पोलिसांनी योग्य तपासाचे आश्वासन दिले आहे.

19/06/2020

युवक क्रांती दल महाराष्ट्र
आयोजित

विषय - विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा गोंधळ

वक्ते - कमलाकर शेटे
( उपाध्यक्ष - पुणे शहर , युक्रांद )

शनिवार दि. २० जून २०२०
वेळ : सायं ७.०० वा.

फेसबुक लिंक :
fb.me/yukrandofficial
ट्वीटर -
इंस्टाग्राम - yukrandofficial

संपर्क :
सचिन पांडुळे
9096313022
कमलाकर शेटे
7709779977

30/05/2020

गैरकारभार केल्याप्रकरणी खेडच्या रेशन दुकानदाराची अनामत रक्कम जप्त.
कर्जत महसूल विभागाची कारवाई; युक्रांदच्या तक्रारीची घेतली दखल

26/05/2020

'युवक क्रांती दल' आयोजित
#लॉकडाऊनसिरीज

विषय : कोरोनाने आपल्याला काय शिकवलं?

वक्ते : डॉ. संग्राम पाटील
(Anaesthetist, England)

बुधवार दि. २७ मे २०२०
वेळ : सायं ७.०० वा.

फेसबुक लिंक: fb.me/yukrandofficial

संपर्क :
सचिन पांडुळे
9096313022
कमलाकर शेटे
7709779977

26/05/2020

नक्की पहा🙏

25/05/2020

'युवक क्रांती दल' आयोजित
#लॉकडाऊनसिरीज

विषय : धार्मिक ध्रुवीकरण आणि कोरोना संकट

वक्ते : अन्वर राजन
(जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सचिव महाराष्ट्र गांधी स्मारक निधी)

सोमवार दि. २५ मे २०२०
वेळ : सायं ७.०० वा.

फेसबुक लिंक : fb.me/yukrandofficial

संपर्क :
सचिन पांडुळे
9096313022
कमलाकर शेटे
7709779977

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


At Post-Rashin
Ahmednagar
414403