27/06/2019
#मांजरी येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांन👨⚕️ सोबत भेट.
अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या #सिंधुताई (माई) #सपकाळ यांच्या मांजरी बुद्रुक जि. #पुणे. येथील अनाथ आश्रमात, #सीड्स #मदर #राहीबाई सोमा पोपेरे यांच्या जीवन चरित्रावर पुस्तक लिहिणाऱ्या पुस्तिकेचे लेखक✍️ संदीप गायकर, सहलेखक विकास दळवी, अदिती गायकर, मयुरी दळवी यांनी भेट देऊन अनाथलयातील मुलांना बिस्कीट🍪 वाटप केले. अनाथलयातील ५० ते ६० विद्यार्थ्यांना लेखकांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि मुलासोबत संवाद साधून त्याचा रोजचा दिनक्रम व अभ्यासा बद्द्ल माहिती जाणून घेतली. यावेळी अनाथ आश्रमातील विद्यार्थी व शिक्षक👨💼 उपस्थित होते.
30/04/2019
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
29/04/2019
अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी भागातील कोंभाळणे येथील ‘सीड मदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांचा बीबीसीच्या १०० प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश झाला आहे. त्यांच्याकडे सुमारे ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुध्द पध्दतीने जतन केलेले आहेत. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी यापूर्वी त्यांना कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
18/04/2019
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचा महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेला गौरव आणि त्यांना मिळालेला ‘नारीशक्ती’ सन्मान ही त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न करत आहे.
11/04/2019
पारंपरिक बियाणांचे संवर्धन करणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे (सीड्स मदर)🎋 यांच्या बियाण्यांना जगभरातून मागणी येत आहे. आणि याच कामसाठी आता त्यांना इतर महिला👩 ही हातभार लावत आहे. राहीबाई वीस वर्षांपासून पारंपारिक बियाणे संवर्धनाचे काम करत आहे. आज तीन हजार महिलांसोबत काम👩🌾 करत आहे. बियाणे बँकेच्या माध्यमातून पारंपारिक बियाणांच्या संवर्धनासोबतच पारंपरिक बियाणांचा प्रचार व प्रसार व्हावा हीच राहीबाई यांची इच्छा आहे.😀
04/04/2019
सीड्स मदर राहीबाई सोमा पोपेरे यांच्या "जीवन प्रवास" हे पुस्तक रुपी जगा समोर आणणाऱ्या युवकाचा वॉव्वइन्फोटेक तर्फे सन्मान सोहळा.
स्थळ:- वॉव्वइन्फोटेक नूतन सायली सोसायटी क्रोमा शोरूम कॉलेज रोड थत्तेनगर नाशिक-४२२००५
01/04/2019
Rahibai Soma Popere(seeds mother)🎋 is an Indian🇮🇳 farmer and conservationist. She helps other farmers👩🌾 return to native varieties of crops, preparing hyacinth beans for self-help groups. She developed a series of hyacinth beans for self-help groups and families in nearby villages. rahibai Popere is from Kombhalne village located in Akole block of Ahmednagar district in the state of Maharashtra
Rahibai popere (seeds mother) winning Awards and Recognition
• BBC 100 Women 2018
• The Best Seed Saver award
• BAIF Development Research Foundation Best Farmer Award
• Nari Shakti Puraskar, 2018, instituted by the Ministry of Women and Child Development, Government of India😀.
30/03/2019
अहमदनगर जिह्यातील कोंभाळणे गावातील बीजमता🎋 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीड्स मदर राहीबाई सोमा पोपेरे यांना त्याच्या बियांच्या बँकेला नवे घर मिळाले आहे. कोभाळने गावात त्याच्या बियाण्यांच्या बँकेच्या घराचे🏠 लोकार्पण सोहळा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालक मंत्री राम शिंदे याच्या हस्ते सोहळा🎀 पार पडला.😀 #राहीबाईसोमापोपेरे #राहीबाईपोपेरे #सीड्समदर
28/03/2019
राहीबाई जीवन प्रवास..🚶♀️
सीड्स मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे ह्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रासायनिक आणि हायब्रीड शेतीमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्यांवर केलेली विषमुक्त शेती🎋 व सेंद्रिय शेती ह्या कार्याची सुरुवात केली. आणि म्हणून त्यांचा जीवन प्रवास लोकांपर्यंत पोहोचावा या संकल्पनेतुन "राहीबाई जीवन प्रवास" या पुस्तिकेचे📚 लेखक✍️ संदीप गायकर, सहलेखक विकास दळवी आणि माहीती संग्रहक अदिती गायकर व मयुरी दळवी यांचा मोलाचा वाटा आहे.