28/11/2021
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या प्रेरणेतून , आपले सरकार सेवा केंद्र बुऱ्हाणनगर व अंत्योदय अंत्योदय प्रतिष्ठान भिंगार यांच्या संयुक्त प्रयत्नातून असंघटित कामगारांसाठी सुरू झालेल्या इ- श्रम योजनेच्या नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे रेल्वे स्टेशन रोड अहमदनगर येथे उद्घाटन करण्यात आले
या वेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे , कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर चे उपाध्यक्ष श्री वसंत राठोड, भाजपा युवा वॉरियर्स चे विशाल खैरे व सर्व भाजपा स्टेशन रोड येथील कार्यकर्ते तसेच ई - श्रम चे लाभार्थी.
17/09/2021
आज शुक्रवार ता.17/09/2021
*आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी* यांच्या जन्मदिनानिमित्त, आपले सरकार सेवा केंद्र बुरहाणनगर व भाजपा भिंगार मंडलातर्फे *केंद्र सरकारच्या "ई श्रम योजनेंतर्गत"* भिंगार शहरातील सर्व स्तरातील कामगारांना
*"श्रमिक कार्ड "*
नोंदणी व वितरण करण्याचा शुभारंभ
*माननीय शहरजिल्हाअध्यक्ष श्री महेंद्र ऊर्फ भैय्या गंधे* यांच्या शुभहस्ते सकाळी 11.30 वाजता अंत्योदय प्रतिष्ठान सरपण गल्ली भिंगार येथे करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित संघटन सरचिटणीस श्री विवेक नाईक,सरचिटणीस श्री तुषार पोटे,श्री.शशांक कुलकर्णी,भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री महेशजी तवले, भिंगार शहर अध्यक्ष वसंत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते....
23/05/2021
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये अनुदानाचे फॉर्म भरणे सुरू आहे .
17/12/2020
आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा लाभ घेत आपल्या धंद्यात प्रगती श्री हेमंत जगथने रा.भिंगार .........PmSvanidhi कॅम्पचे आपले सरकार सेवा केंद्र बुऱ्हाणनगर व भिंगार भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले होते ज्यात आजतागायत भिंगार शहरात 400 च्या वर लाभार्थ्यांणी 10 हजार कर्जाचा लाभ घेतला........
24/10/2020
आपले सरकार सेवा केंद्र , बुऱ्हाणनगर
कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर
आणि भाजपा भिंगार शहर यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबविण्यात येत आहे . यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे सर्व पथविक्रेत्यांना शिफारस पत्र वाटप. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 23/10/2020 रोजी मा. खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते झाला.
02/10/2020
*भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३७१ जागा*
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
*विविध पदांच्या एकूण १३७१ जागा*
पोस्टमन पदाच्या १०२९ जागा, मेलगार्ड पदाच्या १५ जागा आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या ३२७ जागा
*शैक्षणिक पात्रता* – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी/ बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
*वेतनश्रेणी* – उमेदवाराला प्रतिमाह १८,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये मानधन मिळेल.
*अर्ज करण्याची शेवटची तारीख* – दिनांक ३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
*हा मेसेज आपल्या Whatsapp ग्रूप मध्ये शेअर करा.*
*संपर्क :- आपले सरकार सेवा केंद्र , ADCC बँकेसमोर , बुऱ्हाणनगर*
*8668736635*
*सर्व प्रकारचे ऑनलाईन/ऑफलाईन कामे काळजीपूर्वक व खात्रीशीर केले जातील*
02/10/2020
सर्व शेतकरी बांधवांना खुशखबर आपण आतुरतेने वाट बघत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण शासकीय योजनांचा शुभारंभ झालेला आहे या योजनेमध्ये
*फलोत्पादन योजना अंतर्गत*
👉 कांदा चाळ
👉 पॅक हाऊस
👉जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
👉फळबागांना आकार देणे
👉 फळबाग लागवड
👉 मधुमक्षिकापालन
👉 हरितगृह
👉शेडनेट हाऊस
👉प्लास्टिक मल्चिंग
तसेच
*भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत*
👉 आंबा लागवड
👉डाळिंब लागवड
👉मोसंबी लागवड
👉पेरू लागवड
👉सिताफळ लागवड
👉तसेच इतर फळबाग लागवड योजना
👉शेततळ्यातील पन्नी
👉 सामायिक शेततळे
तसेच
*कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत*
👉ट्रॅक्टर
👉 ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे
👉प्रक्रिया संच
👉पावर टिलर
👉बैलचलित अवजारे
👉 मनुष्य अवजारे
👉स्वयंचलित अवजारे
👉 कल्टीवेटर
👉कापणी यंत्र
👉नांगर
👉पेरणी यंत्र
👉मल्चिंग यंत्र
👉मळणी यंत्र
👉रोटावेटर
👉 वखर
वरील योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे
👉सातबारा
👉8अ
👉आधार कार्ड
👉पासबुक
👉कास्ट सर्टिफिकेट (फक्त एससी-एसटी साठी)
*वरील योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी
🖥 *आपले सरकार सेवा केंद्र* 🖥
*ADCC बँकेसमोर , बुऱ्हाणनगर.*
📱 *मो. 8668736635*
♻ *आपले सरकार सेवा केंद्र*
♻ *शासकीय नोकरी अपडेट्स*
♻ *१ दिवसात नवीन पॅनकार्ड काढून मिळेल*
♻ *सर्व प्रकारचे ऑनलाईन/ऑफलाईन कामे खात्रीशीर केले जातील*
🏷🏷🏷🏷🏷🏷🏷🏷🏷
18/09/2020
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या नोंदणी केंद्राचे उदघाटन( भाजपा भिंगार शहर , व सीएससी बुऱ्हाणनगर)
भारत सरकार ने घोषणा केलेल्या आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी योजना ज्यामध्ये पथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध होते. या योजनेचा भिंगार मधील पथ विक्रेत्यांना लाभ व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टी भिंगार शहर व आपले सरकार सेवा केंद्र बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त माध्यमातून PMSvanidhi योजनेच्या केंद्राचे आज उदघाटन करण्यात आले.
उदघाटन प्रसंगी भाजपा जिल्हा शहर अध्यक्ष भैय्या गंधे, भिंगार शहर अध्यक्ष वसंत राठोड, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, उपाध्यक्ष शहर शिवाजी दहीहंडे, वसंत लोढा , नगरसेविका शुभांगी साठे,सरचिटणीस महेश नामदे, किशोर कटोरे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्राचे उदघाटन भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र भिंगार शाखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी योजनेचा बँक ऑफ महाराष्ट्र कडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊ असे नमूद केले. केंद्रावर सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण याचे संपूर्णतः सोय असून जे पथविक्रेते भिंगार शहर हद्दीत व्यवसाय करत आहेत त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा....
आपले सरकार सेवा केंद्र ,
बुऱ्हाणनगर