Umedbook Ahilyanagar

Umedbook Ahilyanagar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Umedbook Ahilyanagar, Government Organization, Ahmednagar.

A dedicated and sensitive organisation which creates an empowering environment for poor and vulnerable households of rural Maharashtra through sustainable livelihoods, leading to a life of prosperity, dignity and security.

04/02/2026

अहिल्यानगरमध्ये ५ फेब्रुवारीपासून " साईज्योती सरस" सुरू होत आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शन व बरंच काही एकाच ठिकाणी !

​जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे शेतकरी बांधवांना खास आवाहन— आपल्या प्रगतीसाठी या महोत्सवाला कुटुंबासह नक्की भेट द्या.

🧾कधी : ५ फेब्रुवारी २०२६ पासून
📍 कुठे : नेमाने इस्टेट, केडगाव रोड, अहिल्यानगर

​ #शेती #अहिल्यानगर

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/02/2026

महिला शेतकरी उत्पादक कंपन्यातून स्वावलंबनाची नवी पहाट
उमेद अभियानातून महिला शेतकऱ्यांची क्रांती

अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विविध उपक्रमाची सुरुवात होत असून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे. शासनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरामध्ये महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करण्यात अभियानाला यश येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला शेतकरी संघटित होत असून भविष्यातील शेती संबंधातील विविध आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ संदर्भातील मूल्यसाखळी विकास करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या महत्वाची भूमिका ठरणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART - स्मार्ट) प्रकल्प हा महाराष्ट्रातील शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणणारा जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्प आहे. याचा मुख्य उद्देश लहान व सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी मूल्य साखळी विकसित करणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) सक्षम करून त्यांना बाजाराशी थेट जोडणे आहे. या स्मार्ट अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ०५ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सुधमूर्ती महिला शेतकरी उत्पादक कंपनी आणि कान्होपात्रा महिला शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र तसेच आटा मेकिंग करण्यात येणार आहे. तसेच नगर तालुक्यातील वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कांदा साठवणूक गोदामांची उभारणी करण्यात येत आहे. राहुरी येथील आयरागोल्ड महिला शेतकरी उत्पादक कंपनी व कोपरगाव तालुक्यातील सरोवर महिला शेतकरी उत्पादक कंपनीतून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र व डाळ मिल उपक्रम उभारण्याची सुरुवात होत आहे.
या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत ६० टक्के अनुदान प्राप्त झाले असून सर्व प्रकल्पांना रक्कम रुपये २ कोटी पेक्षा अधिक अनुदान टप्प्या टप्प्याने प्राप्त होणार आहे. ४० टक्के निधी हा महिला शेतकऱ्यांनी उभारला आहे. या कंपनीच्या माध्यमातून ३००० पेक्षा अधिक महिला शेतकरी संघटित झालेले आहेत. जिल्ह्यातील महिला या माध्यमातून जिल्हाभरामध्ये स्मार्ट प्रकल्प कामे केली जाणार असून यामधून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संघटित शेती करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यातून शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे.
मा. पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी 10K (दहा हजार) शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून ०४ शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आली असून यातील कोपरगाव तालुक्यात कौशल्या ॲग्रो महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी, शेवगाव तालुक्यात स्मृतिमंथन महिला शेतकरी उत्पादक कंपनी, कर्जत तालुक्यात शेतीसंजोग महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी आणि नेवासा तालुक्यात मातीस्पर्श महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनीच्या स्थापना करण्यात आलेल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी कृषी सेवा केंद्रांची सुरुवात झाली असून या कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून सवलतीच्या दरामध्ये कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य
• महिला शेतकरी उत्पादित शेतीमालाचे सामूहिक संकलन
• दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके व कृषी निविष्ठांची सामूहिक खरेदी
• शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारणे. (डाळ मिल, आटा मेकिंग)
• ब्रंडिंग व पॅकेजिंगद्वारे बाजार मूल्य वाढविणे.
• स्थानिक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बाजारपेठेंची थेट जोडणी करणे.
• शासकीय योजना, कर्ज व अनुदान मिळवण्यासाठी समन्वय करणे.
• महिलांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास व आर्थिक साक्षरता कार्यक्रम
• स्वयंसहायता गट व महिला शेतकऱ्यांना नेतृत्व व निर्णय क्षमतेची संधी

उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ०९ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हाभरातील महिला शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. मूल्य साखळीचे निर्माण करणे यासारख्या उपक्रमातून ग्रामीण शेतकऱ्यांना मोठ्या संधी कंपनीच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने उमेद अभियानाने सुरू केलेल्या या शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका निभावतील यात शंका नाही.
आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर

Photos from Umedbook Ahilyanagar's post 30/01/2026

आज तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, नेवासा अंतर्गत सर्व उमेद कर्मचारी व सर्व समुदाय संसाधन व्यक्ति यांची आढावा बैठक मा. प्रकल्प संचालक तथा अभियान सहसंचालक श्रीम. मंजुषा ठवरकर मॅडम, गटविकास अधिकारी, श्री संजय लखवाल साहेब, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री सोमनाथ जगताप सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला .

तसेच तालुक्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपनी ने सुरू केलेल्या कृषि सेवा केंद्रास भेट देण्यात आली.

08/01/2026

"चला हवा येऊ द्या" फेम, विनोदाचा बादशहा मा. श्री. भाऊ कदम (चित्रपट अभिनेते) यांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारा दुमाला येथे राबविलेल्या विविध उपक्रम पहाणी केली.

या प्रसंगी मा.श्री.दादाभाऊ गुंजाळ साहेब (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं.) जिल्हा परिषद अहिल्यानगर, मा.श्री.प्रवीणजी सिनारे साहेब (गटविकास अधिकारी उ.श्रे.)पंचायत समिती संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अंतर्गत कार्यरत रुक्मिणी महिला स्वयंसहायता समूहास भेट देऊन त्यांच्या उद्योग व्यवसायाची माहिती घेतली.

यावेळी उपस्थित उमेद संगमनेर टीम व स्वयंसहायता समूहातील महिला.

Photos from Umedbook Ahilyanagar's post 07/01/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील उमेद अभियानातील बचत गटांचा कर्ज वितरण मेळावा व बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती श्रीगोंदा येथे आज दिनांक 5/1/ 2026 रोजी करण्यात आले यावेळी 12 बचत गटांना एकूण 1 कोटी 8 लक्ष बँक अर्थसाह्य वितरित करण्यात आले तसेच चार महिला बचत गटांनी आपल्या तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावले होते
या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे मा.आमदार श्री विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते बँक कर्जाचे चेक महिला बचत गटांना वितरिण व महिला बचत गटांनी लावलेल्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम मा गटविकास अधिकारी श्रीम. राणी फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अभियान कक्षातील कक्ष प्रमुख तथा विस्तार अधिकारी श्रीम. सारिका हराळ
तालुका अभियान व्यवस्थापक श्री निलेश वाघ तालुका व्यवस्थाक राहुल अडागळे, राहुल साळवे प्रभाग समन्वयक कृष्णा सरगर, दत्ता राखुंडे संदीप गाढवे यांनी केले

07/01/2026

(भाऊ कदम - अहिल्यानगर) -

लोकसहभागातून गावात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम येत आहेत थेट अहिल्यानगर जिल्ह्यात!
गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी अभिनेते भाऊ कदम दि. ७ जानेवारी २०२६ रोजी पुढील तालुक्यांना भेट देणार आहेत.

📍 रेनवडी, तालुका पारनेर
📍 कासार दुमाला, तालुका संगमनेर
📍 लोणी बु., तालुका राहता

या गावांमध्ये बदल घडवण्यासाठी तुमचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
म्हणूनच मोठ्या संख्येने उपस्थित राहा, या उपक्रमाचा भाग बना आणि तुमच्या गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढाकार घ्या!

Photos from Umedbook Ahilyanagar's post 05/01/2026

शेवगाव पंचायत समितीत 'उमेद अभियान' यांच्या वतीने एकल महिलांसाठी कार्यशाळा संपन्न

शेवगाव पंचायत समिती येथे उमेद अभियान यांच्या मार्फत एकल महिलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या कार्यशाळेस निमंत्रक प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शेवगाव तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात ५ हजारांहून अधिक एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात अ आहेत. कार्यशाळेत एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी, रोजगारनिर्मितीचे मार्ग, तसेच लघुउद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आपल्या जीवनातील संघर्ष, अडचणी आणि मेहनतीने उभे केलेले छोटे उद्योग याबाबत अनुभव कथन केले.

यावेळी उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप यांनी महिलांना स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.

प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी महिलांसाठी कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या व्यवसायांची कपड्यांची अशा सुमारे ५० व्यवसायांची माहिती देण्यात आली. माहिती दिली.

गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी एकल महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच श्रावणबाळ योजना, रेशन कार्ड आदी अडचणी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिले. यावेळी एकल महिलांनी त्यांच्या यशोगाथा सादर केल्या.

या कार्यक्रमास उमेश घेवरीकर, नितेश बनसोडे, गजानन शिंदे (महिला व बालविकास अधिकारी), तारामती दिवटे, प्रशांत शेळके, फिरोज सय्यद, हरिबा चांदगावे, राऊसाहेब भोरे, दिनेश काशिद, दीपक लोढे, विकास तुतारे, रुपाली झारखंड, कारभारी गरड, अमोल घोलप, प्रथमेश सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या.

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/01/2026

आज दि. 27/12/2025 रोजी मा. श्री. एकनाथ डवले साहेब, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील गावांना भेटी देऊन उमेद अभियानातील विविध उपक्रमांची पाहणी केली.

मुरशेत येथील सागवान बैलगाडी उपक्रम व गटांनी उभारलेल्या होम स्टे उपक्रम व मधाचे गाव, उमेद स्वाद कट्टा या ठिकाणी भेट देऊन नवीन होम स्टे संकल्पना बाबत माहिती घेऊन महिलांशी चर्चा केली.

लखपती दीदी उपक्रमाच्या अंतर्गत महिला बचत गटांशी संवाद साधला. तसेच शेंडी येथील घोरपडा माता महिला समूहाणे उभारलेल्या शिलाई प्रशिक्षण केंद्र व उद्योगास आणि बोटिंग व्यवसायास भेट दिली यावेळी उमेद अभियानातील राबविलेले विविध उपक्रमांचे कौतुक केले.

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/01/2026

आज मा. श्री. आनंद भंडारी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांनी पंचायत समिती, अहिल्यानगर (MSRLM) अंतर्गत निंबळक प्रभागातील अकोळनेर आणि चास येथे भेट देऊन लखपती दीदी आणि उमेद अभियानातील विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

लखपती दिदी रजिस्टर नोंदणी बाबत मार्गदर्शन केले. महिलांच्या विविध उद्योग व्यवसायांना भेट दिल्या. लखपती दिदी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून अभियानामुळे झालेले बदल याविषयी माहिती घेतली.

यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.सोमनाथ जगताप, श्री. ज्ञानेश्वर गव्हाणे DM, श्री. बाबासाहेब सरोदे BM/DMFI, श्री.वैभव धनवटे BMMIS, प्रभाग समन्वयक श्री.संदीप वाबळे व श्रीमती. सोनाली शिंदे, पंडित मॅडम, ग्रामसखी प्रेरीका (CRP ) ग्रामसखी पशु सखी/कृषी सखी,कृषी व्यवस्थपक,गट व ग्रामसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/01/2026

आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत ब्राम्हणी येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी साहेब यांनी भेट देऊन स्वतः श्रमदान मध्ये सहभाग घेऊन स्वच्छता केली.

उमेद तालुका कक्ष, पंचायत समिती राहुरी (MSRLM) अंतर्गत ब्राम्हणी प्रभागातील ब्राम्हणी गाव आणि सात्रळ प्रभागातील गणेगाव येथे भेट देऊन लखपती दीदी आणि ग्रामसंघास प्राप्त निधी बाबत आढावा घेतला.

लखपती दिदी रजिस्टर तपासणी करून महिलांच्या विविध उद्योग व्यवसायाबद्दल माहिती घेतली व लखपती दिदी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून अभियानामुळे त्यांच्या मध्ये काय बदल झाले याविषयी माहिती घेतली.

यावेळी श्री. मिलींद अडसुरे सर BMM, श्री. प्रविण गायकवाड सर BM- IBCB, प्रभाग समन्वयक श्री. अशोक खोमणे सर व सौ. राणी पगारे मॅडम, ग्रामसखी प्रेरीका (CRP ) ग्रामसखी कृषी सखी, गावातील स्वयं सहाय्यता समुहातील महिला सदस्य व ग्रामसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/01/2026

केंद्रीय कृषी तसेच ग्रामविकास मंत्री मा.श्री. शिवराजसिंह चौहान जी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात मा. मंत्री महोदयांच्या हस्ते शेती औजारांचे वितरण, शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सचे उद्घाटन करून महिला स्वयंसहायता गटांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

यासोबतच आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रात केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे, अशी ग्वाही देत लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंधारण तथा पालकमंत्री, अहिल्यानगर, जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी श्री. निखील ओसवाल यांच्यासह बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#अहिल्यानगर #कृषी_विज्ञान_केंद्र #अहिल्यानगर अभियान

Shivraj Singh Chouhan

Photos from Umedbook Ahilyanagar's post 03/01/2026

केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘विकसित भारत जी राम जी’ या योजनेतील नव्या तरतुदींची माहिती देण्यासाठी केंद्रीय कृषी तसेच ग्रामविकास मंत्री मा.श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेतून मंत्री महोदयांनी देशातील सुमारे २ लाख ८६ हजार ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून विकासाचे अधिकार थेट ग्रामसभांना देण्यात आले आहेत. रोजगारनिर्मितीला प्राधान्य देत गरीबीमुक्त गावे घडवण्याचा ठाम प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या "लखपती दीदी" योजनेच्या संदर्भात मा. मंत्री महोदयांनी माहिती दिली.

यावेळी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला ही ग्रामसभा घेण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री श्री. चौहान यांचे आभार मानले.

या ग्रामसभेस मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंधारण तथा पालकमंत्री, अहिल्यानगर, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, योजनेच्या केंद्रीय सहसचिव मा. रोहिणी भाजीभाकरे, राज्याचे सचिव श्री. गणेश पाटील, जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी, उमेद अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी श्री. निखील ओसवाल यांच्यासह बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#विकसित_भारत

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Ahmednagar

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm