वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत

Share

सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर

17/07/2026
15/07/2026

वंचित इम्पॅक्ट
नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

गोठीवली, नवी मुंबई : 17 जून 2026 रोजी सेक्टर 30 गोठीवली येथील बाळाराम अपार्टमेंट येथे स्पीड ब्रेकर नसल्याकारणाने एका महिलेची अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाली होती. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी तत्परता दाखवत संबंधित नवी मुंबई महानगपालिका अधिकाऱ्याशी संवाद साधून तत्काळ स्पीड ब्रेकर बनवण्यासाठी सांगण्यात आले होते . अपघात घडल्यानंतर 4 दिवसांनी स्पीड ब्रेकर बनवण्यात आले पण त्यावर पांढरे पट्ट्या मारण्यात आले नव्हते त्यामुळे सदर ठिकाणी अजून अपघात होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आज महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी पाऊस नसल्याने संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्याशी संवाद साधून सदर ठिकाणी आजच्या आज पांढरे पट्टे मारण्यात यावे अन्यथा वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन बसू असा इशारा देताच अवघ्या अर्ध्या तासात कामाला सुरुवात झाले आणि स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आले. त्यामुळे सदर ठिकाणातील नागरिक वंचित बहुजन आघाडीचे आभार मानत आहेत.

धन्यवाद नवी मुंबई महानगरपालिका 🙏

Photos from वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत's post 15/07/2026

वंचित इम्पॅक्ट
आदिवासीपाडा (रबाळे ) नवी मुंबई : आदिवासीपाडा रबाळे यथील सार्वजनिक शौचालय मोडकळीस आल्याची बातमी तेथील कार्यकर्त्याद्वारे मिळाली असता आम्ही वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्यावतीने सदर ठिकाणी भेट दिऊन त्याठिकाणची माहिती घेतली असता सार्वजनिक शौचालय मोडकळीस येऊन त्यावर धोकादायक झाडांचे फांदया वाढलेले दिसल्या आणि तेथील आदिवासी बांधव अंधारात जीवन जगत आहेत. ही बाब वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केल्यानंतर लगेच दुसऱ्यादिवशी कामाला सुरुवात करण्यात आले.

शौचालयाचे काम चालू झाले पण वीज आणि इतर मागण्याना घेऊन दिनांक 07/07/2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि आदिवासी पाडा येथील कार्यकर्तेसह घणसोली वार्ड ऑफिसर यांना निवेदन देण्यात आले आहे आणि यावर पाठपुरावा देखील करत आहोत तेदेखील पुढील काळात करून घेणार आहोत.

Photos from वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत's post 09/07/2026

वंचित इम्पॅक्ट
नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

गोठीवली, नवी मुंबई : 17 जून 2026 रोजी सेक्टर 30 गोठीवली येथील बाळाराम अपार्टमेंट येथे स्पीड ब्रेकर नसल्याकारणाने एका महिलेची अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाली होती. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप आणि महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी तत्परता दाखवत संबंधित नवी मुंबई महानगपालिका अधिकाऱ्याशी संवाद साधून तत्काळ स्पीड ब्रेकर बनवण्यासाठी सांगण्यात आले होते . अपघात घडल्यानंतर 4 दिवसांनी स्पीड ब्रेकर बनवण्यात आले पण त्यावर पांढरे पट्ट्या मारण्यात आले नव्हते त्यामुळे सदर ठिकाणी अजून अपघात होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आज महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी पाऊस नसल्याने संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्याशी संवाद साधून सदर ठिकाणी आजच्या आज पांढरे पट्टे मारण्यात यावे अन्यथा वॉर्ड ऑफिसमध्ये येऊन बसू असा इशारा देताच अवघ्या अर्ध्या तासात कामाला सुरुवात झाले आणि स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आले. त्यामुळे सदर ठिकाणातील नागरिक वंचित बहुजन आघाडीचे आभार मानत आहेत.

धन्यवाद नवी मुंबई महानगरपालिका 🙏

Photos from Prabuddh Bharat's post 08/07/2026
07/07/2026

रबाळे येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्यावतीने घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

घणसोली, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्यात आजही नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर (बीएमसी) दुसऱ्या क्रमांकाची, तसेच महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महानगरपालिका आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस आले असून त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

म्हणून श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हा आदिवासी पाडा येतो. मात्र, येथे आजही वीज नसून नागरिक अंधारात जीवन जगत आहेत आणि सार्वजनिक शौचालय मोडकळीस आलेली आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे .म्हणून आज दिनांक 07/07/2026 रोजी घणसोली विभागाचे सहायक आयुक्त यांना खालील मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे पुढील मागण्या आहेत 1) लायटीची व्यवस्था करणे 2)गटार नूतनिकारण करणे 3)परिसरातील कचरा नियमित उचलण्यात यावे 4) धोकादायक झाडांची फांदया छाटणे 5)पाण्याची टाकी नियमित साफ करणे 6) मोकळ्या जागेत ब्लॉक्स टाकणे 7)समाज मंदिर बांधून देणे या सर्व प्रश्नांकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने तत्काळ लक्ष टाकून पूर्ण करण्यात यावे ही नम्र विनंती करण्यात आले.

वरील मागण्या पूर्ण न झाल्यास घणसोली F वॉर्डवर आदिवासी बांधवांना घेऊन वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडणार...असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, गणेश चौधरी, आकाश निमसरकार,महेश महाला, अनिकेत जाधव आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Photos from वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत's post 07/07/2026

Photos from Vanchit Bahujan Aaghadi's post 06/07/2026
06/07/2026

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्यात आजही नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारणार असून, आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर (बीएमसी) दुसऱ्या क्रमांकाची, तसेच महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हा आदिवासी पाडा येतो. मात्र, येथे आजही वीज आणि सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस आले असून त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नवी मुंबई टीम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे. यासंदर्भात अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येणार असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिली.

Want your business to be the top-listed Government Service in Airoli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

घणसोलीगाव
Airoli
400708