Grampanchayat lahit Khu

Grampanchayat lahit Khu

Share

Majhi Vasundara

05/03/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मौजे लहित खुर्द येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर वार शुक्रवार दि ०६.०३.२०२६ रोजी वेळ सकाळी १० ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे

04/03/2026

ड्वार्फ केटल जंगल कप २.० स्पर्धेचे प्रमुख अतिथी श्री राजेंद्र सिंग “वॉटरमॅन ऑफ इंडिया” ,श्री चैत्रम पवार पद्मश्री, श्री आनंदजी भंडारी मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अहिल्यानगर याचे उपस्थितीत लहित खुर्द गावास महाराष्ट्रमधील अनोखी जंगल कप स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार रक्कम रुपये ७५ हजार प्राप्त झाला…🏆🏆🏆🏆

02/03/2026

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये विभाग स्तर ५० लक्ष बक्षीस मिळाल्यानंतर लहित खुर्द गावातील श्री संगमेश्वर मित्र मंडळ मुंबई येथे विद्यार्थ्यानी अभियान गीतावर नृत्य सादर केले

21/02/2026

मौजे लहित खु ता अकोले येथे छत्रपती शिवाजी महाराज्य जयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली…

21/02/2026

माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये लहित खु ग्रामपंचायतीस नाशिक विभागामध्ये ५० लक्ष रुपये प्रथम पुरस्कार प्राप्त झाला

18/02/2026

लहित खुर्द, तालुका: अकोले, जिल्हा:अहिल्यानगर गावात महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ५.० या अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या पंचमहाभूत तत्त्वावर गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शासनाच्या सदर अभियानाच्या धोरणानुसार प्रत्येक बाबीवर यशस्वीरित्या काम केले. गावामध्ये शाश्वत विकासावर आधारित वृक्षारोपण, पाणीव्यवस्थापन, भूजल साठे वाढविणे, पर्यावरण पूरक कामकाज तसेच रोजगार निर्मिती हे काम ग्रामपंचायत लहित खुर्द येथे यशस्वीरित्या पूर्ण झाले या कामाची शासन स्तरावरून दखल घेऊन लहित खुर्द गावात नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मिळवून ५० लक्ष रुपये बक्षीस स्वरूपात मिळवण्याचा मान गावास प्राप्त झाला आहे. यानिमित्ताने लहित खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच श्री. किशोर गोडसे, उपसरपंच श्री. राहुल गोडसे व सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, श्री. महेश शेळके तसेच ग्रामस्थांचे विविध स्तरावरून कौतुक केले जात आहे. सदर अभियान यशस्वीपणे राबविण्याकरता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी शेळके साहेब, व तसेच गटविकास अधिकारी श्री. अमर माने साहेब, कृषी अधिकारी श्री. विकास चौरे साहेब, व विस्तार अधिकारी श्री. शिवराम सुपे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन या निमित्ताने मिळाले.

Want your business to be the top-listed Government Service in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Grampanchayat Lahit Khu
Akola
422601