Amol Gulhane fans

Amol Gulhane fans AMRAVATI

*राहाटगांव ,व तपोवन मुख्य चौकातील वाईन व बियर शॉपीमुळे  शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण* *राष्ट्रवादी युवक काँग्रेस...
30/05/2026

*राहाटगांव ,व तपोवन मुख्य चौकातील वाईन व बियर शॉपीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण*

*राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक*

*वाईन व बियर शॉपी संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी*


*अमरावती २६ मे :-* शहरातील राहाटगांव चौक, विद्युत नगर चौक व तपोवन चौक अशा मुख्य चौकात सुरु झालेल्या वाईन व बियर शॉपी मुळे शांतता व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात सर्व नियम व अटींना धाब्यावर बांधून शहराच्या गजबजलेल्या व वर्दळीच्या चौकात वाईन व बियर शॉपी सुरु झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून सदर भागात कायदेशीर कार्यवाही व उपद्रवी प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. निवेदनात सांगण्यात आले कि, शहरातील राहाटगांव चौक, विद्युत नगर चौक व तपोवन चौक वाईन व बियर शॉपी मुख्य चौकात असल्याने स्थानिक भागातील महिला , युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर वाईन व बियर शॉपीमध्ये येणारे ग्राहक सुद्धा याच ठिकाणी ठिय्या मांडून उपद्रव करत असून त्या परिसरात नेहमीच वाद -विवाद व भांडणे सुरु राहतात. शिवीगाळ व अश्लील संभाषण तसेच छेडखानी सारखे प्रकार सुद्धा होत असल्याने स्थानिक भागात शांतता व सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. वाईन व बियर शॉपी मुख्य चौकात सुरु करण्यात आल्याने युवा पिढी सुद्धा व्यसनाधिनतेचा अधीन जात असून त्यांचे भविष्य व महिलांचे संसार सुद्धा उद्धवस्त होणार असून समाजावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होणार आहे,सर्व सर्व बाबींना कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील मुख्य चौकातील वाईन व बियर शॉपीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व अशा प्रकाराला टाळा घालण्यासाठी वाईन व बिअर शॉपी संचालकांना स्पष्ट शब्दात ताकीद देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तालय अमरावती शहर कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती कार्यालय येथे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनपा नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, गुडू उर्फ प्रशांत धर्माळे, सागर देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष - आकाश हिवसे, प्रदेश सरचिटणीस -अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, प्रतीक डुकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष -प्रमोद धनाडे, बादल काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष- संकेत बोके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख -अमित तायडे, रायुकॉचे शहर उपाध्यक्ष मनीष पाटील, उज्वल पांडे, जयेश सोनोने, पंकज शर्मा , शिवराज पाटील, सुजल तेलखडे , अमोल गुल्हाने, राहुल इंगोले, सागर देशमुख, रोहण तायडे, शिवकुमार कैथवास, आदित्य गुप्ता, तेजस पोटे,अभिजित लोयटे, अमन गुडधे, प्रणव हिवसे, पंकज खंडाळकर, तुषार पडोळे, प्रतीक पाटेकर, प्रतीक भोकरे, ऋषी गाडगे, आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन व कामगार दिननिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिन

निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

09/03/2026

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Gulhane fans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share