NCP Vijapur

NCP Vijapur

Share

20 % राजकारण 80% समाजकारण

01/04/2026
Photos from NCP Vijapur 's post 16/08/2024

छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याउपाध्यक्ष,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,वैजापूर तालुक्यातील युवा नेतृत्व, तरुणांचे मार्गदर्शक,गोळवाडी ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच मा. श्री.शैलेश(भैय्या)सुराशे गोळवाडीकर आज 16 ऑगस्ट आपला जन्म दिवस आपणांस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा आपले संपूर्ण जिवन सुखी,समृद्ध,निरोगी,आनंदी, समाधानी,वैभवशाली आणि भरभराटीचे जावो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना व शुभेच्छा.
शुभेच्छुक
मा श्री प्रकाश (बापु) ठुबे पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (sp शरदचंद्र पवार),तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष तथा माजी उपसरपंच शैलेष सुरासे Shailesh Surase Ncp Vaijapur ncp

Photos from NCP Vijapur 's post 15/08/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)औरंगाबाद शहर व जिल्हा तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष पांडूरंग तांगडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.व सर्व भारत वाशीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष श्री अभिषेक(भैय्या) देशमुख,प्रदेश कार्याध्यक्ष(अ.वि.) मुश्ताक अहमद, राष्ट्रीय महिला सचिव सौ.विनाताई खरे,बूथ प्रमुख तथा शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई) मा.नगरसेवक श्री मोतीलाल जगताप, शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सरचिटणीस ॲडव्होकेट श्री लक्ष्मण पाटील प्रधान,मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी,युवक शहर अध्यक्ष श्री प्रशांत देशमुख,कार्याध्यक्ष शेख फारूक,शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तय्यब खान,शहर उपाध्यक्ष शेख इरफान,शहर उपाध्यक्ष शेख अलीम,शहर जिल्हा सचिव शेख अयाज,शहर अध्यक्ष (असंघटित कामगार ) श्री अशीष इंगळे,प्रदेश उपाध्यक्ष (अ.वि.)सलीम पटेल वाहेगावंकर,प्रदेश सचिव(अ.वि.) अशरफ पठाण,जिल्हा सचिव प्रा.सलीम शेख,दिव्यांग सेलचे शहर अध्यक्ष मदन इंगळे, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुशील मोटे,नजमा शेख,शहर उपाध्यक्ष श्री दिपक म्हस्के,एड.रामकृष्ण मिसाळ,निरिक्षक श्री आशिष पवार,शहर उपाध्यक्ष श्री अशोक बंसवाल, श्री तुषार आहेर पाटील,श्री बाबूराव खरात,जलील अहमद खान,जिल्हाध्यक्ष (अ.वि.)रज्जाक शेख,एड.विकास देशमुख,श्री प्रभाकर भोसले,मो.शाहरुख, श्री अनंद मगरे, श्री यशवंत देशमुख, श्री राजू थोरात, श्री शंकर साळवे, श्री रवी तांगडे, श्री फुलचंद जाधव, डाॅ.रहेमतउल्लाह, श्री सुनील खोतकर,इत्यादी उपस्थित होते. NCP Aurangabad Jayant Patil - जयंत पाटील Sharad Pawar Prateek Shailaja Jayant Patil Jayant Patil FC Rohit Rajendra Pawar NCP Sambhaji Nagar Ncp Youth Official NCP Maharashtra Dr.Amol Ramsing Kolhe Fauzia Khan FC Fauzia Khan Ncpyouth Aurangabad Pandurang Tangade

13/08/2024

दि.13/08/2024
प्रति,
मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा.श्री.अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा.श्री.धनंजयजी मुंढे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.

विषय - 2023 मध्ये शासनाने जाहीर केलेल्या कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान इ-पिक पाहाणी केलेल्या शेतकऱ्यांनाच देण्या ऐवजी सरसकट द्यावे

मोहदय,
वरील विषयी विनंती पुर्वक निवेदन करण्यात येते की,महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष सन्माननीय मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री,मा.कृषी मंत्री साहेब आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत व्हावीत त्यांच्या शेती व इतर खर्चासाठी वारंवार मदत करीत आला आहात. त्याच उद्देशाने 2023 मध्ये सोयाबीन व कापूस या दोन पिकासाठी आपण हेक्टरी 5000 रु अनुदान जाहीर केले आणि जाहीर केल्याप्रमाणे ते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी प्रक्रिया ही सुरू केली आहे.मी आपले महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो.आपणास धन्यवाद देतो.परंतु महाराष्ट्र राज्यात आजही अनेक शेतकरी अशिक्षित,अडाणी आहेत त्यांना मोबाईल ज्ञान नाही.काही ठिकाणी रेंज नाही.त्या व अनेक कारणांमुळे स्वतः ई-पीक पाहणी करू शकत नाही.सोयाबीन व कापूस लागवड केलेली असतानाही राज्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत.मी राज्यातील अनुदान वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांनाच्या वतीने आपणास निवेदनद्वारे विनंती करतो की, मायबाप सरकार आपण कापुस व सोयाबीन अनुदान सरसकट द्यावे ही विनंती धन्यवाद.
आपला विश्वासू
श्री.प्रकाश (बापु) ठुबे पाटील,पोखरी तालुका वैजापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर* मो.9807615151

सर्व शेतकऱ्यांनी सदर इमेल वर इमेल करा

Photos from NCP Vijapur 's post 12/08/2024

वैजापूर तालुक्यातील सांप्रदायिक,राजकीय,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती,मा.सरपंच,अशा अनेक पदावर उत्कृष्ट कार्य करणारे अष्टपैलु आदर्श व्यक्तिमत्व, पाहताक्षणीच आदरयुक्त दरारा वाटतो.काही न बोलताच ही व्यक्ती चतुरस्त्र व व्यासंगी असावी अशी छाप पडते. प्रथम दर्शनीच असा ठसा उमटवणारे व दीर्घ ओळखीनंतर तोच ठसा कायम ठेवून अधिकाधिक ठळक ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके,आदर्श व्यक्तिमत्व ह.भ‌.प.मा.श्री. भागीनाथ (दादा) मगर तालुक्यातील
कोणतेही, सांप्रदायिक,सामाजिक, शैक्षणिक,अध्यात्मिक कार्य दादांच्या सूक्ष्म नियोजना शिवाय योग्य पध्दतीने पार पडत नाही. प्रत्येक क्षेत्रात स्वतः ला झोकून देऊन काम करण्याची हुन्नर म्हणजे दादा, कोण कोणत्या गटाचा,तटाचा,असो सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी पोटतिडकीने काम करणारे.स्वर्गीय लोकनेते श्री कैलासराव पाटील चिकटगावकर तथा आबा यांच्या तालमीत तयार झालेलं एक कोहिनूर रत्न म्हणजेच आदरणीय दादा

दादांच्या पोस्ट्स वाचल्यानंतर तत्वज्ञान,
राजकारण ते संस्कृती, आध्यात्म ते वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विस्तृत कॅनव्हासवरचा चौफेर व्यासंग जाणवतो.
मानवी नातेसबंधाची सहज सोप्या भाषेत व नर्मविनोदी शैलीत उकल करण्याची त्यांची हातोटी विलक्षण लक्षणीय आहे .

आमच्या या मार्गदर्शक अखंड उत्साही,मनमिळाऊ दादांना जन्म दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.आपले संपूर्ण जीवन सुखी,समृद्ध,निरोगी,आनंदी, समाधानी,वैभवशाली आणि भरभराटीचे जावो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना व शुभेच्छा त्यांच्या जिवनातील अनेक छबी,खुबी,हॉबी, राजकीय,सांप्रदायिक बाबी पक्ष,नेते,शेतकरी, या सर्व सामान्य माणसाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभेच्छुक
मा श्री प्रकाश (बापु)ठुबे पाटील पोखरीकर. श्री. भागीनाथ दादा मगर

Photos from NCP Vijapur 's post 11/08/2024

मा.खासदार फौजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जागृती यात्रा आज वैजापूर शहरात दुपारी 4 वाजता जोरदार स्वागत NCP Aurangabad Sharad Pawar Mohasin A. Shaikh Jayant Patil FC Prateek Shailaja Jayant Patil Rohit Rajendra Pawar Mahadev Balgude Jayant Patil - जयंत पाटील Fauzia Khan Fauzia Khan FC Fauzia Khan Fauzia Khan Dr.Amol Ramsing Kolhe Dr. Kalyan Kale-डॉ.कल्याण काळे NCP Sambhaji Nagar Dr.Amol Kolhe Dr. Krishna Kende NCP Maharashtra Ncp Youth Official

07/08/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

9 ऑगस्टपासून हर हर महादेव !

राज्यात पुन्हा रयतेच राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा -श्री जयंत पाटील

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा - खासदार. श्री अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्याक्ष श्री जयंत पाटील यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेत 'शिवस्वराज्य यात्रा'ची घोषणा केली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होईल अशी माहिती देताना या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल असे श्री जयंत पाटील यांनी सांगितले

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेचा टिझर व लोगोही प्रसिद्ध केला. यावेळी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक तथा खासदार श्री अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते तथा आमदार श्री अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते तथा आमदार श्री राजेश टोपे व सुनील भुसारे तसेच आमदार श्री रोहित पवार आदी नेते उपस्थित होते.

याबाबत सविस्तर बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार. तसेच 9 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे असे जयंत पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला.आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडीमार करत आहे तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही असे ते म्हणाले.

ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा - खासदार अमोल कोल्हे

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा आहे. शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्यांचा आदर्श जागृत करणे ही काळाची गरज आहे.महाराष्ट्रात गद्दारी आणि भ्रष्टाचार यांचे नांगर फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीत औरंगजेबाला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले. आज मात्र दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक होण्यासाठी आमच्या नेत्यांना वेश बदलून जावे लागते असा टोला खासदार श्री अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.

पुढे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक श्री अमोल कोल्हे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आपल्या राज्यातील राज्यकर्ते महाराष्ट्राला काहीही मिळवून देऊ शकले नाही. हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान दिल्लीच्या अहंकाराविरुद्ध आदराने उभे राहण्याची गरज आहे, ही लढाई एका पक्षाची नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. NCP Aurangabad Pandurang Tangade Jayant Patil - जयंत पाटील Sharad Pawar Supriya Sule Prateek Shailaja Jayant Patil Jayant Patil FC Rohit Rajendra Pawar

Photos from NCP Vijapur 's post 05/08/2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,आमचे परम मित्र, सोयरे,लाखनी गावचे माजी सन्माननीय, मा.सरपंच श्री नानासाहेब पाटील कदम आपणास जन्मदीनाच्या निमित्ताने मनःपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा.आपले संपूर्ण जिवन सुखी,समृद्ध,निरोगी, वैभवशाली आणि भरभराटीचे जावो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना व शुभेच्छा
शुभेच्छुक
मा.श्री प्रकाश(बापु)ठुबे पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शरद चंद्र पवार साहेब पक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. Nanasaheb Kadam

Photos from NCP Vijapur 's post 31/07/2024

इमानदार मराठा संघर्ष योद्धा, मराठा समाजाची आन-बान-शान आणि जाण असणारे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे कनखर नेतृत्व, सत्याच्या बाजूने शांततेच्या मार्गाने गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी अहोरात्र झटून रक्ताचे पाणी करणारे,उपोषण, आंदोलनाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक नेत्यांच्या झोपा उडविणारे निडर योद्धा आदरणीय श्रीमान मनोज (दादा) पाटील आपणास जन्म दिवसाच्या मनःपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक
श्री प्रकाश (बापु) ठुबे पाटील,पोखरीकर मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील समर्थक मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील

23/07/2024

*गंगापूर तालुक्यातील जन्म सामान्याचे कामे करा नाही तर तहसीलदार साहेब, चार्ज द्या... खुर्ची सोडा*

*जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे किल्लेदार यांच्या आंदोलनाला यश! गंगापुर तालुक्यातील प्रमाणपत्रे सर्व सामान्य नागरिकांना विविध प्रकारचे प्रमाणपत्रे मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे 'खुर्ची ताबा' आंदोलन काल गंगापूर तहशिल कार्यालयात असंख्य कार्यकर्ते नागरिक यांना सोबत घेऊन केले.* *'तहसीलदार साहेब चार्ज द्या...* *शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजे,* *महसूल कर्मचाऱ्यांचा संप मिटलाच पाहिजे आदी घोषणा देत* *राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या) नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, काल सोमवारी गंगापूर तहशिल परिसरातील जनतेच्या आवाजाने दणाणून सोडला.*

*तहसीलदारांच्या कॅबिन मध्ये जाऊन काम द्या, काम द्या... असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा संघटक तथा नागरिकांच्या कामासाठी सर्वात आक्रमक नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे. असे श्री वाल्मीकराव शिरसाट,गंगापूर तालुक्यातील कृतिशील नेतृत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय तालुकाध्यक्ष डॉ.श्री ज्ञानेश्वर पाटील निळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तहसीलदार सोनी यांच्या कार्यालयात महत्त्वाचे मुद्दे घेऊन खुर्ची ताबा आंदोलन केले.तहसीलदार श्री सतीश सोनी यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर याही पेक्षा प्रखर भूमिका घेत जिल्हा भर आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला सर्व आंदोलकांची तहशिलदार यांनी भेट घेतली व प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच प्रयत्न करु असे आश्वासन दिले.संप वेळेत न मिटल्यास अतिरिक्त क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेची रखडलेली सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. विद्यार्थ्यांचे रखडलेले शैक्षणिक व इतर प्रमाणपत्रे आजच प्राधान्याने देण्यात येतील,असे आश्वासन दिल्यानंतर सर्व आंदोलनकर्ते यांना विश्वासात घेऊन आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेण्यात आले.मागण्या दिलेल्या वेळेत मान्य नाही झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला.सरकारच्या निष्क्रियतेमुळे महसुल कर्मचाऱ्यांचा संप चिघळला. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना बसत आहे. हा संप लवकरच मिटवा आणि विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा अन्यथा जिल्हाभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक श्री वाल्मीकजी शिरसाट यांनी गंगापूर येथील आंदोलनाप्रसंगी दिला.सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष अहमद पटेल,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री सुनील युवक तालुकाध्यक्ष श्री किशोर गवांदे,महिला तालुकाध्यक्ष सौ. संजना महाडिक, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष रफिक पटेल, दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष श्री आर.डी. सोमसे,अनिस कुरेशी, श्री किशोर परभणे, श्री संकेत मैराळ, सलमान शेख, श्री भागीनाथ मोरे, श्री अशोक दारुंटे, श्री आसाराम काजळे, आशू शेख, श्री बाळू भावले, श्री नारायण साळवे, श्री भाऊराव लांडे, युसूफ बागवान यांच्यासह असंख्य विद्यार्थी, शेतकरी,निराधार महिला, वयोवृद्ध नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.व आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी केले.
शब्दांकन श्री प्रकाश (बापु) ठुबे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शरदचंद्र पवार साहेब पक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण NCP Aurangabad Supriya Sule Prateek Shailaja Jayant Patil Mahebub Shaikh Ncp Vaijapur Jayant Patil FC Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule FC - सुप्रिया ताई सुळे Dr. Kalyan Kale-डॉ.कल्याण काळे Mohasin A. Shaikh Dhanshree Kudale Tadwalkar Pandurang Tangade DrYogesh

Photos from NCP Vijapur 's post 18/07/2024

जालना लोकसभा मतदारसंघाचे लोक प्रिय खासदार सन्माननीय मा. कल्याणजी काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक
श्री प्रकाश(बापु)ठुबे पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शरदचंद्र पवार साहेब पक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण खासदार डॉ.कल्याण काळे Dr. Kalyan Kale-डॉ.कल्याण काळे NCP Aurangabad

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Aurangabad
431115