12/12/2024
पद्मविभूषण खासदार श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निमिताने आज दिनांक १२ डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी श्री.ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला शहर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१. आरोग्य शिबीर एक दिवसासाठी मोफत ओ .पी. डी. - एम. जी.एम. हॉस्पिटल - वेळ - सकाळी ९.०० वाजता.
२. वाढदिवसा निमित्ताने केक कापणे - राष्ट्रवादी भवन - वेळ - सकाळी - १०.१० वाजता.
३. ८४ ज्येष्ठ नागरिक, व ८४ महिलांचा सत्कार करण्यात आला असून तसेच ८४ विद्यार्थ्याना गौरव प्रमाणपत्र देऊन येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
४. मोफत वैद्यकिय शिबीर - सादात नगर, औरंगाबाद - वेळ - सकाळी ११.३० ते ४.०० वाजे पर्यंत.
सदरील कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष श्री. ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, कार्याध्यक्ष श्री.अभिषेक देशमुख, श्री.सुधाकर दादा सोनवणे, श्री.मुश्ताक अहमद, श्री.किशोर पाटील, श्री.द्वारकाभाऊ पाथ्रीकर, श्री.रघुनाथ नाना पाटील, श्रीमती. वीणाताई खरे, श्री. झुबेर मोतीवाला, श्री. मोहम्मद हबीब उर्फ मुन्ना भाई, श्री.प्रशांत जगताप, श्री.सुशील बोर्डे, श्री. विठ्ठलराव जाधव, श्री.राजेश मोरे, श्रीमती. शिरसाट ताई, श्रीमती. सलमा बाजी, श्री. अश्रफ पठाण, श्री. कडू शाह, श्री. अशोक बन्सवाल, श्री. मोहम्मद ताहेर, श्री. अक्षय पाटील, श्री.फिरोजखान पठाण श्री. लक्ष्मण प्रधान पाटील, श्री. यशवंत देशमुख पाटील, श्री. उद्धव बनसोडे, श्री. अनिल डोंगरे, श्री. कन्हैयालाल मिसाळ, श्री. विकास देशमुख, श्री. इब्राहिम पठाण, श्री. आनंद मगरे, श्री. झुबेर कुरेशी, तसेच अनेक कार्यकर्ते बहुसंखयेने उपस्थित होते.
13/11/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)औरंगाबाद शहर जिल्हा
राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे औरंगाबाद पुर्व मतदार संघाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार लहुजी शेवाळे यांच्या प्रचारार्थ प्रदेश कार्याध्यक्ष (अ.वि.)मुश्ताक अहमद यांनी मलिक अंबर नगर येथे आयोजित केलेल्या छोटेखानी सभेत सर्व प्रथम जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.कल्याणराव काळे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पुर्व विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लहुजी शेवाळे यांचा यथोचित सत्कार करून त्यानंतर नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस शेख सलीम सर यांचा सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी,शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई),शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान,शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान,प्रदेश सचिव(अ.वि.)अशरफ पठाण,शहर जिल्हा उपाध्यक्ष समीर मिर्झा,कामगार सेलचे शहर अध्यक्ष इब्राहिम पटेल,अल्पसंख्याक उपाध्यक्ष अश्फाक शेख,पुर्व वि.स.म.सं.अध्यक्ष अ.वि.समीर शेख,इत्यादींची उपस्थिती होती तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख(मुन्नाभाई)यांनी मानले.
11/11/2024
Press conference upcoming public meeting of uddhav thackeray, maha Vikas agadi all candidate aurangabad.
08/11/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)औरंगाबाद शहर जिल्हा.
औरंगाबाद जिल्हा(ग्रामीण)चे कर्तबगार जिल्हाध्यक्ष पांडूरंग तांगडे पाटील यांनी मा.प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचा आदेश सरसवांद्य मानून बी फार्म मिळाला असतांनाही औरंगाबाद पुर्व विधानसभेची उमेदवारी मागे घेतली.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी होती.शिवाय त्यांच्यातला उत्साह थोडा क्षीण झाला होता.पदाधिकाऱ्यांचा उत्साह परत पक्षासाठी वाढावा म्हणून पदाधिकाऱ्यांच्या वतीने कर्तबगार जिल्हाध्यक्ष पांडूरंग तांगडे पाटील यांचा सत्कार व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष अ.वि.मुश्ताक अहमद साहेब,शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख(मुन्नाभाई),शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तय्यब खान,शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष समीर मिर्झा,यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
03/11/2024
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा पुर्व मतदार संघाचे अधिकृत उमेदवार पांडूरंग तांगडे पाटील यांनी प्रदेश कार्याध्यक्ष अ.वि.मुश्ताक अहमद साहेब यांच्या निवास्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळेस त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना प्रदेश कार्याध्यक्ष अ.वि.मुश्ताक अहमद साहेब,शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई),शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान,शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान,यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख असेफ,प्रदेश सचिव अ.वि.अशरफ पठाण,जिल्हा (ग्रामीण)प्रसिध्दी प्रमुख विदास मगरे,शहर उपाध्यक्ष आशीष इंगळे,विधिज्ञ एड.चंद्रकांत ठोंबरे,अय्यूब पटेल,शेख खलील इत्यादी उपस्थित होते.
01/11/2024
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
24/10/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)घनसावंगी मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आ.राजेश भैया टोपे साहेब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी त्यांना शुभेच्छा देतांना मुश्ताक अहमद प्रदेश कार्याध्यक्ष(अ.वी.),औरंगाबाद शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई),औरंगाबाद शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान,प्रदेश सचिव(अ.वी.)अशरफ पठाण, शहर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तय्यब खान इत्यादींनी शुभेच्छा दिल्यात.
22/10/2024
औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार औरंगाबाद शहर जिल्हा.
आमदार व माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांचा औरंगाबाद विचारमंच आयोजित,
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील औरंगाबाद परिसरात राहणाऱ्या नोकरी,व्यवसाय,शिक्षण,व इतर कारणास्तव वास्तव्यास असलेल्या आपल्या घनसावंगीकरांशी आपुलकीचा संवाद.....चा "स्नेहमिलन सोहळा " कार्यक्रमात प्रदेश कार्याध्यक्ष अ.वि.मुश्ताक अहमद साहेब, शहर बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख (मुन्नाभाई),मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी,शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्यूब खान,शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख अलीम इत्यादींनी उपस्थिती दर्शवली.
14/10/2024
मुन्नाभाई (महम्मद हबीब शेख) शहर जिल्हा बुथ प्रमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा
05/10/2024
आज औरंगाबाद मतदारसंघातील सर्व इच्छूक उमेदवारांची निसर्ग मंगल मार्केट यार्ड पुणे येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व समक्ष साक्षात्कार घेण्यात आले.त्या अनुशंगाने औरंगाबाद पुर्व व मध्य तसेच पश्चिम विधानसभेचे इच्छुक उमेदवार प्रदेश कार्याध्यक्ष अ.से.मुश्ताक अहमद, शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला.माजी जिल्हाध्यक्ष अ.से.जलील अहमद खान,प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी,प्रदेश उपाध्यक्ष अ.से.सलीम पटेल वाहेगावंकर यांनी साक्षात्कार दिले.याप्रसंगी शहर जिल्हा बुथ प्रमुख मोहम्मद हबीब शेख(मुन्नाभाई),शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान,मध्य वि.स.म.सं.अध्यक्ष मोहम्मद रजी,शहर जिल्हा उपाध्यक्ष शेख अलीम,इब्राहीम पटेल,शेख इरफान इत्यादी उपस्थित होते.