Vikas Patil Gaikwad- विकास पाटील गायकवाड

Vikas Patil Gaikwad- विकास पाटील गायकवाड

Share

विकास पाटील गायकवाड A To Z sarvice

28/02/2026

आमचा परमेश्वर विष्णू पाटील गायकवाड यांचा आज वाढदिवस, दरवर्षी काही ना काही कारणाने परमेश्वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा एक-दोन दिवस उशिरानेच द्यायचो,आणि तो नेहमीच आपल्या खास हसऱ्या अंदाजात, “उशिरा का होईना, दादा तुम्ही शुभेच्छा दिल्यात म्हणजे माझा वाढदिवस पूर्ण झाला!” असं प्रेमाने म्हणायचा.

पण आज मात्र निवृत्ती गायकवाड यांच्या मुळे सकाळीच थेट त्याला जन्मदिनीच वेळेवर शुभेच्या देण्याचा योग जुळून आला.

या वेळी माझ्यासोबत निवृत्ती गायकवाड, रावसाहेब गायकवाड आणि कल्याण गायकवाड उपस्थित होते,आणि त्या सगळ्यांसोबत परमेश्वराला शुभेच्छा देताना मन भरून आलं.

जेसीबी ऑपरेटर ते गाडी मालक असा त्याचा हा प्रवास म्हणजे खरंतर अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक कष्टांची जिवंत कहाणी आहे. या संपूर्ण प्रवासात त्याचा मनमिळाऊ स्वभाव, मोठ्यांप्रती असलेला आदर, आणि निर्व्यसनी जीवनशैली, हे सगळे गुण मला नेहमीच विशेष भावतात.

परमेश्वर,तुझं आयुष्य असंच यश, आरोग्य, समाधान, आनंद आणि समृद्धीने भरलेलं राहो,
हीच आई जगदंबे चरणी मनःपूर्वक प्रार्थना…!

28/02/2026

श्री.बाबुराव शेषराव पा. दांडगे (रा. वरूड) यांची सुकन्या चि. सौ. का. धनवंती व श्री. ज्ञानेश्वर रतन पठाडे (रा. बोरवाडी) यांचे सुपुत्र चि. विठ्ठल यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून नवविवाहित दांपत्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दांडगे परिवार आणि पठाडे परिवार या दोन्ही कुटुंबांशी असलेले आमच्या परिवाराचे जुने, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे व विश्वासाचे नाते पुन्हा या पवित्र विवाहबंधनातून नव्या नात्यात गुंफले गेले आहे.

धनवंती व विठ्ठल या नवदांपत्याच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, समजूतदारपणा, संयम, आनंद, समाधान, आरोग्य व समृद्धी यांचा अखंड वर्षाव होत राहो. एकमेकांच्या साथीने प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहत त्यांचे सहजीवन मंगलमय, यशस्वी व आदर्श ठरो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

नवदांपत्यास कोटी कोटी शुभेच्छा......!

26/02/2026

चिरंजीव स्वप्निल संतोष पाटील बांबर्डे (रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) व कुमारी ऋतुम्बरा जगदीश पाटील गायकवाड यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यानिमित्त भावी वधू-वरांना वर बाप आणि वर मामा म्हणून शुभेच्छा दिल्या.

स्वप्निल हा माझ्या चुलत बहिणीचा मुलगा म्हणजे माझा भाचा, तर ऋतुम्बरा ही माझ्या चुलत भावाची मुलगी म्हणजे माझी पुतणी. ही दोन्हीही लेकरं मी त्यांच्या जन्मापासून पाहत आलो. त्यांच्या बालपणातील आठवणी, निरागस हसू, खोडकरपणा,शिक्षण आणि त्यांचा जीवन प्रवास आज डोळ्यासमोरून जात आहे. आज हीच दोन लेकरं विवाहबंधनात अडकत आहेत, हे पाहताना मन भरून येत आहे. जुन्या नात्याला आज एक नवी, सुंदर ओळख मिळाली आहे.

नव्या आयुष्याच्या या सुरुवातीला प्रेम, विश्वास, आपुलकी, समंजसपणा व आनंदाची साथ लाभो. तुमचे भावी वैवाहिक जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी व मंगलमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

आपल्या भारतीय संस्कृतीत साखरपुडा हा दोन जीवांना आणि दोन कुटुंबांना प्रेमाच्या धाग्यात बांधणारा पवित्र सोहळा आहे. एकमेकांना साखर भरवून आयुष्यभर नात्यात गोडवा टिकून राहावा, या भावनेतून ही सुंदर परंपरा निर्माण झाली आहे. हा क्षण नव्या पर्वाची मंगल सुरुवात घडवणारा असतो.

26/02/2026

मा.फुलंब्री तहसीलदार यांना स्मरण पत्र
आपल्या डोंगररांग परिसरातील २९ गावांचा डोंगरी विकास योजनेत समावेश होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कार्यालय, छ.संभाजीनगर यांनी 50 दिवसांपूर्वी तहसीलदार फुलंब्री यांना सदरील 29 गावचे महसूल पुरावे आणि गाव नकाशे मागितले होते, परंतु मध्यंतरी निवडणुकीच्या तयारीत तहसील प्रशासन व्यस्त असल्याने त्या पत्रावर काहीच कार्यवाही झाली नाही, म्हणून सदरील प्रकरणात कार्यवाही व्हावी, यासाठी तहसीलदार फुलंब्री यांना स्मरणपत्र दिले.

या योजनेमुळे शिक्षण फीमध्ये सवलत, कॉलेज व नोकरीत १०% आरक्षण मिळून डोंगराळ भागातील मुलांच्या भविष्यास नवी दिशा मिळणार आहे.










17/02/2026

जबलपुर (मध्यप्रदेश) में पवित्र नर्मदा तट पर माँ नर्मदा की दिव्य आरती करने का सौभाग्य प्राप्त हुआ। इस अलौकिक, भक्तिमय और आध्यात्मिक वातावरण में खड़े होकर मन श्रद्धा, कृतज्ञता और शांति से भर उठा।

माँ नर्मदा हमारी जीवनदायिनी माता, संस्कृति की वाहक और आस्था का केंद्र हैं, यह संस्कार हमारे मन में और अधिक गहराई से बसने का श्रेय आदरणीय नरेंद्र मोदी जी के प्रेरणादायी नेतृत्व और विचारधारा को जाता है।

“नदी माँ है” यह भाव उन्होंने शब्दों में ही नहीं, बल्कि अपने कार्यों से पूरे देश में स्थापित किया।
नमामि गंगे, नमामि देवी नर्मदे, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संरक्षण एवं जल-संवर्धन जैसे अभियानों के माध्यम से आज प्रत्येक भारतीय के मन में नदियों के प्रति श्रद्धा, कृतज्ञता और संरक्षण का भाव और अधिक प्रबल हुआ है।

आज माँ नर्मदा की आरती करते समय यह अनुभूति और भी सशक्त हुई कि नदी हमारी माता है, उसका संरक्षण हमारा कर्तव्य है,और उसकी स्वच्छता हमारी संस्कृति की पहचान है।

इसअवसर पर माँ नर्मदा के चरणों में नतमस्तक होकर देश की, सुख-समृद्धि, पर्यावरण संतुलन और सांस्कृतिक मूल्यों के संरक्षण हेतु प्रार्थना की।

जय माँ नर्मदा
जय भारत

17/02/2026

जबलपुर (मध्य प्रदेश) में भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी के निकटवर्ती, संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित, कर्मठ, दूरदर्शी और ऊर्जावान नेतृत्व श्री. रत्नेश जी सोनकर से भेंट का सौभाग्य प्राप्त हुआ। यह मुलाकात अत्यंत प्रेरणादायी, भावनात्मक और जीवन भर स्मरण में रहने वाली रही।

भेंट के दौरान उनसे हुई गहन चर्चा में पार्टी विस्तार के लिए उनके परिवार द्वारा दिए गए दो पीढ़ियों के अतुलनीय योगदान, संघ संस्कारों से निर्मित उनका व्यक्तित्व, आगामी समय में भारतीय जनता पार्टी के संगठन विस्तार हेतु उनकी स्पष्ट और ठोस योजनाएं, साथ ही आईटी क्षेत्र में उनका व्यापक अनुभव, इन सभी विषयों पर विस्तार से संवाद हुआ। प्रत्येक विषय पर उनकी स्पष्ट सोच, संगठन के प्रति निष्ठा और दूरदृष्टि मन को अत्यंत प्रभावित कर गई। यह संवाद अत्यंत संतोषजनक, मार्गदर्शक और प्रेरक सिद्ध हुआ।

उनके चार दिनों के आत्मीय आतिथ्य में जो स्नेह, अपनापन और परिवार जैसा भाव अनुभव हुआ, उसने पुनः यह एहसास करा दिया कि भाजपा केवल एक राजनीतिक पार्टी नहीं, बल्कि एक सशक्त और संवेदनशील परिवार है। सोनकर जी के निवास पर मिला प्रेम, सम्मान और अपनापन मन को भावविभोर कर गया।

ऐसे संस्कारवान, समर्पित और दूरदर्शी नेतृत्व के सान्निध्य में कुछ पल बिताने का अवसर मिलना मेरे लिए अत्यंत सौभाग्य की बात है।
हृदय से आभार एवं कृतज्ञता.
श्री रत्नेश जी सोनकर!

08/02/2026

हा फोटो म्हणजे दर वर्षी दर निवडणुकीत विचारांचा सौदा करणाऱ्या मतदार,कार्यकर्ता आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

सन २००१–०२ च्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या काळात माझी आणि काकाजी पुंजाराम बोडखे यांची ओळख झाली. काकाजी बोडखे हे भारतीय जनता पार्टीचे अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावान मतदार आहेत. ते ना कार्यकर्ते आहेत, ना नेते. पण भाजपा पक्षावरचा त्यांचा विश्वास, विचारांशी असलेली निष्ठा आणि सेवाभाव फार मोठा आहे. म्हणूनच त्याचं संपूर्ण गाव त्यांना ते कुठलीही निवडणूक लढले नसले तरी, प्रेमाने ‘चेअरमन’ म्हणते.

आज पाल जिल्हा परिषद गटातील विविध मतदान केंद्रांना भेट देताना लोहगड (नांद्रा) येथील मतदान केंद्रावर त्यांची भेट झाली. तब्बल २६ वर्षांनंतरही भाजपाबाबत तोच विश्वास, तोच विचार, तीच तळमळ आणि पक्षाकडून कोणत्याही पदाची किंवा लाभाची अपेक्षा नसलेली त्यांची वृत्ती पाहून मन भरून आलं.

सेलिब्रिटी लोकांसोबत ही फोटो काढण्याचा मला कधीही मोह होत नाही, पण आज चेअरमन यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही,कारण हे विचारावर ठाम असणारे निस्वार्थ मतदार कार्यकर्तेच मला माझे सेलिब्रिटी वाटतात.

हा त्यांच्या सोबतचा फोटो म्हणजे दर वर्षी दर निवडणुकीत विचारांचा सौदा करणाऱ्या मतदार,कार्यकर्ता आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

या वेळी माझ्यासोबत राजू आप्पा गवंडर, शेखू पाटील बोडखे, माजी सरपंच हिरालाल राठोड आणि केशव मामा शिरसाठ उपस्थित होते.


#भाजपा

#कमळचिन्ह

ModiKaParivar
निष्ठावान_मतदार
विचारांची_निष्ठा
GrassrootsSupport
LoyaltyMatters
MaharashtraPolitics
Phulambri

08/02/2026

हा फोटो म्हणजे दर वर्षी दर निवडणुकीत विचारांचा सौदा करणाऱ्या मतदार,कार्यकर्ता आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

सन २००१–०२ च्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या काळात माझी आणि काकाजी पुंजाराम बोडखे यांची ओळख झाली. काकाजी बोडखे हे भारतीय जनता पार्टीचे अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावान मतदार आहेत. ते ना कार्यकर्ते आहेत, ना नेते. पण भाजपा पक्षावरचा त्यांचा विश्वास, विचारांशी असलेली निष्ठा आणि सेवाभाव फार मोठा आहे. म्हणूनच त्याचं संपूर्ण गाव त्यांना ते कुठलीही निवडणूक लढले नसले तरी, प्रेमाने ‘चेअरमन’ म्हणते.

आज पाल जिल्हा परिषद गटातील विविध मतदान केंद्रांना भेट देताना लोहगड (नांद्रा) येथील मतदान केंद्रावर त्यांची भेट झाली. तब्बल २६ वर्षांनंतरही भाजपाबाबत तोच विश्वास, तोच विचार, तीच तळमळ आणि पक्षाकडून कोणत्याही पदाची किंवा लाभाची अपेक्षा नसलेली त्यांची वृत्ती पाहून मन भरून आलं.

सेलिब्रिटी लोकांसोबत ही फोटो काढण्याचा मला कधीही मोह होत नाही, पण आज चेअरमन यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही,कारण हे विचारावर ठाम असणारे निस्वार्थ मतदार कार्यकर्तेच मला माझे सेलिब्रिटी वाटतात.

हा त्यांच्या सोबतचा फोटो म्हणजे दर वर्षी दर निवडणुकीत विचारांचा सौदा करणाऱ्या मतदार,कार्यकर्ता आणि नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

या वेळी माझ्यासोबत राजू आप्पा गवंडर, शेखू पाटील बोडखे, माजी सरपंच हिरालाल राठोड आणि केशव मामा शिरसाठ उपस्थित होते.


#भाजपा

#कमळचिन्ह


#निष्ठावान_मतदार
#विचारांची_निष्ठा



07/02/2026

वडोद बाजार गटातील आपल्या मित्राचं अधुर स्वप्न तुम्ही पूर्ण कराल ना ?

05/02/2026

भारतीय जनता पार्टीच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघाची पूर्णवेळ जबाबदारी स्वीकारल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील दहा जिल्हा परिषद सर्कलमध्ये अहोरात्र, पूर्णवेळ प्रचार करण्याचा प्रयत्न केला.

पक्षाचा प्रत्येक उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार यांच्यापर्यंत पोहोचत, ही मेहनत निश्चितच पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, या पूर्णवेळ प्रचारातून सर्वांचे समाधान होईल, पक्षाची अपेक्षा पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी अधिक बळकट होईल, यासाठी मनापासून प्रयत्न केला आहे.

कार्यकर्त्यांचा विश्वास, मतदारांचे प्रेम आणि पक्षनिष्ठा याच बळावर हा संघर्ष यशस्वी होईल, हीच भावना.

#भाजप
#फुलंब्रीविधानसभा
#जिल्हापरिषदनिवडणूक
#पूर्णवेळप्रचार
#जबाबदारी
#संघटनशक्ती
#कार्यकर्त्यांचेबळ
#पक्षनिष्ठा
#विजयाच्या
#कमळचिन्ह
#सेवाभाव
#एकदिलएकउद्दिष्ट

05/02/2026

“मामा” या शब्दाचा खरा अर्थ काकाजी पवारांकडे पाहिल्यावर उमगला. मामा म्हणजे माईपेक्षाही दुप्पट प्रेम, दुप्पट जिव्हाळा आणि आयुष्यभराची जबाबदारी घेणारा तो मामा मी आज माझ्याच नाते संबंधात पाहिला.

आज काकाजी पवार यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी डोनवाडा येथे उपस्थित असताना,सर्व जुन्या आठवणी मनपटलावर जाग्या झाल्या, काकाजी यांच्या बहिणीच्या अकाली निधनानंतर भाच्याचा सांभाळ, त्याचे संगोपन, शिक्षण आणि आता त्यालाच जावई करून घेण्याचा निर्णय, या सगळ्यातून काकाजी पवारांनी मामा या नात्याचा खरा अर्थ जगून दाखवला. नातेसंबंध शब्दांनी नव्हे तर कृतीने जपायचे असतात, हे त्यांनी सिद्ध केले.

काकाजी हा माझा आतेभाऊ,आम्ही दोघंही वाघोळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी एकाच वर्गात शिकलो. आज त्या समजस काकाजीकडे पाहताना त्याच्यात एक आईच डबल प्रेम देणारा मामा आणि जबाबदारीची, प्रेमाची आणि संस्कारांची समजस मूर्ती दिसत होती.

नववधू-वरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी. विजय गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, कृष्णा शिंदे, यांच्या सह मनःपूर्वक शुभेच्छा देताना, समजस काकाजी पवारांकडे पाहून मन अभिमानाने भरून आलं.मामा या शब्दाचा खरा अर्थ आज त्याने पुन्हा एकदा जिवंत केला…

25/01/2026

भाजपा पक्षाच्या संघर्षाच्या काळात प्रत्येक गावात मोजकीच काही घरे पक्षासोबत ठामपणे उभी होती. त्यापैकी धामणगाव येथील कै. अण्णा पा. डिडोरे आणि रामकृष्ण दादा यांचे घर.

कै. अण्णा पा. डिडोरे यांची नात तसेच राजू पाटील डिडोरे यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या प्रसंगी धामणगाव येथे उपस्थित राहून भावी वधू-वरांना माझ्यासह पाल जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ.लंकाताई आप्पासाहेब काकडे व श्री.आप्पासाहेब पाटील काकडे जातेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री.विनोद भीमराव पाटील मानकापे, आजिनाथ झाल्टे,श्री रमेश थोरात, श्री संजय कावळे यांनी शुभेच्छा दिल्या.

Want your business to be the top-listed Government Service in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Aurangabad