MHADA

Website Contact the organization

MHADA Maharashtra Housing and Area Development Authority offering affordable houses under various scheme

04/10/2026

Mr. Anil Wankhade, Deputy Chief Executive Officer, MHADA, share perspective on why the future of urban housing must go beyond simply adding new structures.

With brownfield redevelopment, existing urban spaces can be thoughtfully transformed to unlock new housing potential while keeping people connected to their workplaces, essential services, social networks and the opportunities that cities offer.

हजारो वर्षांची परंपरा, समृद्ध साहित्यसंपदा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते लाभलेली आपली मराठी भाषा ३ ऑक्टोबर, २...
03/10/2026

हजारो वर्षांची परंपरा, समृद्ध साहित्यसंपदा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अतूट नाते लाभलेली आपली मराठी भाषा ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी ‘अभिजात’ भाषेचा मान मिळवून अधिक गौरवशाली झाली.

संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत ज्ञान, विचार, भक्ती, संस्कृती आणि समाजजीवन समृद्ध करणाऱ्या मायमराठीचा हा अभिमान प्रत्येक मराठी मनात जपला गेला पाहिजे.

अभिजात मराठीचा वारसा जपूया, समृद्ध करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवूया!

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🙏🏻
#अभिजातमराठी #मायमराठी #मराठीभाषा

म्हाडा मुख्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीमध्ये नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत, व...
02/10/2026

म्हाडा मुख्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीमध्ये नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत, विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, जिल्हानिहाय व लेआउटनिहाय माहिती तसेच उपलब्ध भूखंडांबाबतची स्थिती जाणून घेण्यात आली.

प्रकल्पांच्या प्रगतीसोबतच प्रलंबित कामे, आगामी नियोजन आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रकल्पांना गती, प्रलंबित कामांना दिशा आणि नियोजनाला परिणामकारक अंमलबजावणी यासाठी आवश्यक कार्यवाहीला प्राधान्य देण्यात आले.

“जय जवान, जय किसान” या अमर घोषणेतून देशसेवा, शौर्य आणि अन्नदात्याप्रती कृतज्ञतेचा संदेश देणारे भारताचे माजी पंतप्रधान ला...
02/10/2026

“जय जवान, जय किसान” या अमर घोषणेतून देशसेवा, शौर्य आणि अन्नदात्याप्रती कृतज्ञतेचा संदेश देणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
-----------------------------------------------------------------------------------
“Jai Jawan, Jai Kisan” a timeless call that embodies the spirit of national service, valour and gratitude towards the farmers who nourish the nation. On the birth anniversary of Lal Bahadur Shastri, India’s former Prime Minister, we pay our humble tributes to his enduring legacy and ideals.

सत्य, अहिंसा आणि मानवतेचे उपासक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!-------------------------------...
02/10/2026

सत्य, अहिंसा आणि मानवतेचे उपासक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-----------------------------------------------------------------------------------
Humble tributes to Mahatma Gandhi, the Father of the Nation and a true advocate of truth, non-violence and humanity, on his birth anniversary.

म्हाडा मुख्यालयात छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण मंडळाच्या विविध कामकाजाचा आणि गृहप्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण...
29/09/2026

म्हाडा मुख्यालयात छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण मंडळाच्या विविध कामकाजाचा आणि गृहप्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

गृहप्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, उपलब्ध घरांचा नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा आणि प्रकल्पांच्या कामांना आवश्यक गती मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला.

परवडणारी, दर्जेदार घरे आणि नागरिकाभिमुख सेवा हे म्हाडाच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत. छत्रपती संभाजीनगर मंडळातील गृहनिर्माण प्रकल्प अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

‘म्हाडा डिजिटल गणेशोत्सव – २०२६’ या स्पर्धेला राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी गणेशभक्त आणि ...
29/09/2026

‘म्हाडा डिजिटल गणेशोत्सव – २०२६’ या स्पर्धेला राज्यभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी गणेशभक्त आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार!

आपल्या सहभागामुळे डिजिटल माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह अधिक व्यापक झाला. 🙏🏻

स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा तसेच पारितोषिक वितरणाबाबतचा सविस्तर तपशील म्हाडाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

नक्षत्रवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अ...
29/09/2026

नक्षत्रवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वानखडे यांनी आढावा घेत प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी केली.

प्रकल्पातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच तयार सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांना हक्काचे आणि परवडणारे घर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने म्हाडा सातत्याने प्रयत्नशील आहे. 🏠

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या! ❤️--------------------------------------...
25/09/2026

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या! ❤️
-----------------------------------------------------------------------------------
Heartiest wishes on the auspicious occasion of Anant Chaturdashi! 🙏🏻

Ganpati Bappa Morya…Pudchya Varshi Lavakar Ya! ❤️

23/09/2026

म्हाडा डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेत तुमच्या बाप्पाला लीडरबोर्डवर मिळवून द्या सर्वोच्च स्थान!

पूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा आणि आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाइकांसोबतही शेअर करा व त्यांनाही पसंतीच्या बाप्पाला व्होट करायला सांगा.

Address

Grihanirman Bhavan Kalanagar
Bandra East
400051

Alerts

Be the first to know and let us send you an email when MHADA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MHADA:

Shortcuts

Share