25/09/2026
*निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद
११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा*
बार्शी, दि. २३ सप्टेंबर २०२६ :
निमा शाखा, बार्शी यांच्या वतीने ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यावर्षीचा संदेश “निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद” हा असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या निमित्ताने सिल्वर ज्युबिली प्रशाला, बार्शी येथे विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये आयुर्वेद तज्ञ डाॅ प्रदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, आरोग्यविषयक चांगल्या सवयी आणि निरोगी भविष्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच डाॅ मिरा गोदेपुरे यांनी दैनंदिन जीवनात आहार-विहार, आरोग्यदायी सवयी आणि प्रतिबंधात्मक उपाय यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन निमा शाखा, बार्शी यांच्या वतीने करण्यात आले त्यांना निमा वुमन्स फोरम, बार्शी यांचे सहकार्य लाभले. यावळी सिल्व्हर ज्युबिली प्रशालेचे शिक्षक व इतर स्टाफ उपस्थित होते. तसेच निमा संघटनेचे डॉ. विजयसिंह पवार, डॉ. रणजीत काकडे, डाॅ जयंत मोरे, डॉ. रश्मी अग्रवाल, डॉ मेघा थळपती, डाॅ क्रांती जाधवर व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर आभार मुख्याध्यापक श्री महेश गोदेपुरे यांनी मानले.