Audumbar Panchal Honalikar

Audumbar Panchal Honalikar जिल्हा परिषद सदस्य,लातूर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस🇮🇳
समाजसेवक | देशभक्त
मो.नं-9763400440

14/09/2026

दमदार व्यक्तिमत्व अभय दादा !!!

13/09/2026
आज बोरोळ येथे राष्ट्रीय पोषण आहार आणि अंगणवाडी या अत्यंत महत्त्वाच्या आपल्या देशाचे भविष्य हे आपल्या मुलांच्या आरोग्यावर...
12/09/2026

आज बोरोळ येथे राष्ट्रीय पोषण आहार आणि अंगणवाडी या अत्यंत महत्त्वाच्या आपल्या देशाचे भविष्य हे आपल्या मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या योग्य पोषणावर अवलंबून आहे.
“सुदृढ बालक, निरोगी माता आणि सक्षम समाज” हे आपले ध्येय असले पाहिजे.
अंगणवाडी केंद्र हे केवळ लहान मुलांना शिकवण्याचे ठिकाण नाही, तर ते बालकांच्या पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करणारे केंद्र आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना पूरक पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती केली जाते.
लहान वयात योग्य आहार मिळाला तर मुलांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्यामुळे प्रत्येक बालकाला पौष्टिक आणि संतुलित आहार मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
आपल्या आहारामध्ये डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे.
विशेषतः गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान बालकांच्या पोषणाकडे आपण अधिक लक्ष दिले पाहिजे.

*देवणी येथे १७ ऑगस्ट रोजी जनता दरबार; जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे — जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ होनाळीकर ...
16/08/2026

*देवणी येथे १७ ऑगस्ट रोजी जनता दरबार; जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे — जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ होनाळीकर यांचे आवाहन*
लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री. शिवाजीराव काळगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अभय दादा साळुंके यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे देवणी येथे सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. देवणी पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात हा जनता दरबार होणार असून, तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय व निमशासकीय विभागांशी संबंधित समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनता दरबारात महसूल, कृषी, आरोग्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महावितरण, शिक्षण, गृह विभाग, ग्रामपंचायत तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनसह विविध शासकीय योजनांच्या मंजुरीतील अडचणी नागरिकांना मांडता येणार आहेत. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वानी उपस्थित रहावे.

04/08/2026

Address

Deoni
413519

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Audumbar Panchal Honalikar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share