09/10/2026
आज दि.९ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभा संपन्न झाल्या.
यावेळी बळीराजा सहकारी पॅनलच्या माध्यमातून महायुतीची एकजूट आणि सहकार क्षेत्राच्या विकासाचा संकल्प मांडण्यात आला.
छत्री हे आपल्या पॅनलचे चिन्ह असून, या चिन्हावर मतदान करून बळीराजा सहकारी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.संजय जी राठोड, मंत्री श्री. इंद्रनील जी नाईक,आमदार श्री.किसनराव वानखेडे, माजी आमदार श्री. मदनभाऊ येरावार महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
छत्री चिन्हावर मतदान करा आणि बळीराजा सहकारी पॅनलला विजयी करा!
~ संजय उत्तमराव देशमुख
खासदार यवतमाळ वाशिम लोकसभा