SwamiShantigiriji

Call Website Contact the organization

SwamiShantigiriji Shantigiriji Maharaj is continuing the work of Janardhan Swami. He is coveted with “Dharma Sanskar”, with his work towards common man and the society.

As the Jagadguru of Juna Akhada and the dedicated Uttaradhikari of Nishkam Karmayogi Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj, Swamiji is committed to carrying forward the divine mission of his Guru.Join us on this journey of faith & selfless service He has received the honor of Shri Shri 1008. He believes that this honor has increased his responsibilities towards the nation and its people. With the blessing of Babaji, he is confident of completing the work of Babaji with the help of all you devotees.

30/09/2026

दिवस-०१ पुष्प-०१ 🕉जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा,महिला अनुष्ठान श्रीक्षेत्र ओझर

🚩 राममंदिर योद्धा स्मृती वंदन सभा 🚩अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भावपूर्ण स्मरण!श्रीराम मंदिर निर्माण आं...
28/09/2026

🚩 राममंदिर योद्धा स्मृती वंदन सभा 🚩
अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भावपूर्ण स्मरण!

श्रीराम मंदिर निर्माण आंदोलनाला दिशा देणारे, हिंदू समाजाच्या संघटनासाठी आयुष्य समर्पित करणारे युगपुरुष श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, देवगिरी प्रांतातर्फे ‘राममंदिर योद्धा स्मृती वंदन सभा’ छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदिरात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्मृती वंदन सभेला विविध संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभली. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज, तसेच प. पू. भास्करगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान), प. पू. स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज (वेदांत, धर्मशास्त्राचार्य), प. पू. भगवान महाराज (आनंदगावकर) यांच्यासह संत-महंतांची उपस्थिती लाभली.
सभेचे प्रमुख वक्ते हुकूमचंदजी सावला (विश्व हिंदू परिषद केंद्रीय उपाध्यक्ष व गोवंश विभाग केंद्रीय संरक्षक) यांनी मार्गदर्शन केले.
अशोकजी सिंघल यांच्या कार्याचे स्मरण करताना श्रीराम मंदिरासाठीचा संघर्ष, त्याग, संघटन आणि समर्पणाची परंपरा यांना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजजीवनात राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीच्या मूल्यांसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प या निमित्ताने अधोरेखित झाला.

🚩 श्रीक्षेत्र वेरूळ येथे ‘श्री बालाजी धाम’चे भक्तिमय वातावरणात लोकार्पण! 🚩निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनग...
27/09/2026

🚩 श्रीक्षेत्र वेरूळ येथे ‘श्री बालाजी धाम’चे भक्तिमय वातावरणात लोकार्पण! 🚩

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मशिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र वेरूळ येथे जगतगुरु बाबाजींच्या संकल्पित समाधी मंदिराजवळ भक्तांच्या सामूहिक योगदानातून साकारण्यात आलेल्या ‘श्री बालाजी धाम’ या सुंदर वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जुलै -२०२५ मध्ये श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथे झालेल्या ‘जय बाबाजी’ भक्त परिवाराच्या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ ही वास्तू साकारण्यात आली आहे. या सोहळ्यात नित्यनेम विधी, महाआरती आणि महाप्रसाद असा धार्मिक कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘श्री बालाजी धाम’च्या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि ज्ञानाचा अनोखा अनुभव घेतला.ज्ञान, संस्कार, अध्यात्म आणि प्रेरणा रुजवण्याचा येथे प्रयत्न करण्यात आला आहे.
वेरूळला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आणि पर्यटकाला जगद्गुरू स्वामी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज तसेच जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी, हा ‘श्री बालाजी धाम’चा प्रमुख उद्देश आहे.
🏛️ ‘श्री बालाजी धाम’मध्ये भाविकांसाठी विशेष आकर्षण—
🔹 माहितीपटाच्या माध्यमातून बाबाजींच्या कार्याची ओळख
🔹 आध्यात्मिक ग्रंथांचे पुस्तक दालन
🔹 आनंदी व सार्थ जीवनासाठी मार्गदर्शक साहित्य
🔹 जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या काळातील दुर्मिळ वस्तूंचे दर्शन
🔹 बाबाजींच्या पवित्र पालखीचे दर्शन
🔹 सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथातील तीन प्रमुख ओव्या
🔹 श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथील कार्यक्रमाचा विशेष अल्बम
🙏 वेरूळला आलात तर ‘श्री बालाजी धाम’ला अवश्य भेट द्या!

🙏 श्री बाबाजींच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ललित पंचमी महोत्सवाची जय्यत तयारी! 🙏श्रीक्षेत्र गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) ...
26/09/2026

🙏 श्री बाबाजींच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ललित पंचमी महोत्सवाची जय्यत तयारी! 🙏

श्रीक्षेत्र गोंडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे श्री बाबाजींचा ११२ वा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या जन्मोत्सवानिमित्त ८ ते १५ ऑक्टोबरदरम्यान अखंड नंदादीप, बालगोपाल जप अनुष्ठान तसेच पंचदिनसाध्य एकमुखात्मक इच्छापूर्ती शिवशक्ती याग आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ ध्वजारोहणाने झाला. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मशिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी आमदार किशोर (आप्पा) पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र गोंडगाव भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. श्री बाबाजींच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ललित पंचमी महोत्सवात सहभागी होऊया! 🙏🚩

निमगाव वाकडा येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहातनिष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स...
23/09/2026

निमगाव वाकडा येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्री अध्यात्मशिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत निमगाव वाकडा (ता. निफाड, जि. नाशिक) येथे रेणुका माता मंदिर कलशारोहन, जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार (ता. २३) रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर भव्य सत्संग सोहळा पार पडला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, माजी खासदार समीर भुजबळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, गुणवंतराव होळकर, बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णाताई जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सोहळ्यामुळे निमगाव वाकडा परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उत्तर प्रदेश संस्कृत संस्थान च्या माध्यमातून आयोजित केलेल्या संस्कृत प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये श्री संत संत जनार्दन स्वामी...
16/09/2026

उत्तर प्रदेश संस्कृत संस्थान च्या माध्यमातून आयोजित केलेल्या संस्कृत प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये श्री संत संत जनार्दन स्वामी संस्कृत विद्यालय काशी मधील विद्यार्थी ब्र. शिवशंकरानंद (संस्कृत व्याकरण स्पर्धेत प्रथम) व ब्र. कृष्णानंद (संस्कृत गीत स्तोत्रावली मध्ये प्रथम ) तसेच बाल गटामध्ये ब्र. ओंकारानंद (संस्कृत व्याकरण व गीत स्पर्धेत प्रथम) पारितोषिक मिळवले. या वेद गुरुकुलम् च्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम व उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन

सेवा आणि मानवकल्याणाचा मंगल संतसंगम!आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या स्नेहपूर्ण आमंत्रणावरूननिष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुर...
15/09/2026

सेवा आणि मानवकल्याणाचा मंगल संतसंगम!

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या स्नेहपूर्ण आमंत्रणावरून
निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी श्रीक्षेत्र बेंगळुरू आश्रमात परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांची आत्मीय भेट घेतली. या मंगलप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५व्या वर्षारंभानिमित्त तसेच परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या ७०व्या जन्मोत्सवानिमित्त परमपूज्य जगद्गुरुंनी
मनःपूर्वक शुभेच्छा देत स्नेहभाव प्रकट केला. श्री श्री रविशंकरजी यांनी परमपूज्य जगद्गुरूंचे विशेष संत पूजन केले.
यावेळी आश्रमीय संत व प्रतिनिधी उपस्थित होते.
जगतगुरूंनी यावेळी आश्रमाची पाहणी दरम्यान गोशाळेत श्रमदान देखील केले. दोन संतविभूतींच्या या आत्मीय भेटीतून अध्यात्म, शांती, सेवा आणि मानवकल्याणाची दिव्य चेतना अनुभवास आली. समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी अध्यात्माच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या संकल्पाला या भेटीने अधिक बळ मिळाले. हा मंगल संतसंगम असंख्य सेवाभावी कार्यकर्त्यांसाठी आणि साधकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

शांती संदेश… सेवा संकल्प… मानवकल्याणाचा ध्यास! 🙏


12/09/2026

14 सप्टेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत परमपूज्य बाबाजींच्या कुटीयात दररोज पहाटे पाच ते आठ या वेळेत एका परिवाराला पूजा पाठ करण्याचा सन्मान आहे. तरी आपल्या जवळच असलेल्या आश्रमाच्या कुटीयात आपण हा पूजा पाठ करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करा व अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा

https://jaybabaji.org/registration-2025-rzp/

Address

Om Jagadguru Janardan Swami (Maungiriji) Maharaj Ashram, Verul (Ellora), Tq. Ratnapur (Khultabad), Dist. Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad)
Ellora
431102

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwamiShantigiriji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SwamiShantigiriji:

Shortcuts

Share