24/10/2026
स्वामी कृपा सोसायटी, साई वैभव, भास्कर, इंदिरा हॉस्पिटल व बालक मंदिर परिसरात धूर फवारणी संपन्न!
प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी व डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वामी कृपा सोसायटी, साई वैभव, भास्कर, इंदिरा हॉस्पिटल परिसर, बालक मंदिर परिसर तसेच लगतच्या सर्व भागात धूर फवारणी (Fogging Work) यशस्वीरीत्या करण्यात आली. 💧✨
सध्याच्या हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि परिसर डासमुक्त राहावा, यासाठी क.डों.म.पा. आरोग्य व पेस्ट कंट्रोल विभागाच्या माध्यमातून ही धूर व जंतुनाशक फवारणी करून घेण्यात आली.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे! तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल क.डों.म.पा. पेस्ट कंट्रोल विभागाचे व सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार! 🙌🤝
आपला नम्र,
🚩 श्री. अमित महेश्वर धाक्रस 🚩
नगरसेवक – प्रभाग क्र. ८, क.डों.म.पा. | अध्यक्ष – भाजप, जुने कल्याण शहर
CivicWork Prabhag8 KalyanWest AmitDhakras KDMC BJPKalyan KalyanCity