07/10/2026
माझा वाढदिवस यंदा माझ्यासाठी नाही… तर आपल्या अन्नदात्यासाठी! 🌾🙏
आपल्या महाराष्ट्राचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी आज मोठ्या संकटातून जात आहे. त्याच्या कष्टाला, त्याच्या दुःखाला आणि त्याच्या संघर्षाला आपला हातभार लागावा, हीच माझी मनापासून इच्छा आहे.
म्हणूनच ९ ऑक्टोबर २०२६ रोजी माझा वाढदिवस कोल्हापूर येथे गरजू व संकटग्रस्त शेतकरी बांधवांसोबत त्यांना मदतीचा हात देऊन साजरा करण्याचा मी संकल्प केला आहे.
माझ्या सर्व हितचिंतकांना, मित्रपरिवाराला आणि शुभेच्छुकांना नम्र विनंती आहे की, त्या दिवशी माझ्या कार्यालयात किंवा घरी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये.
तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर, होर्डिंग्ज किंवा जाहिराती लावण्याऐवजी त्यासाठी होणारा खर्च एखाद्या गरजू शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी द्यावा.
तुमच्या शुभेच्छांपेक्षा एखाद्या शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आलेले समाधानाचे हास्य आणि त्यांच्या आशीर्वादातच मला �