30/09/2026
*कोकणातील पिढ्यिनपिढ्यांच्या जमीनी परप्रांतीयांना विकल्यास*
1. मूळ कोकणी जमीनमालक भूमिहीन होईल.
2. अडीअडचणीला कोकणी माणसाला जमीनीतून पिक घेण्याची सोय राहणार नाही.
3. गणपती सणाला लागणारे रानातील मंडपीचे साहित्य, तुळसीच्या लग्नाला लागणारी फळे, सीझणला कोकणात मिळणारा रानमेवा, फळफळावळ यासाठी परप्रांतीयांवर अवलंबून राहावे लागेल.
4. कोकणातील मंदिरे, जत्रोत्सव, सार्वजनिक विहीरी/पाणवठे परप्रांतीय धनदांडग्याच्या ताब्यात जातील.
5. कोकणातील शिमगा, फुगडी, भजने, दशावतार, पालखी व देवतांच्या मिरवणुका ईत्यादी सण/परंपरा हळूहळू बंद पडून त्याऐवजी नवरात्री गरबा, छट्पूजा, रंगपंचमी, कावडयात्रा व हायवेवरच्या मोठमोठ्या गावांमध्ये ऊडप्यांची हाॅटेल, बियरबार, डान्सबार चालू होऊन गावतील तरूणींना गावात फिरणे मुश्किल होईलच वर
-गावातील एका-दोघा पुढाऱ्यांना गावात बंगला, गाडी, जमीन व कायद्याचे रक्षणकर्ते म्हणवणार्यांना हप्ते(शंभर कोटी) मिळून बाकीच्या गावकऱ्यांना गावाबाहेर कातळावर, रानात जाऊन दिवस काढावे लागतील.(जसे मुंबईच्या चाळींमधील मूळ मराठी मुंबईबाहेर गेलेत)
6. गावात कोकणी माणसांना लग्न, साखरपुडा, वार्षिक स्नेहसंमेलन, नाटके ईत्यादी कार्यक्रम करण्यासाठी गुजराती/मारवाडी लोकांचे हाॅल भाड्याने घ्यावे लागतील.
7. गावातील ग्रामपंचायतीत परप्रांतीय उमेदवार निवडून आल्यास गावात दुकाने, फेरीवाले, व्यावसायिक यांना प्राधान्य दिले जाईल व स्थानिक कोकणी माणूस परप्रांतीय होईल.
8. कोकणातून आमदार,खासदार,मंत्री हे परप्रांतीय असतील व त्यामुळेच कोकणातील रेल्वे, पोस्ट ऑफिस, बॅका, एस.टी. महामंडळ, विज कंपणी, बंदरे, महसूल कचेरी एवढेच नव्हे तर पोलीस भरतीत सुध्दा परप्रांतीय असतील.
9. गावातील मराठी शाळा बंद पडतील व त्या जागांवर गुजराती/सिंधी लोकांचे माॅल/सुपरमार्केटम ऊभे राहतील.
10. बागायतदार हे फक्त गुजराती, ऊत्तरप्रदेशी, केरळी लोक असतील व कायमस्वरूपी कामगार हे फक्त युपी, बिहारी, नेपाळमधील लोक असतील कारण स्थानिक कोकणी कामगार हा जमीनी विकून नालासोपारा, विरार, पालघर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, बेलापूर,खारघर,पनवेल येथे स्थायिक झालेला असेल.
11. भविष्यात कोकणी माणसांच्या नातवंडांना कोकण हे सिनेमात किंवा गोष्टीतून पहायला मिळेल.
12. जमीनीला रियल इस्टेट म्हणतात. तसेच जमीन बनवता येत नाही. जगाच्या पाठीवर जमीनी कमी होत जाताहेय. वाढत नाहीत .
म्हणूनच जमीनीचे भाव वाढत जातात. *वीस वर्षांपूर्वीच एक हजार गुंठ्याने* विकलेली हायवेवरील *जमीन सध्या एक* *लाख गुंठा* झालेली आहे(म्हणजे शंभर पटीने)आणखी पंचवीस वर्षांनी ती *दहा लाख* गुंठा असेल. आणि ही किंमत जमीनी विकत घेणाऱ्या गुजराती/मारवाडी/बिहारी/केरळमधील लोकांच्या नातवंडांना मिळेल. जमीन विकणारा कोकणी माणूस ह्या जमीनीत परप्रांतीय असेल. कदाचित भिकारी म्हणून हाकलून दिला जाईल व त्याच्याबरोबर जमीनीची दलाली करणारे दलालसुध्दा. कारण दलालीतून मिळणारे हजारो रूपये केव्हाच संपलेले असतील.
मात्र ती पूर्वजांनी काबाडकष्ट करून *राखलेली जमीन संपलेली नसेल.*
*तिथेच राहील. आठवणींवर अश्रू ढाळत.*
*कारण*
*तिच्या पाठीवर कधीतरी कोकणी माणसाचा बैल नांगर घेऊन चालत होता,
*आंब्या-फणसाची झाडे होती, *गाई-वासरे चरत होती,
*गणपतीची आरती तीला ऐकू येत होती, *रानातले गाऱ्हाणे, वडे-ऊसळीचा आस्वाद तीने घेतला होता,
*शिमग्याचे खेळे नाचताना तीने पाहिले होते,
*चतुर्थी-संकष्टीला मोदकाचा सुगंध तिच्याभोवती दरवळला होता ,
*ॠषीच्या ऊपवासाला तीच्याच भूभागावर पावसात उगवत असलेल्या अळूची भाजीची दरवर्षी ती आतुरतेने वाट पहात होती,
*गौरीची टाकळयाची भाजी व भाकरीची चव तीने घेतली होती,
*गणरायाला विसर्जन करताना त्याची मूर्ती नजरेआड होताच त्या डोळयात अश्रू दाटत होते, तीच्या कुटुंबातील कोणितरी दूर जात असलेल्या भावनेने,
*तुळशीच्या लग्नातली रांगोळी तीला सजवत होती, लगनातली मंगलाष्टक तीला पाठ होती, प्रसादातले पोहे व साखरफुटाणे तीने चाखले होते.
*गावच्या जत्रेतला मालवणी खाजा, आलेपाक ती चवीने खात होती.
*मात्र*
हे सगळ आठवून ती कोकणची तांबडी माय अश्रू ढाळत बसेल जर ह्या परंपरा, हे सण, हे ऋणानुबंध विसरून तीचा कोकणी माणूस पैसाच्या हव्यासापोटी त्या जमीनीलाच विकू लागला तर,
विकून गेला तर???
😓😔
माहिती साभार ✍🏻________ DM FOR CREDIT
📸 Rohit Bhide