Digvijay Bagal Fc

Contact the organization

Digvijay Bagal Fc महायुती उमेदवार २०२४ |करमाळा माढा विधानसभा
मा चेअरमन मकाई सह सा कारखाना
मा जिल्हा नियोजन समिती सदस्य
सह अध्यक्ष,मुख्यमंत्री पाणंद रस्ता समिती

कोर्टी ता करमाळा येथील ह भ प कौस्तुभ महाराज चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपा जिल्हा युवा नेते मा ...
28/09/2026

कोर्टी ता करमाळा येथील ह भ प कौस्तुभ महाराज चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी आज कोर्टी येथे कार्यक्रमास उपस्थित राहून ह भ प यश महाराज पालवे आळंदी पुणे यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी भाजपा जिल्हा युवा नेते माननीय दिग्विजय बागल यांनी ह भ प कौस्तुभ महाराज चव्हाण यांचा सत्कार केला तसेच माननीय ह भ प यश महाराज पालवे यांनी मा दिग्विजय बागल यांना या निमित्ताने आशिर्वाद दिले

भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी आज करमाळा शहरातील श्री इरफान कुरेशी यांच्या मुलीच्या करमाळा येथील धर्मसंगी...
28/09/2026

भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी आज करमाळा शहरातील श्री इरफान कुरेशी यांच्या मुलीच्या करमाळा येथील धर्मसंगीत मंगल कार्यालय येथे सायंकाळी संपन्न झालेल्या विवाह समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या विवाह समारंभाच्या निमित्ताने माजी उपनगराध्यक्ष मा अहमद चाचा कुरेशी यांनी आदरातिथ्य केले.

मांगी तलाव परिसरातील वीज पुरवठा महावितरणने अचानक खंडित केल्याच्या निषेधार्थ वडगाव (दक्षिण), वडगाव (उत्तर), मांगी, वरवाडी...
28/09/2026

मांगी तलाव परिसरातील वीज पुरवठा महावितरणने अचानक खंडित केल्याच्या निषेधार्थ वडगाव (दक्षिण), वडगाव (उत्तर), मांगी, वरवाडी, जातेगाव, रायगाव आदी गावांतील शेतकरी बांधवांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास भाजप जिल्हा युवा नेते मा. दिग्विजय बागल यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. मांगी तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यास शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या विहिरी किंवा बोअरवेल आहेत, त्यांचा वीज पुरवठा तरी चालू ठेवावा अशी आग्रही मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. वीज पुरवठा बंद केल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या या समस्येवर बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, "महावितरणच्या अशा धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नी मी स्वतः जातीने लक्ष घालून मा. जिल्हाधिकारी व मंत्रालय पातळीवर तातडीने पाठपुरावा करेन आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन."
#नेता #करमाळा

मौजे वांगी नं. २, ता. करमाळा येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प ...
28/09/2026

मौजे वांगी नं. २, ता. करमाळा येथे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प सप्ताहा’च्या निमित्ताने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विशेष कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हा युवा नेते मा. दिग्विजय भैय्या बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सोलापूरच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मा. अमृता वाघे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. गणेश चिवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे तसेच पोषण आहाराच्या संदर्भातील स्टॉलची मान्यवरांनी पाहणी केली.
यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी अंगणवाडीतील शिक्षण हे केवळ शिक्षण नसून, लहान मुलांच्या आयुष्यात संस्कारांची शिदोरी देणारे कार्य आहे, असे सांगितले. बालकांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविका व मदतनीसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि समर्पणभावनेने भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
💐 अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या उल्लेखनीय कार्याला मनापासून सलाम!

वांगी नं. २, ता. करमाळा येथील माजी सभापती श्री. लक्ष्मणदादा महाडिक यांचा सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अपघात झाला होता. या अ...
28/09/2026

वांगी नं. २, ता. करमाळा येथील माजी सभापती श्री. लक्ष्मणदादा महाडिक यांचा सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात आले.
उपचारानंतर त्यांच्या निवासस्थानी भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी सदिच्छा भेट देत लक्ष्मणदादा महाडिक यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्या तब्येतीची माहिती घेत दिग्विजय बागल यांनी महाडिक दादांच्या लवकर आणि पूर्ण प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मणदादा महाडिक लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा आपल्या सामाजिक कार्यात सक्रिय व्हावेत, ही सदिच्छा! 🙏

महान क्रांतिकारक ,शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐
28/09/2026

महान क्रांतिकारक ,शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐

श्री सतीश खाटमोडे यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभ कार्यक्रमास आज सावडी फाटा येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे भाजपा जिल्ह...
21/09/2026

श्री सतीश खाटमोडे यांच्या कन्येचा साखरपुडा समारंभ कार्यक्रमास आज सावडी फाटा येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे भाजपा जिल्हा युवा नेते मा. दिग्विजय बागल यांनी सदिच्छा भेट देऊन खाटमोडे परिवारास शुभेच्छा दिल्या.

श्री मच्छिंद्र गोरख चौधरी रा झरे ता करमाळा यांच्या मुलाच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने विवाह समारंभास भाजपा जिल्हा युव...
21/09/2026

श्री मच्छिंद्र गोरख चौधरी रा झरे ता करमाळा यांच्या मुलाच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने विवाह समारंभास भाजपा जिल्हा युवा नेते मा दिग्विजय बागल यांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ...
20/09/2026

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन देणारे आपले नेतृत्व महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या हातून जनसेवेचे कार्य अधिक जोमाने घडत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Ravindra Chavan BJP Maharashtra

भारताचे कणखर नेतृत्व, यशस्वी पंतप्रधान आणि अहोरात्र देशसेवेत समर्पित माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढ...
17/09/2026

भारताचे कणखर नेतृत्व, यशस्वी पंतप्रधान आणि अहोरात्र देशसेवेत समर्पित माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा!

Address

A/P Mangi, Tal. Karmala, Solapur
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digvijay Bagal Fc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Digvijay Bagal Fc:

Shortcuts

Share