KMC Primary Education Committee

KMC Primary Education Committee प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर मधील सुरू असणारे विविध उपक्रम

*प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स...
21/07/2026

*प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर आयोजित मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा*

*सदर स्पर्ध्यातील सर्व विजयी, उपविजयी, तृतीय संघास राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत राजेंद्र घारगे यांचे स्मरणार्थ अवधूत घारगे फाउंडेशन यांचे वतीने श्री राजेंद्र घारगे यांनी आकर्षक ट्रॉफी देण्यात आली*

बक्षीस समारंभ मान्यवर : पोलीस शहर उप अधीक्षक व व्हॉलीबॉल खेळाडू सौ. प्रिया पाटील, उपमहापौर व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू श्री अक्षय जरग, सभापती प्राथमिक शिक्षण समिती सौ शिला सोनुले, नगरसेवक व राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू श्री अश्किन आजरेकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व सेवानिवृत्त पोलीस सुनिल ठोंबरे, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, महाराष्ट्र हायस्कुल प्राचार्य एस ए जाधव, कोल्हापूर सॉकर रेफ्रि असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर

*दिनांक 20.7.2026 रोजी संजीवन विद्यानिकेतनचे श्री सौरभ भोसले व फुटबॉल कोच अमित साळोखे यांचे सहकार्याने सदर स्पर्धा संजीवन विद्यानिकेतन, पन्हाळा येथे पार पडल्या तर बक्षीस समारंभ आज 21.7.2026 रोजी उपरोक्त मान्यवारांच्या उपस्थितीत विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडला.*

*17 वर्ष मुले*

सेमी 1. महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध सौ स. म. लोहिया हायस्कुल 6-0 महाराष्ट्र कडून राजवीर खराडे तीन संचित उपलानी ऋतुराज वीर सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल

सेमी 2. विद्यापीठ हायस्कूल विजयविरुद्ध कोल्हापूर हायस्कूल 1-0 विद्यापीठ कडून पार्थ सुतार 1 गोल

तृतीय क्रमांक : कोल्हापूर हायस्कूल विजयविरुद्ध सौ स म लोहिया हायस्कुल 0-0 कोल्हापूर हायस्कुल 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय

अंतिम सामना : महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध विद्यापीठ हायस्कूल 4-0 महाराष्ट्र कडून साईराज पाटील 2, राजवीर खराडे सम्राट मोरबाळे प्रत्येकी एक गोल

अंतिम विजयी संघ : अजय वडार श्रीराम रजपूत सार्थक विटेकर वंश आगावणे ऋतुराज वीर सम्राट मोरबाळे साईनाथ सुतार केदार सोनाळे साईराज पाटील संचित उपलानी संकेत जाधव अर्णव शिंदे श्लोक माळी राजवीर खराडे पृथ्वेश बागडेकर श्रेयश धुमाळ
क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही. एस. पाटील शरद मेढे सूर्यजित घोरपडे सतीश भोसले संतोष पोवार

*17 वर्ष मुली*
अंतिम सामना : उषाराजे हायस्कूल विजयविरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एसएससी 2-0 उषाराजे कडून सही नलवडे प्रांजली गाडीवडर एक गोल

विजयी संघ : आदिती पाटील समृद्धी जाधव सई नलवडे श्रुती निपाणीकर शिवांजली खरबडे शर्वरी कोरे वैष्णवी हजारे महेक शेख प्रांजली गाडीवडर पूर्वी पोवार पायल जाधव जान्हवी पाटील आर्या कांबळे आरोही चव्हाण आराध्या शिंदे सृष्टी वांद्रे क्रीडा शिक्षक रघु पाटील मार्गदर्शक चव्हाण सोनल

स्पर्ध्येला पंच म्हणून कामकाज : गजानन मनगुतकर निरंजन कमते शरद शिर्के ओंकार लोकरे पृथ्वीराज अवघडे प्रसाद कोरडे अक्षय मंडलिक संकेत साळुंखे संदीप पाटील ऋषिकेश दाभोळे

स्पर्धा आयोजन मनपा क्रीडा निरक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.

*मनपा.श्रीम.लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर**◆━━━━━★▣✦▣★━━━━━◆*          *लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यामंदिरच...
16/03/2026

*मनपा.श्रीम.लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर*
*◆━━━━━★▣✦▣★━━━━━◆*
*लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यामंदिरचे विद्यार्थी आता करणार हायटेक लर्निंग*

📡💻 ⌨️ *महाराष्ट्रातील महानगरपालिकेची पहिलीच हायटेक शाळा*

🖥️ 🖱️ *Futuristic Classroom Lab* *चे उपमहापौर श्री अक्षय जरगसो यांच्या हस्ते उद्घाटन*
*◆━━━━━★▣✦▣★━━━━━◆*

श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदीर ही शाळा शिक्षण, संस्कार आणि गुणवत्ता यांचा सुंदर संगम आहे. येत्या गुढीपाडव्याला शाळेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासामध्ये शाळेने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. आजपर्यंत शाळेचे 400 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तर शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थी राज्यात प्रथम आले असून एक वेगळा इतिहास शाळेने घडवला आहे. *सर्वाधिक पटसंख्येची महाराष्ट्रातील शाळा* म्हणून शाळेने वेगळा नावलौकिक मिळविला आहे. यासोबतच शाळेत डिजिटल क्रांती घडत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शालेय गुणवत्तेच्या आधारावर शाळेस या आयडियल सेंटरचे मानांकन मिळाले .त्यामुळे *अत्याधुनिक लॅब असणारी कोल्हापूर शहरातील पहिलीच शाळा ठरली आहे.*
विद्यार्थ्यांना *महत्वाच्या संकल्पना सहज व मूर्त स्वरुपात समजावून सांगण्यासाठी या लॅबचा वापर होणार आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड, स्टुडन्ट ई-पोडियम ,टीचर्स ई-पोडियम, DLP अंतर्गत सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम आयडियल सेंटरमध्ये उपलब्ध आहे.*
या *Futuristic classroom* मध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण 24 स्वतंत्र हायटेक टचस्क्रीन प्लॅटफॉर्म आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र कंट्रोलिंग टचस्क्रीन प्लॅटफॉर्म सहित इंटरऍक्टिव्ह बोर्ड , उपलब्ध करून दिले आहेत. एकूणच हायटेक बैठकव्यवस्थेसह विद्यार्थी आता हायटेक लर्निंग करणार आहेत. याद्वारे विद्यार्थी कोणत्याही असाइनमेंट किंवा पेपर देखील सहज सोडवू शकणार आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा विद्यार्थांना गुणवत्ता वाढीसाठी फायदा तर होणारच आहे. पण या तंत्रज्ञानाच्या युगात नक्कीच आमचा विद्यार्थी गरुडझेप घेणार आहे.
आज कोल्हापूर नगरीचे उपमहापौर श्री. अक्षय जरगसो यांच्या शुभहस्ते या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन पार पडले. याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका सौ.सुषमा जरग, नगरसेवक श्री. दुर्वास बापू कदम, श्री. विजयसिंह खाडे पाटील, ॲड.मानसी लोळगे यांनी विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक लॅबच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देऊन सदैव शाळेच्या पाठीशी राहण्याबाबत आश्वस्त केले.
याप्रसंगी श्री संतोष जरग, श्री प्रशांत जरग,सौ वैभवी जरग, अर्जुन जरग, सतीश लोळगे, विमल गवळी, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे ,विजय माळी ,चंद्रकांत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीता ठोंबरे, उपमुख्याध्यापक श्री. शिवाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील व सदस्य , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी आर पिंपळकर व श्री सुभाष मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्री दत्तात्रय पाटील ,योगेश व्हटकर ,वैशाली शेलार यांनी केले.

10/03/2026
10/03/2026

💻 *दप्तराच्या ओझ्याकडून की-बोर्डच्या वेगाकडे...*
*मनपा शाळांची पावले आता डिजिटल युगाकडे!* 🚀

*​कोल्हापूर महानगरपालिकेच्या 11 शाळांमध्ये अद्ययावत ICT संगणक लॅब्स कार्यरत आहेत, तर 7 शाळांमध्ये 'डी-मार्ट फाउंडेशन'च्या (D-Mart Foundation) विशेष सहकार्यातून अत्याधुनिक संगणक लॅब उभारण्यात आल्या आहेत!* 🖥️✨ 🖥️✨

​आता आमचा मनपा शाळेतील विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवणार! 🎓🤝

​चला, आपल्या पाल्याचे भविष्य 'हाय-टेक' बनवूया!
*आजच कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊया .*. 🏫🚩

*𝕍𝕚𝕕𝕖𝕠 ℂ𝕣𝕖𝕕𝕚𝕥𝕤* :
🎥 *ℂ𝕚𝕟𝕖𝕞𝕒𝕥𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪*: Sandip Jadhav
✂️ *𝔼𝕕𝕚𝕥𝕚𝕟𝕘*: Yuvraj Erudkar

10/03/2026

*कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा: स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची नवी ओळख!* 🎓✨

​इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 'के.टी.एस.' (KTS - Kolhapur Talent Search), प्रज्ञाशोध परीक्षा, राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती परीक्षा व इतर विशेष स्पर्धा परीक्षा, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि थेट 'इस्रो' (ISRO) सहलीची सुवर्णसंधी! 🚀📖
*​अनुभवी शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची खात्री...* 🤝
​चला, आपल्या पाल्याचे भविष्य घडवूया...
आजच कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊया ! 🏫🚩

​📽️ Video by : Sandip Jadhav & Publicity Team

Address

Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KMC Primary Education Committee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share