Shivba Sanghatna

Call Contact the organization

Shivba Sanghatna Raje Chatraptu Shivba Yuva Samajik Sanghatna

10/03/2024
05/12/2023
01/12/2023

🚩जालना सभा 🚩

23/11/2023

🚩शिवतीर्थ रायगड 🚩

आज धोंडाराई येथे सभा 🚩
23/11/2023

आज धोंडाराई येथे सभा 🚩

23/09/2023

उद्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट व सांत्वन
*मनोज जरांगे पाटील*
*उद्या (24 सप्टें) जातेगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भेटीला जाणार*

दु. 3.30 तलवाडा फाटा,

दु.3.40 कोल्हेर फाटा,

दु.3.50 किनगाव,

दु.4.10 तलवाडा,

दु.4.30 राजापूर - गोळेगाव मार्गे जातेगाव याठिकाणी चव्हाण कुटुंबियांची भेट व सांत्वन

यानंतर,
दु.5:10 ठाकर आडगाव ,

दु.5:20 बेलगुडवाडी ,

दु.5:30 रोहितळ ,

दु 5:45 केकत पांगरी ,

सायं 6:00 वा. नवनिर्माण गणेश मंडळाची आरती गेवराई*

रात्री 8:00 वा. शिवनेरी गणेश मंडळ गेवराई आरती*

( *टिप:- *आजूबाजूच्या गावातील सर्व मराठा बांधवानी जमेल तिथे हजर राहावे*)

( *सर्व मराठा बांधवासाठी मनोज जरांगे पाटील यांचा शब्द अंतिम असेल*)

23/09/2023
10/09/2023
15/01/2023

मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा💐💐🙏

भांबेरी गावचा लढा आणि मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी १४आँगस्ट२०२२ ला बैठक बोलावली व पुन्हा २५आँगस्ट२...
28/08/2022

भांबेरी गावचा लढा आणि मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी १४आँगस्ट२०२२ ला बैठक बोलावली व पुन्हा २५आँगस्ट२०२२ला मुंबईतील साह्याद्रीवर बैठक बोलावली, पण...?
----------------------------------------
महाराष्ट्रातील मराठा भावांनो खर सांगतो, मुंबईत गेल्यामुळे आमचे डोळे उघडले, यातून आम्ही एक यापुढे मात्र शिकलोत की, यापुढे आपणच आपला लढा लढवायचा आणि तोही गरजवंत गरिब मराठ्यांनीच यापुढे आपला भवितव्याचा लढा सर्व शक्तीनिशी उभारायचा आणि आपल्यालाच तो लढावाच लागणार आहे, हे मी ठामपणे सांगतो आणि ते स्पष्टपणे लक्षातही आले आहे आमच्या आता, महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांनो निर्णायाचे श्रेय कोणीही घेवो, तो वादाचा विषयच नाही, पण बैठकीला बोलवायचे आणि तिथे मराठा समाजाची बाजू मांडू न देण्याचा प्रयत्न करायचा, हे सरकारचे ठरवून केलेले षडयंत्रच मुळात आम्हाला मान्यच नाही, परंतु एक मनापासून हा आनंद आहे की, आज आपल्या २०१४ ते २०१९च्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याचा विषय निकाली निघाला आणि त्या विद्यार्थ्याला त्यांच्या आयुष्याची भाकरी मिळाली, याचे मला व माझ्या सकल मराठा समाजाला मनापासून समाधान आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्यामुळे संपूर्ण भांबेरी गावकरीही मनापासून आनंद व्यक्त करत आहे. या दोन्ही बैठका भांबेरी गावकर्‍यांमुळेच लागल्या आहेत, हे जनतेला माहितच आहे.

दि.८आँगस्ट२०२२ला, आपल्या भांबेरी गावात "आमरण उपोषण" मराठा आरक्षण आणि इतर ९ मागण्यांसाठी सुरू झाले आणि मा.नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून १० आँगस्टला मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहा मला फोन लावले आणि व्हिडिओ हि तयार करून पाठवला व आम्हाला मागण्याबाबत मार्ग काढू असे आश्वासनही दिले, पण आम्ही सरकारसोबत प्रत्यक्ष चर्चेशिवाय आंदोलन थांबवायचे नाही हे ठरवले होते, म्हणून पुन्हा मा. मुख्यमंत्री साहेबांनी १३आँगस्ट२०२२ला श्री. अर्जुन भाऊ खोतकर यांच्या फोनवरून मा. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटिल यांच्याशी अंदाजे २५ ते ३० मिनिटे फोनवर चर्चा केली, यावेळी संपूर्ण भांबेरीतील गावकरी सुध्दा हि चर्चा ऐकत होते आणि मा. मुख्यमंत्री साहेबांनी बोलताना सांगितले की, आपण आज वैद्यकीय उपचार घ्यावेत, तुमची बैठक उद्याची उद्याच लगेच लावतो, म्हणजे १४आँगस्टलाच, सायंकाळी ५ वाजता,बैठक घेतो, आपले भांबेरी गावचे शिष्टमंडळ १४आँगस्टला मुंबईत पाठवा असे मुख्यमंत्री साहेब म्हणाले आणि बैठक बोलावली पण होती,पण त्याच दिवशी ती बैठक सरकारने रद्दही केली होती, कारण मराठा आरक्षणासाठी, सरकारला घाम फोडणारे, मराठ्यांचा बुलंद आवाज आ. विनायकजी (बप्पा) मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाले होते.

त्यानंतर दि.१५आँगस्ट२०२२ला मा. मुख्यमंत्री साहेबांनी कृषीमंत्री ना, अब्दुलजी सत्तार व मा.मंत्री मा.अर्जुनजी खोतकर यांना भांबेरी गावात आमरण उपोषण ठिकाणी पाठवले व त्यांनी लेखीपत्र आम्हाला दिले की, येत्या ४ दिवसात पुन्हा तुमची बैठक मुंबईत घेऊन, आपल्या मागण्याविषयी बैठकीत चर्चेतून सर्व विषय मार्गी लावू, तुम्ही आमरण उपोषण स्थगित करावे, मग आम्ही मा. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवून, उपोषणाच्या ८ व्या दिवशी भांबेरी गावातील आमरण उपोषण स्थगित केले.

त्यानंतर दि.२५आँगस्ट२०२२ला आपली साह्याद्रीवर बैठक लावली आहे, असे मा.मंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांनी आम्हाला फोन करून दोन दिवस आधीच कळवले, मा. कलेक्टर साहेब जालना, मा. एस.डी.एम. अंबड, मा. अंबड तहसिलदार साहेब यांनी आम्हाला मुंबईतील साह्याद्रीवरील बैठकीचे अधिकृत लेखीपत्र सुध्दा दिले.

आणि आम्हीही आता सर्व मागण्या मा. मुख्यमंत्री साहेब व मा. उपमुख्यमंत्री साहेब मंजूर करतील, हि भोळी आशा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालो, आज आपल्या गोरगरीब मराठा समाजाच्या सर्व मागण्या मंजूर होतील, कोट्यावधी मराठा तरूणांचे कल्याण होईल, हि भोळीभाबडी आशा समस्त भांबेरी गावातील माता माऊल्या व गावकरी मनात आशा बाळगून होते, सरकारच्या निर्णयाकडे आशा लावून बसले होते, आणि भांबेरी गावचे शिष्टमंडळ मुंबईतील साह्याद्रीवर पोहचले, बैठक सुरू झाली, मा. मुख्यमंत्री साहेबांचे सर्व अधिकारी वर्गाने बैठकीत बसलेल्या सर्व मराठा समन्वयक बंधूंना आज २५ आँगस्ट रोजी, होणार्‍या बैठकीतील चर्चेच्या मुद्दाची माहिती पुस्तिका सर्वांना वाटप केली (ते अधिकृत शासकीय प्रोसेडिंग बुक असावे) ते सर्वांना दिले, त्या शासकीय बुकावर लिहिलेले होते, "मराठा आरक्षण" विषयी मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आणि शेवटच्या पानावर लिहिलेले होते, जालना येथील आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटिल यांच्या मागण्या असे लिहलेले होते. आणि ती "नियोजित शासकीय बैठक पत्रिका" हि ३०ते ४० पानाची आहे, म्हणजेच ती २५आँगस्ट२०२२ची बैठक भांबेरी गावामुळेच लावलेली होती हे पण खरेच आहे, तरीही भांबेरी गावातील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री साहेबांच्या व उपमुख्यमंत्री साहेबांच्या मंत्री लोकांनी दुटप्पी भूमिका घेऊन, बैठकीत आम्ही बोलूच नये असा प्रयत्न का केला ? आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय म्हणून सरकारचे मंत्री शंभूराज देसाईंनी मी प्रस्ताव मांडू,बोलू नये असा प्रयत्न का केला ? आम्ही गरजवंत गरिब मराठ्यांसाठी लढतोय म्हणून आम्हाला सर्व मंत्र्यांनी मिळून न बोलू देण्याचा का प्रयत्न करत होते ? आम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या म्हणून मागणी करत आहोत म्हणून मला थांबण्याचा मंत्र्यांकडून का प्रयत्न होत होता ? ओबोसींना मंडल आयोगाने १४% आरक्षण दिले होते, मग उर्वरीत आरक्षण त्यांनाच पुन्हा का दिले? आम्ही निवेदनातून विचारले म्हणून आम्हाला बोलू न देण्याचा तो केविलवाणा प्रयत्न का करत होते मंत्री ? कोपर्डी खटला तातडीने सुरू करा हि मागणी केली म्हणून आम्हाला सारखे सारखे मंत्री मधेच थांबवण्याच्या प्रयत्नात का असायचे ? आम्हाला तर मा. मुख्यमंत्री साहेबांनी अधिकृत बैठकीचे निमंत्रण पाठवले होते,तरीही मग आम्हालाच कशामुळे जाणिवपूर्वक ठरवूनच बैठकीत बसायलाच जागा का ठेवली नाही ? जर आम्हाला बोलूच न देण्याचा सरकार प्रयत्न करणार होते तर मग आम्हाला बैठकीस सरकारने बोलवायचेच नव्हते ना ? हा सरकारने ठरवून आमच्याशी दगाफटका केला आहे ? त्या बैठकीला आम्ही मुळीच मानपानासाठी आलोच नव्हतो, कारण आम्ही गाव खेड्यातील पोर आहोत, आम्हाला फक्त न्याय हवाय, आम्ही चिखलातही बसू, फक्त यापुढे असा ठरवून कावा आमच्याशी सरकारने करू नका ? कारण आम्ही काय कच्या तालमीतले नाहीत,आम्ही पण तुम्हाला जशाच तसेच उत्तर दिलेच आहेत.
आज मायबाप सरकारकडून आम्हाला आशा होती की, माझ्या महाराष्ट्रातील गरिब मराठ्यांना न्याय मिळेल, आजच्या बैठकीत एक घाव दोन तुकडे होतील, आशा बाळगून आम्ही सरकारच्या या बैठकीला आलो होतोत, मा. मुख्यमंत्री साहेब व मा.उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला गरिब मराठ्यांची बाजू मांडू देतील पण सरकारचे काही मंत्री आम्हाला मात्र मराठा आमरण विषयावर बोलू न देण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा दबाव हाणून पाडला आहे, या मंत्र्यांनी आमच्यावर किती दबाव आणला होता, हे बैठकीला बसलेल्या सर्व मराठा समन्वयक बांधवांनी प्रत्यक्ष बघितले आहे तिथे साह्याद्रीवर...? परंतु एक आनंद आहे की, श्रेय कोणीही घेवो, तो विषयच नाही, मात्र आज एक आनंद आहे की, २०१४ते २०१९ च्या निवड झालेल्या २१८५ विद्यार्थ्यांच्या नियुक्त्याचे बील विधानसभेत मंजूर झाले व माझ्या त्या गरिब मराठ्यांच्या पोरांचे काम झाले, याचा आनंद मनात खुप झाला आहे.

मा. मुख्यमंत्री साहेबांच्या मंत्री महोदयांनी माझ्यावर ठरवून प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण मीही मराठ्यांचा गावखेड्यातील पोरगा आहे, दबाब आणणाऱ्या मंत्र्यांनाही मी सडकून छापले आणि ओबीसीतून आरक्षण पाहिजेच, सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या म्हणून पोटतिडकीने मा. मुख्यमंत्री साहेबांसमोर विषय मांडलाच, मला जाणूनबुजून ठरवून विरोध करणाऱ्या सरकारच्या मंत्र्यालाही मी माझ्या गरिब मराठ्यांच्या हक्कासाठी धारेवरच धरले होते आणि आम्ही न्याय तर घेणारच, हे आम्हाला ठरवून विरोध करणाऱ्या त्या मंत्र्यांना आम्हीही ठणकावून सांगितले आहे.

पण या मुंबईतील बैठकीला गेल्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, इथे ठरवून जाणूनबुजून विश्वासघात केला जातो, महाराष्ट्रातील मराठा भावांनो यापुढे "आपला लढा आपल्यालाच लढावा" लागणार आहे, महाराष्ट्रातील गरिब गरजवंत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी यापुढील लढा गरवंतालाच लढावा लागणार आहे.
मुंबईत गेल्यामुळे आमचे डोळे उघडले आहेत. यापुढे सावधान आणि लढाही यशस्वीच करणार, आता पुढिल लढा हा टोकाचाच अन् प्रचंड ताकदीचाच उभारणार आहे, आता सरकारने फक्त बघतच रहावे कि, खेड्यातील गरजवंत मराठ्यांच्या पोरांचा उठाव किती प्रचंड ताकदीने उसळतोय ते आता तुम्ही बघाच, आम्ही कसा तुम्हाला आता घाम फोडतोय आम्ही तेही तुम्ही आता बघतच रहा, वा रे वा मायबाप सरकार...
आपलाच...मनोज जरांगे पाटिल.

Address

Korba

Telephone

9823023877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivba Sanghatna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivba Sanghatna:

Shortcuts

Share