MNVS KURLA Vidhansabha

MNVS KURLA Vidhansabha

Share

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
कुर्ला विधानसभा

Photos from MNVS KURLA Vidhansabha's post 09/03/2023
09/03/2023
06/10/2022

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची वज्रमूठ बांधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील कर्तृत्ववान युवा नेते मा. श्री. अमित राजसाहेब ठाकरे ६ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महासंपर्क अभियानासाठी अमितसाहेबांना हार्दिक शुभेच्छा !

23/09/2022

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील.
ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

Want your business to be the top-listed Government Service in Kurla?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Nehru Nagar
Kurla