30/05/2026
MNS Updates
भारताचे सरन्यायाधीश बेरोजगार युवा पिढीला कॉकरोच बोलल्यानंतर, एक मराठी तरुण सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावाने खूप मोठी मोमेंट उभी करतो. काही तासातच त्याचे फॉलोवर्स काही मिलेनियम पर्यंत पोहोचतात. याचा अर्थ देशातील शासन व्यवस्थे विरोधात तरुणाईचा असलेला आक्रोश आहे.. मग मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कायम लढणाऱ्या आमच्या राजसाहेबांना संधी का मिळत नाही? या मागचा मराठी माणसाच्या मानसिकतेचा, नेमक्या अपेक्षित रणनीतीचा अभ्यास करून ही मोहीम "महाराष्ट्र सैनिक" उभी करतील, तर त्याला पाठिंबा द्याल का? कारण इथ सोशल मिडियावरील कॉक्रोच म्हणून संभावना केलेली तरुणाई नाही,
तर मराठी माणसासाठी कायम रस्त्यावर उतरणारे, प्रसंगी आपल्या माणसांसाठी न्याय हक्कासाठी स्वतःच्या शरीराला इजा करून घेतलेले, खाकी वर्दीचा त्रास सहन केलेले, प्रस्थापितांच्या माजाला नडलेले महाराष्ट्र सैनिक आहेत. नक्की विचार करा, कारण महाराष्ट्र परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात ओरबाडायला घेतला आहे. इतका की, मराठी माणसाचा कुळाचार बिघडवत घरात हिंदी, भोजपुरी, मघधी भाषा बोलणारी सोयरिक पण घुसली आहे. ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सत्यनाशाची सुरुवात आहे.
Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut
21/05/2026
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी लढणाऱ्या मा.राजसाहेब ठाकरे व सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन...
17/05/2026
आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे! - अमित ठाकरे
08/05/2026
👉मनसे नेते, संदीप देशपांडे यांची BMC अधिकाऱ्यांवर टीका ✅
Sandeep Deshpande Adhikrut
04/05/2026
आपले महाराष्ट्र सैनिक विश्वास दाते आणि सायली सोनावणे यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. या दोघांच्या सतर्कतेमुळे एका १३ वर्षाच्या मुलीचा जबरदस्तीने लावला जाणारा विवाह थांबला आणि इतकंच नव्हे तर एका सामाजिक संस्थेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली.
घटनाक्रम खालील प्रमाणे
#बिड जिल्ह्यातील, #काप्रेवाडी ह्या गावात एका १३ वर्षांच्या भाग्यश्री दिनकर कापरे ह्या मुलीचे २८ वर्षांच्या व्यक्तिसोबत १ मे रोजी लग्न लावण्यात येणार असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक ११४ चे उपशाखाध्यक्ष श्री विश्वास दाते ह्यांनी ही माहिती मनसेच्या IT सेल च्या गृप वर टाकली
ही माहिती मिळताच मुंबईत चं शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सायली सोनवणे यांनी ला त्वरित फोन करून ही माहिती कळवली व सतत *पाठपुरावा केला आणि काहीही करुन हे लग्न थांबल पाहिजे अशी विनंती त्यांनी Child help line ला केली
ह्या नंतर लगेचच युध्द पातळी वर सर्व कामाला लागले आणि बिड जिल्यातील काप्रेवाडी शोधुन, शेतात राहणार्या भाग्यश्रीच घर शोधून काढण्यात आलं आणि ठरलेलं लग्न थांबवण्यात आलं. आणि इतकंच नव्हे तर चाईल्ड हेल्प या संस्थेने भाग्यश्री आणि तिच्या तीन बहिणींच्या शिक्षणाची सोय देखील केली.
चाईल्ड हेल्प चे मनसे आभार आणि व्हाट्स अप सारख्या समाज माध्यमाचा उपयोग चांगला बदल घडण्याकरिता कसा केला जाऊ शकतो याचा आदर्श घालून दिल्याबद्दल विश्वास दाते आणि सायली सोनवणे यांचं मनःपूर्वक अभिनंदन !!
MNS Adhikrut MNS Updates मनसे महाराष्ट्र सैनिक