Directorate of Municipal Administration, Maharashtra

Directorate of Municipal Administration, Maharashtra

Share

Official Page of Directorate of Municipal Administration, Maharashtra

02/11/2023

अंबरनाथ शहरात झोपडपट्टीमुक्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील झोपडपट्ट्या मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर विकसीत करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवण्यात येणार आहे. यात प्रकाशनगर भागात सर्वप्रथम ही योजना राबवण्यात येणार आहे.

अंबरनाथ शहरातील बहुतांश रहिवासी भाग चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये विभागला आहे. या झोपडपट्ट्यांमुळे शहरात मोठे रस्ते, प्रकल्प उभारण्यात अडचणी येतात. पायाभूत सुविधा पुरवण्यातही अडचणी येत असतात. त्यामुळे या झोपडपट्ट्या हटवून त्या ठिकाणी इमारती बांधण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न झाले आहेत. गेल्या वर्षात अंबरनाथ नगरपरिषदेने शहरातील झोपडपट्टी अधिसूचीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अंबरनाथ शहरात सध्या ५२ झोपडपट्टी असून सुमारे एक लाख लोकसंख्या या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. त्यांना पुरेशा सोयी सुविधा देत त्याचा विकास करण्याच्या हेतूने शहरात नगरपरिषदेने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.



Ambarnath Municipal Council Maharashtra DGIPR

31/10/2023
Photos from Urban Development Department Government of Maharashtra's post 31/10/2023
31/10/2023

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळेत शिकणारे काही निवडक विद्यार्थी स्टुडंटस् एक्सचेंज प्रोग्रॅमअंतर्गत दोन महिन्यांसाठी जर्मनील्या इंगोलस्टॅड शहरात पाठवले जाणार आहेत. २०२१ मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेने जर्मनीच्या इंगोलस्टॅड शहराबरोबर 'सिस्टर सिटी'चा करार केलेला आहे. . दरवर्षी विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथून इंगोलस्टॅड शहरात पाठवले जावेत, तेथील विद्यार्थी देखील येथे यावेत, अशी या मागची कल्पना आहे. माहिती, शिकविण्याची पद्धत तसेच ज्ञानाचे देवाणघेवाण होण्यासाठीचा हा करार आहे. त्यानुसार भारतातील ६० विद्यार्थी हे जर्मनीत शिकण्यासाठी जाणार आहेत. या साठ विद्यार्थयांमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सामावेश असणार आहे. जर्मनील्या ज्या इंगोलस्टॅड शहरात महापालिकेचे विद्यार्थी जाणार आहेत, त्या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. बहुतांश शाळा सरकारी आहेत. सर्व घटकातील विद्यार्थी सरकारी शाळेतच शिक्षण घेतात. परिणामी छत्रपती संभाजीनगर महापलिकेच्या विद्यार्थ्यांना जर्मनीतील शिक्षणपद्धती अनुभवता येणार आहे.



Chh.SambhajiNagar Municipal Corporation-MH छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका Maharashtra DGIPR

16/10/2023

शहरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सोयीचं आवडीचं शहर निर्मिती हेच तर नगर नियोजनाचे वैशिष्ट्य असतं. शहरातील मोकळ्या जागा जिवंत करून त्यात नागरिकांचा विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न म्हणूनच नगर विकास विभागाच्या नियोजनातून होत असतो. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे शहरात उड्डाणपुलांखाली अस्तित्वात येत असलेली उद्यानं.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. हल्लीच दहिसर (पूर्व) आनंदनगर येथील उड्डाणपुलाखालील जागेचा वापर करून २३० मीटर प्रशस्त जागेत सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखालील जागेत जॉगिंग ट्रॅक, खुली व्यायामशाळा, लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, पाळणे, डक व्हीलसह इतर खेळाचे साहित्य, योगासाठी समर्पित जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाळणा, कारंजा, पुलाच्या २६ खांबांवर वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक चित्रे यांचा समावेश आहे. परिसरात विविध प्रकारच्या शोभेच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहही उभारण्यात आले आहे. शिवाय या परिसराभोवती ५०० मीटर लांबीची नवीन पर्जन्य जलवाहिनी व आकर्षक पदपथ आहेत.




MyBmc Maharashtra DGIPR

16/10/2023

पथविक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता एका वर्षासाठी विनातारण कर्ज १० हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. सध्या चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत' प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना' कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ ५ हजार २० पथविक्रेत्यांनी घेतला आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांना गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पीएम स्वनिधी योजनेत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बँकांकडे एकूण ९ हजार ७०९ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ७ हजार ४१९ अर्जधारक पात्र ठरले असून, यातील ५ हजार २० अर्जधारकांना कर्ज देण्यात आले आहे.



Maharashtra DGIPR Chandrapur Municipal Corporation

16/10/2023

छत्रपती संभाजीनगरमहापालिका नजीकच्या भविष्यात शहरामध्ये केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २१ आकांक्षी स्वच्छतागृह उभारणार आहे. त्याकरीता महापालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये २१ ठिकाणे निश्चित केली आहेत. यातील ११ स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित दहा स्वच्छतागृहांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पावर नऊ कोटी ३६ लाख रुपये खर्च निधी खर्च केला जाणार आहे. या स्वच्छतागृहांचे वैशिष्ट्ये म्हणजे तिथे ई-चार्जिंग, वायफायची सुविधा असणार आहे. तसेच काही स्वच्छतागृहांमध्ये सोलार पॅनल, ई-वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, केअरटेकरसाठी स्वतंत्र रूमची निर्मिती केलीजाईल.

छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे असतील आकांशी स्वच्छतागृहे

शासकीय कर्करोग रुग्णालय, पीर बाजार, कांचनवाडी, सिद्धार्थ उद्यान, कबीरनगर, डॉ. सलीम अली सरोवर, पिया मार्केट, सिडको एन-११ भाजीमंडई, नेहरू गार्डन अण्णा भाऊ साठे चौक, क्रांतीनगर, सिडको एन-१ सिग्नल (एसबीआय बँकेजवळ पाणपोई). तसेच टाऊन हॉल, मोंढा नाका, रेल्वेस्टेशन, एपीआय कॉर्नर, संग्रामनगर या पाच उड्डाणपुलाखाली व पाणचक्की, शहागंज भाजीमंडई, औरंगपुरा भाजीमंडई, औषधीभवन, मुकुंदवाडी भाजीमंडई.






Aurangabad Municipal Corporation-MH औरंगाबाद महानगरपालिका Maharashtra DGIPR

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mumbai
400030

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm