23/09/2026
दीपकवाडी येथील अंडरग्राऊंड पादचारी मार्गात पावसामुळे पाणी साचून चिखल, घाण व डासांचा त्रास निर्माण झाला आहे. त्यामुळे मार्ग निसरडा होऊन नागरिकांना ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत BMC अधिकाऱ्यांच्या सहकार्याने परिसराची पाहणी व सर्वेक्षण करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि स्वच्छता लक्षात घेऊन या समस्येवर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल.