23/10/2024
महाराष्ट्र विधानसभा
निवडणूक 2024
मा. राखीताई जाधव यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबई घाटकोपर पूर्व मतदार संघातून उमेदवारी मिळल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐💐
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bodhi Darastekar Pol, Social service, Mumbai.
Bodhi Darastekar Pol
Founder n Chairman of RISING EDUCATIONAL AND SOCIAL CHARITABLE TRUST
working as PUBLIC RELATION OFFICER at HEETrust
IN PRINCIPAL at Rehmatbai Habib High School
23/10/2024
महाराष्ट्र विधानसभा
निवडणूक 2024
मा. राखीताई जाधव यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबई घाटकोपर पूर्व मतदार संघातून उमेदवारी मिळल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐💐
07/09/2024
वंदन करते गणरायाला🙏
हात जोडते 🙏🙏 वरद विनायकाला...
प्रार्थना करते गजाननाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेशभक्तांना
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! सर्वांना!!💐💐💐
17/07/2022
आज दिनांक १६/०७/२०२२ रोजी रायझिंग शैक्षणिक आणि सामाजिक चेरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून "गुरुपौर्णिमेचे"औचित्य साधून आरे कॉलनी मराठी शाळा क्रं. १ युनिट क्रं.१६ (आदिवासी विभाग) गोरेगाव पुर्व या ठिकाणी शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या, क्रीडा साहित्य वाटप तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मा. श्री. नौशाद शिकलगार साहेब . तसेच सामाजिक न्याय विभाग मुंबई प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी .मा.श्री. विलास धस सर उपस्थित होते .
त्याचबरोबर महिला जिल्हा उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ. नुश्रत (लता) सय्यद ,ग्राहक संरक्षण विभाग गोरेगाव तालुका अध्यक्ष श्री. बाबा शिंदे , गोरेगाव पश्चिम येथील राष्ट्रवादी काँगेस पार्टी चे जेष्ठ सभासद श्री. सुखदेव कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोबतच माझे सहकारी श्री. जहित दारस्तेकर, श्री.वासुदेव रेडकर , श्री. शशांक भट्ट, श्री. प्रयाग कांबळे, श्री. प्रकाश भोसले व मित्र परिवार यांच्या मदतीने आजचा कार्यक्रम पार पडला .
04/02/2022
राज्य महिला आयोग अध्यक्षा
मा. सौ रुपालीताई चाकणकर यांची मुंबई पक्षकर्यालय येथे घेतलेली भेट आणि विविध विषयांवर झालेली चर्चा.
26/01/2022
Happy Republic day to all..
26/01/2022
🙏जाहिर आवाहन 🙏
"सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे.याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज , रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग यांचा वापर करावा."
सतर्क रहा , सावधान रहा, स्वताची &परिवाराची काळजी घ्यावी नम्र विंनती
जनहितार्थ जारी!!
*महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग*
24/01/2022
Rashtriya balika dinachya hardik subhechya..
16/01/2022
दिनांक 14.01.2022 मुंबई येथे आपण निराधार व गरजुंसाठी वैद्यकीय तपासणीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम करते वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन,
आपण वैद्यकीय तपासणी आणि औषधे वाटप करीत होतो.
तसेच डॉक्टर विविध आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करीत होते. सदर कार्यक्रम डॉक्टर स्वप्नील कचाटे आणि डॉक्टर कन्हैयालाल यादव यांच्या मुळे यशस्वीरित्या पार पडला.
या पैकी डॉक्टर स्वप्नील कचाटे हे Lotus Multispeciality Hospital बोरिवली येथे कोविड विभागात कार्यरत आहेत.
तर डॉक्टर कान्हैयालाल यादव हे जोगेश्वरी विभागात अल्पदरात चिकित्सालय चालवतात.
एकदा पुन्हा कोवीड रुग्ण संख्या वाढत आहे.
आणि वातावरणात झालेला बदल यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण अधिक वाढत आहे, तरिही डॉक्टर्सनी कोणत्या ही प्रकारचे मानधन न घेता माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम पूर्णत्वास आणला,तर गोरेगाव येथील डॉक्टर जे. आर. यादव. हे कोविड काळात आणि आजही आपली सेवा
अल्पदरात सर्व सामान्यांसाठी करीत आहेत.
त्यांच्या या विलक्षण कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेचछा.