02/02/2025
१७८-धारावी विधानसभा मतदारसंघातर्फे राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून धारावी मद्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी व धारावी निवडणूक कर्मचारी वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभात फेरी,तसेच शालेय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन व विधानसभेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडणूक कर्मचारी वर्गाचा यावेळी मतदान नोंदणी अधिकारी श्री. अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आला. मा. श्री. राजेश बोरसे -सहाय्यक अभियंता व सौ. स्नेहलता डुंबरे - प्रशासकीय अधिकारी (शाळा ) या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदर प्रसंगी श्री. राजेंद्र तायडे व आयोजक श्री. अरुण खरात उपस्थित होते
18/11/2024
१७८- धारावी विधानसभा मतदार संघातील नायब तहसीलदार , तहसीलदार, तसेच पोलीस उपायुक्त यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले.
वोट कर, मुंबईकर !
17/11/2024
लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवूया, मतदान करूया.
बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान करा आणि आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा.
वोट कर, मुंबईकर !
08/11/2024
आज दि.०८/११/२०२४ रोजी १७८ धारावी विधानसभा मतदारसंघा मद्ये मतदारांसाठी जनजागृती चा एक भाग म्हणून भव्य अश्या बाईक रॅलीचे आयोजन सकाळच्या सत्रात केले होते. तसेच संध्याकाळी प्रभाग क्र. ८२ मध्ये ४.३० वाजता रमाई व निधी वस्ती स्तर संघ यांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीची ‘रॅली’ ही १२८ महिलांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. . मतदान करणे हा आपला हक्क आहे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपला हक्क व आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी मतदान करावे असे कळकळीचे आवाहन रॅलीदरम्यान केले.
07/11/2024
१७८-धारावी विधानसभा मतदार संघात विविध हौसिंग सोसायटी मध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मतदान जागृती आणि मतदानाचे महत्व सोसायटीमधील रहिवाश्यांना सांगितले.