✨कौशल्यविकास, रोजगारसंधी आणि व्यावसायिक उत्कृष्टता यासाठी मंडळ सातत्यपूर्ण योगदान देऊन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रातील कौशल्य, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात दर्जा, शिस्त आणि नवनिर्मितीची ओळख म्हणजे — MSBSVET. विद्यार्थ्यांना कौशल्यसंपन्न भविष्याकडे नेणारं मंडळ आज हजारोंच्या करिअरचा आधारस्तंभ बनलं आहे.✨
Maharashtra State Board of Skill, Vocational Education and Training
Act No. IX of 2022) dated 20.01.2022 which came into force on 26.01.2022. has been given. in large numbers in the state.
Maharashtra State Vocational Education Examination Board (MSBVEE) is now renamed and established as Maharashtra State Board of Skill, Vocational Education and Training to regulate matters pertaining to Skill, Vocational Educationand Training and Entrepreneurship Education as per the National Skill Qualification Framework and other Skills Courses in the State of Maharashtra vide Maharashtra State B
कौशल्याधारित शिक्षणाद्वारे तरुणांना सक्षम बनविण्याचा MSBSVETचा उपक्रम-
उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण ✨
26/11/2025
“📘🇮🇳 न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांच्या आधारावर कौशल्यसंपन्न, जागरूक आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा MSBSVET चा सातत्यपूर्ण संकल्प.
✨ संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
🔖 #संविधानदिन
📘
🇮🇳
🏛️
📜
🕊️
🧑🏫
🛠️
🔧
📚
🌟
📖
14/11/2025
महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज MSBSVET कार्यालय तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मुलुंड येथे भेट देऊन विविध उपक्रमांची व सुविधा उभारणीची पाहणी केली. शासकीय आयटीआय मुलुंड येथे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड लॅबच्या हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर माननीय मंत्री महोदयांनी कार्यालय व प्रशिक्षण सुविधा केंद्रांची पाहणी केली.
14/11/2025
✨बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!✨
👦👧 बालकांच्या सर्जनशीलतेत, उत्सुकतेत आणि स्वप्नांमध्येच उज्ज्वल भारताचा पाया आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) कौशल्य विकासाद्वारे प्रत्येक बालकाला सक्षम, आत्मविश्वासी आणि उज्ज्वल भविष्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. 🌱💡
👉 बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळामार्फत खालील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत:
📘 Certificate Course in Vedic Maths
🔢 Certificate Course in Abacus – Beginner, Intermediate, Advance, Expert
हे कोर्स मुलांमध्ये
🧠 एकाग्रता
➕ गणितीय कौशल्य
🎯 बुद्धिमत्ता विकास
📈 तर्कशक्ती वाढ
यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
🌟 चला, कौशल्याद्वारे बालकांचे भविष्य अधिक संपन्न आणि सक्षम बनवूया!
13/11/2025
📘 'AI for Educators’ — शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा अध्याय!🤖
दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘AI for Educators’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम अकॅडमीस्थान (Academisthan) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
‘AI for Educators’ हा शासनमान्य ऑनलाइन कोर्स असून शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence - AI) प्रभावी वापर घडवून आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. हा ३० तासांचा मोफत ऑनलाइन कोर्स शिक्षकांना अध्यापन, अभ्यासक्रम रचना आणि दैनंदिन शैक्षणिक उपक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देईल.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजन वेळुकर, कुलगुरू — अटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी यांनी उपस्थितांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शैक्षणिक उपयोगांविषयी मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमाला डॉ. अपूर्वा पालकर, कुलगुरू — रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, श्री. दीपक कुमार मुकदम, संस्थापक — अकॅडमीस्थान, आणि श्री. योगेश पाटील, संचालक — महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणपद्धतीत कसे परिवर्तन घडवू शकते, मूल्यांकन प्रक्रिया अधिक परिणामकारक कशी बनू शकते तसेच शिक्षकांना भविष्यकालीन भारताच्या निर्मितीसाठी कसे सशक्त करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
सशक्त शिक्षकच सशक्त शिक्षणव्यवस्थेचा पाया आहेत आणि हाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यातील खरा गुंतवणुकीचा मार्ग आहे. 🌟
12/11/2025
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ आणि Academisthan यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “AI for Educators” या अभिनव ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या शुभहस्ते आज संपन्न होत आहे. हा अभ्यासक्रम शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.
07/11/2025
“🎶वंदे मातरम🎶 या गीताला आज १५० वर्षे पूर्ण होत आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं, देशभक्तीचा जाज्वल्य संदेश देणारं हे गीत! जदुनाथ भट्टाचार्य यांनी संगीत दिलेलं हे गाणं आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात स्पंदतं. चला, या ऐतिहासिक क्षणी पुन्हा एकदा अभिमानाने म्हणू या —
वंदे मातरम! 🇮🇳”
#वंदेमातरम
#देशभक्ती
#भारतरत्न
#मातृभूमी
#भारतमाताकीजय
31/10/2025
देशाच्या अखंडतेसाठी आयुष्य समर्पित करणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन!🙏
20/10/2025
🪔शुभ दीपावली!🪔
🪔“कौशल्याचा दिवा प्रत्येक हातात, उज्ज्वल भविष्यासाठी प्रकाशमान वाटचाल. कौशल्याच्या तेजाने उजळू देत महाराष्ट्र!”🪔
18/10/2025
🪔 कौशल्याचा प्रकाश, प्रगतीचा मार्ग!
✨ “धनत्रयोदशीच्या शुभेच्छा! कौशल्य विकासातून उज्वल भवितव्य घडवूया.”
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
4th Floor, Government Industrial Training Institute, Mulund, Balasaheb Thakurwadi, Mithagar Road, Mulund (East)
Mumbai
400081
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
