04/03/2026
महाराष्ट्राच्या विकासाचा आणि जनसामान्यांच्या हक्काचा आवाज आता संसदेत अधिक बुलंद होणार!
राज्यसभा निवडणुकीसाठी महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
✅भाजप संघटनेत अहोरात्र कार्य करणारे राष्ट्रीय महामंत्री मा. विनोदजी तावडे
✅दलित-बहुजन समाजाचे खंबीर नेतृत्व मा. रामदासजी आठवले
✅आदिवासी समाजाच्या नेत्या मा. मायाताई ईवनाते
✅ धनगर समाजाचे नेते मा. रामरावजी वडकुते
यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक.
सामाजिक समतोल आणि विकासाची दृष्टी असलेल्या या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या सर्वांच्या हातून जनसेवेचे महान कार्य घडो, हीच सदिच्छा!
Devendra Fadnavis Ravindra Chavan Vinod Tawde Shashikant Ramrao Wadkute
30/01/2026
नियतीचं 'नॉट रिचेबल' धक्कातंत्र: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'अजित पर्व शांत' !
श्री. प्रमोद रोहिदास परदेशी (प्रदेश सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र) - एक भावनिक शब्दांजली
महाराष्ट्राच्या राजकारणात 'धक्कातंत्र' हा शब्द ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, ते अजित अनंतराव पवार आज खऱ्या अर्थाने कायमचे 'नॉट रिचेबल' झाले. पण हा धक्का मात्र सबंध महाराष्ट्राला सुन्न करणारा आहे. कितीही संकटं कोसळली तरी हसतमुख राहणारे आणि प्रत्येक वादळाला छातीवर घेणारे 'देवेन भाऊ' आज मात्र आपल्या डोळ्यांतील दाटलेली वेदना लपवू शकले नाहीत. सुनेत्रा वहिनींच्या भेटीत देवेंद्रजींची ती शून्यात हरवलेली नजर आणि वाकलेले खांदे बरंच काही सांगून गेले. महाराष्ट्राला घडवण्याच्या निश्चयाने जोडलेली ही 'दोस्तीची दोरी' नियतीने अशी अचानक तोडून टाकावी, हे मनाला पटत नाहीये.
२२ जुलैची ती 'हॉंट' करणारी तारीख
देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्यात केवळ राजकीय मैत्री नव्हती, तर एक अनोखा योग होता—दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी, २२ जुलैला! आजवर हा दिवस उत्साहाचा असायचा, पण यापुढे ही तारीख देवेंद्रजींना आयुष्यभर सलत राहील. त्यांनी आपली 'मेजर सपोर्ट सिस्टम' आणि आपला 'बर्थडे पार्टनर' गमावला आहे, हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे.
शिस्त, जरब आणि रांगडा स्वभाव
अजित दादा म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, तर तो एक दरारा होता. त्यांची प्रशासनावरची कमांड, त्यांचा जनसंपर्क आणि वयाच्या या टप्प्यावरही असणारा त्यांचा फिटनेस थक्क करणारा होता. सकाळी ६:३० वाजता कामाला सुरुवात करणारा हा 'कमांडर' जेव्हा प्रशासनाचे लगाम हातात घ्यायचा, तेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांचीही बोलती बंद व्हायची.
त्यांच्या स्वभावात एक विलक्षण 'ह्युमर' होता. सभेत 'दादा आय लव्ह यु' म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला हसत "अरे बायकोला जाऊन म्हण, ती म्हणल गडी कसा काय बिघडला" असं मिश्किलपणे म्हणणारे दादा असोत, किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना "अरे बाबा मी काय तुला म्हातारा वाटलो का?" असा खोचक टोला लगावणारे दादा... त्यांची प्रत्येक कोपरखळी समोरच्याला आपलंसं करायची. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून चिमटा काढताना "मी मात्र उपमुख्यमंत्री होणार आहे" असं म्हणण्याची दिलदारी फक्त अजित दादाच दाखवू शकत होते.
सामान्य कार्यकर्त्याचा 'आधार'
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीमध्ये सुमित्रा ताईंसाठी (सुनेत्रा पवार) माइक्रो ओबीसी आणि धनगर समाजाची मोट बांधताना दादांनी दिलेला वेळ आजही माझ्या स्मरणात आहे. दोन तास बसून प्रत्येक कार्यकर्त्याची इत्थंभूत माहिती काढणारे दादा पाहिले की स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. विधानसभा निवडणुकीनंतर दादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंगल्यावरती आम्ही दादांची भेट घेऊन दत्तामामा यांना कॅबिनेट मंत्री विदर्भातून संतोष भाऊ महात्मे यांना विधान परिषद आमदार करावे अशी विनंती मी असता दादांनी मिश्किल उत्तर दिले "अहो साहेब दत्ता कॅबिनेट मंत्री झाला समजा व संतोष पण येणाऱ्या काळात आमदार असणार आहे" दत्ता मामांना मंत्री झाले वा संतोष महात्मे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला शब्द देणे असो, दादांनी कार्यकर्त्यांना कायम बळ दिले. संतोष भाऊंचे स्वप्न जरी अपूर्ण राहिले असले, तरी दादांनी दिलेला विश्वास आजही कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहे व दादांचे वारसदार संतोष भाऊंना नक्कीच न्याय देतील.
टीकेला माणुसकीने उत्तर देणारा नेता
माझा मित्र नेहमी सोशल मीडियावर पवार कुटुंबावर टीका करायचा, ज्याचं प्रशासकीय काम कुठेच होत नव्हतं, त्याचं काम दादांनी एका महिन्यात करून दिलं. सकाळी ६:३० ला भेटायला आल्यावर "हा तोच ना मला सोशल मीडियावर शिव्या घालतो?" असं विचारतानाही दादांच्या मनात कटुता नव्हती. तो कार्यकर्ता दादांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर फोनवर मी Hello बोलण्या आधीच १० मिनिटे रडत होता, यातच दादांच्या 'माणुसकी'ची पोचपावती मिळते.
संघ शताब्दी वर्षानिमित्त दादांना पुस्तक देण्यास आम्ही गेलो असता गडबडीत ते पुस्तक स्वीय सहाय्यकने दादांकडून घेऊन मागे ठेवला एवढ्या गर्दीत दादांनी पुन्हा विचारले पुस्तक कसले होते तर आम्ही म्हटलं "संघ शताब्दी वर्ष" अचानक दादा स्वीय सहाय्यकावर वर चिडले म्हटले तुला कळतं का? पुस्तक परत आण व ते पुस्तक दादांनी ओपन केले व त्यावर कुणी दिले त्याचे फोन नंबर घेतले व स्वतःची सही केली जेणे करून पुस्तक वाचल्यावर नक्की प्रतिक्रिया देईल, त्यांनी ज्या शिस्तीने आणि आदराने विचारपूस केली, ती त्यांच्या जमिनीवरच्या नेतृत्वाची ओळख आहे.
साहेब खूप झाले, पण 'दादा' एकच!
स्वतःच्या राजकीय गुरूंना आणि सख्ख्या काकांना "वय झालंय तुमचं, आता थांबणार नसाल तर आम्हाला कधी चान्स मिळणार?" असं रोखठोकपणे विचारणारा हा 'नोनॉन्सेन्स' माणूस महाराष्ट्रात दुसरा होणे नाही. राजकारणात 'साहेब' खूप झाले आणि होतीलही, पण हक्काने कान ओढून शिस्त लावणारा, आणि शब्दाचा पक्का राहणारा 'दादा' फक्त अजित अनंतराव पवारच!
पहाटेचा शपथविधी असो किंवा ऐन भरात असताना आयुष्याच्या खेळपट्टीवरून कायमचं 'नॉट रिचेबल' होणं असो... दादा, तुम्ही जाता जाता महाराष्ट्राला दिलेला हा 'शॉक' कधीही विसरता येणार नाही.
दादा, 'मनातून' काहीच जात नाहीये... वी मिस यू Ajit Pawar दादा!
- श्री. प्रमोद रोहिदास परदेशी
प्रदेश सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र
मोबाईल नं. ९८६०९८२९४८
22/10/2025
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे कणखर गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच शुभेच्छा!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता ते देशाचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री असा प्रेरणादायी राजकीय प्रवास करणारे, मा. अमित जी शाह यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने भारतीय राजकारणात नवा मार्ग तयार केला आहे.
Amit Shah
#अमितशाह #वाढदिवस #शुभेच्छा
13/09/2025
"ऐतिहासिक मानवंदना सोहळा"
दिनांक : १४ सप्टेंबर २०२५
वेळ : दुपारी ३.०० वा.
📍 स्थळ : स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड, पुणे.
https://maps.app.goo.gl/m1AGxZez9c5kVvrY8
👉 या ऐतिहासिक सोहळ्यात आपणही सहभागी व्हा आणि हिंदवी स्वराज्याच्या महान परंपरेला मानाचा मुजरा करा..!
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या :
- Facebook - https://www.facebook.com/hindubhushansmaraktrust
- Instagram - https://www.instagram.com/hindubhushansmaraktrust/
- X (Twitter) - https://x.com/HSmarkTrust
- Website - https://hindubhushansmarak.org/
- Official Email - [email protected]
- WA Channel - https://whatsapp.com/channel/0029VbB3lgSIyPtaexutkY0o
Narendra Modi Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Devendra Fadnavis Nitin Gadkari Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Pimpri Chinchwad Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Murlidhar Mohol Mahesh Landge
#ऐतिहासिकमानवंदना #छत्रपतीशिवाजीमहाराज #धर्मवीरसंभाजीराजे
#स्टॅच्यूऑफहिंदुभूषण #पिंपरीचिंचवड
#संस्कृतीसंवर्धन #गौरवक्षण
#प्रमोद_परदेशी
29/08/2025
RSS Marks 100 Years ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस): नावाची उत्पत्ती आणि पहिल्या 'शाखे'चा इतिहास — शासनना
शासननामा न्यूज ऑनलाईन प्रमोद रोहिदास परदेशी – प्रदेश सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राष्ट्रीय स्...
27/08/2025
एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥
गणेश चतुर्थीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
#गणेशचतुर्थी
Mahesh Landge