Bhimrao Yashwant Ambedkar

Bhimrao Yashwant Ambedkar

Share

Official Account
Grandson of Dr. Babasaheb Ambedkar | National Working President of The Buddhist Society of India | President of Samata Sainik Dal

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 01/06/2026

माझ्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली बुद्ध प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई येथे “धर्मांतर विरोधी कायदा, उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना” या विषयावरील परिसंवाद सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.

भारतीय बौद्ध महासभा, नवी मुंबई जिल्हा पुरुष व महिला शाखा तसेच बुद्ध प्रतिष्ठान, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, दि. ३१/०५/२०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता अशोका बँक्वेट हॉल, बुद्ध प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई येथे या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना धर्मांतर विरोधी कायद्याचे संभाव्य परिणाम, उपवर्गीकरणाचे सामाजिक व घटनात्मक पैलू तसेच बौद्ध जनगणनेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बौद्ध समाजाने संघटित होऊन आपल्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी सजग राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने उपासक-उपासिका व समाजबांधव उपस्थित होते.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 31/05/2026

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), नाशिक जिल्हा शाखा यांच्या वतीने आयोजित ३० मे वर्धापन दिनानिमित्त भव्य धम्म मेळावा व श्रामणेर शिबिर समारोप कार्यक्रम शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी बुद्धविहार, सय्यद पिंप्री, ता. जि. नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून जनतेला संबोधित केले. यावेळी धम्म, समता, बंधुता, संघटन बळकटीकरण तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यविस्ताराबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान समता सैनिक दलाच्या सलामीचा कार्यक्रम संपन्न झाला. विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक-उपासिका आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मप्रसार, सामाजिक प्रबोधन आणि संघटन मजबूत करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 28/05/2026

🗓️२७/०५/२०२६

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन में “Global Bahujan Business Council” का मेरी उपस्थिति में भव्य लोकार्पण किया गया।

इस अवसर पर उपस्थित सभी गणमान्य व्यक्तियों के साथ बहुजन समाज के सामाजिक, आर्थिक एवं उद्यमशीलता विकास से जुड़े विभिन्न विषयों पर सकारात्मक एवं विस्तृत चर्चा हुई।

यह पहल बहुजन समाज के व्यापारिक सशक्तिकरण, आर्थिक आत्मनिर्भरता और नए रोजगार अवसरों की दिशा में एक महत्वपूर्ण कदम सिद्ध होगी।

समाज के युवाओं, उद्यमियों और व्यावसायिक वर्ग को संगठित कर आर्थिक क्रांति की दिशा में आगे बढ़ाने का यह प्रयास निश्चित रूप से नई प्रेरणा देगा।

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 28/05/2026

माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त परेल येथील ऐतिहासिक B.I.T. चाळ, रूम क्र. ५०-५१ येथे भेट देऊन विनम्र अभिवादन केले.

याच ठिकाणी प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांचे तब्बल २२ वर्षे वास्तव्य होते. सामाजिक परिवर्तनाच्या आणि संघर्षाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांचा हा साक्षीदार असलेला परिसर आजही आंबेडकरी चळवळीस प्रेरणा देणारा आहे.

विशेष म्हणजे, राजर्षी शाहू महाराज यांनी दिनांक १७ डिसेंबर १९१९ रोजी या ठिकाणी खास भेट दिली होती. त्यामुळे हे स्थान सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्मृतीस्थळ मानले जाते.

माता रमाई यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय जीवनाला विनम्र अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. 🙏💙

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 27/05/2026

त्याग, संघर्ष, समर्पण आणि अथांग सहनशीलतेची जिवंत प्रतिमा असलेल्या माता रमाई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

आज माता रमाई यांच्या स्मृती दिनी वरळी येथील त्यांच्या स्मारक येथे उपस्थित राहून त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत, उपासमार, दारिद्र्य आणि असंख्य दुःख सहन करत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला खंबीर आधार दिला. बाबासाहेब देशातील कोट्यवधी वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना, रमाई शांतपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहून त्यांना मानसिक बळ देत राहिल्या.

रमाईंचा त्याग हा केवळ एका पत्नीचा त्याग नव्हता, तर तो समता, मानवमुक्ती आणि सामाजिक क्रांतीसाठी दिलेला मूक पण महान संघर्ष होता. स्वतःच्या वेदना आणि दुःख बाजूला ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयाला आपल्या आयुष्याचे ध्येय मानले.

आज प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन समता, स्वाभिमान, शिक्षण आणि मानवतेच्या विचारांसाठी कार्य करण्याची गरज आहे.

त्या महान त्यागमूर्ती मातेस कोटी कोटी प्रणाम!

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 26/05/2026

पंचशील मित्र मंडळ सलग्न गंधकुटी संकल्प समिती (रजि.) यांच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २२–२३ मे २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, मराठी शाळेजवळ, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित होतो.

या प्रसंगी उपस्थित जनतेला संबोधित करून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांचा वारसा जतन करण्याचे तसेच त्या विचारांच्या प्रसारासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेला हा संयुक्त जयंती महोत्सव सामाजिक एकात्मता, प्रबोधन आणि परिवर्तनाच्या विचारांना अधिक बळ देणारा ठरला.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 22/05/2026

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) यांच्या वतीने “धर्मांतर विरोधी कायदा, उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना प्रबोधन” तसेच धर्मांतरित (मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर इ.) बौद्ध बांधवांसाठी विशेष श्रामणेर–बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिर समारोप व केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर उद्घाटन कार्यक्रम गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी उपस्थित राहून जनतेला संबोधित केले. बौद्ध जनगणनेचे महत्त्व, समाजाचे संघटन, धम्मप्रसार आणि संविधानिक अधिकारांबाबत मार्गदर्शन करत जागरूकतेचा संदेश दिला.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 18/05/2026

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ९ वी बौद्ध धम्म परिषद तसेच बौद्धाचार्य / श्रामणेर शिबिर समारोप निमित्त रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी वासुदेवानंद हॉल, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होतो.

या प्रसंगी उपस्थित जनतेला संबोधित करून धम्म, समता, बंधुता आणि संघटन बळकटीकरणाचा संदेश दिला.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 17/05/2026

भारतीय बौद्ध महासभा, विशाळगड विभाग शाखा क्र. १० ग्रामीण / मुंबई तसेच आदर्श बौद्ध कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, मांजरे यांच्या विद्यमाने आयोजित संयुक्त जयंती महोत्सव २०२६ निमित्त शनिवार, दि. १६/०५/२०२६ रोजी मांजरे येथे उपस्थित राहून जनतेला संबोधित केले.

या प्रसंगी समता, बंधुता आणि महापुरुषांच्या विचारांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

Photos from Bhimrao Yashwant Ambedkar's post 14/05/2026

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ / मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ / महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग / पंचशील महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म मेळाव्यानिमित्त

मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी साई गणेश मंगल कार्यालय, पडेल कॅन्टीन, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे उपस्थित होतो.

या प्रसंगी उपस्थित जनतेला संबोधित करून धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Mumbai