22/03/2026
Shri Swami Samarth Seva Kendra (Dindori Pranit) Tata Compound ,Parel Mumbai
llश्री स्वामी समर्थll
श्री स्वामी समर्थ महाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर
22/03/2026
20/03/2026
🙏🙏🙏
01/10/2025
🚩 *श्री स्वामी समर्थ* 🚩
🌳 *कृषीशास्त्र विभाग*🌳
*वर्षातील चार महत्वाच्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. या दिवशी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीत सिता मातेचा मानसन्मान करावा. आपल्या शेतातील मध्यभागी १x१ फुटाचा खड्डा खोदून त्यावर शेण व गोमुत्राने सारवून घ्यावे. पंचोपचार पूजा करावी तेथे ओटीचे साहित्य ठेवावे. धूप-दीप ओवाळून नैवेद्य दाखवावा व नंतर पुढील प्रार्थना म्हणावी, आम्ही सर्व शेतकरी श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने व आशिर्वादाने हा मानसन्मान करत आहोत. हे सितामाते आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धन-धान्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती व आपल्या असिम कृपेबद्दल धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ, नवार्णव मंत्र १ माळ, श्रीसुक्त व भुसुक्त १ वेळ पठण करावे.*
☎️ *अधिक माहितीसाठी संपर्क*
*7757008652*
10/07/2025
गुरुपौर्णिमा उत्सव २०२५ निमित्त सर्व भाग्यवान सेवेकऱ्यांनी खालील ऑनलाईन सेवेमध्ये सहभागी व्हावे 🙏
📍श्री स्वामी चरित्र सारामृत-स. ८ वा.
📍महानैवेद्य आरती-स.१०:३० वा. Live
📍परम पूज्य गुरुमाऊली यांचे हितगुज-स.१०:५० वा. Live
📍 श्री गुरुदर्शन सोहळा-स.११:३० वा. Live
📍श्री गुरुगीता पारायण-सायं. ७ वा.
वरील सर्व कार्यक्रम आपण सेवा मार्गाच्या अधिकृत यु ट्यूब चॅनलवर प्रसारित करत असून, त्यासाठी खालील YouTube लिंक वर क्लिक करा....
👉 Official YouTube Channel : Dindori Pranit Seva Marg
https://youtube.com/?si=DUf3JG86ZZVuGSLz
👉 LIKE - SUBSCRIBE - SHARE👈
#गुरुपौर्णिमाउत्सव२०२५ #श्रीस्वामीसमर्थमहाराज
#श्रीस्वामीसमर्थसेवामार्ग #श्रीगुरुपीठत्र्यंबकेश्वर
#दिंडोरीप्रणित #परमपूज्यगुरुमाऊली
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🌹 परमपूज्य गुरुमाऊलिंकी जय हो! 🚩🚩🚩
☘️ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी आपल्या टाटा कंपाउंड दिंडोरी प्रणित अध्यात्मिक स्वामी केंद्रामध्ये ' गुरूपौर्णिमा' उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
☘️ *या उत्सवात प्रत्येक सेवेकरी आणि भाविकांना स्वतंत्र गुरुपूजनाचा लाभ मिळणार आहे. तरी ही सुवर्णं संधी कोणीही चुकवू नये.*
☘️ कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
🌲 सकाळी 8:00 वाजता - भूपाळी आरती
🌲 सकाळी ८:३० वाजता श्रींच्या मूर्तीची पूजा व अभिषेक
🌲 सकाळी 10.30 वाजता - महानैवेद्य व आरती
🌲 सकाळी 11. 00 वाजता- स्वामी याग
🌲 दुपारी 1.30 वाजता- प्रसाद वाटप
🌲संध्याकाळी 5.00 वाजता औदुंबर प्रदक्षिणा.
🌲 सायंकाळी 6.30 वाजता श्रींची महानैवेद्य व आरती. आरतीनंतर 11 माळी स्वामी जप
आणि प्रसाद वाटप.
🌲 आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गुरुपद घेण्यासाठी सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. कोणीही ही संधी चुकवु नये.🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
06/04/2025
श्री रामाय रामभद्राय, रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय, सीताया पतये नमः🙏🙏🙏
*टाटा कंपाऊंड केंद्र - परळ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा* 🙏🚩
25/03/2025
*प्रातःस्मरनिय वंदनीय आदरणीय परमपूज्य गुरुमाऊलींना अभिष्टचिंतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏💐
*🙏🌹 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🌹*
*गुरूमाऊलींचे जिवनचरीत्र -*
*प.पू. गुरूमाऊली श्री आण्णासाहेब मोरे* ( *दिंडोरी दरबार* )
💠 प.पू. गुरूमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचा जन्म फाल्गुन कृष्ण एकादशी, ( पापमोचनी एकादशी ) रविवार, दि.२० मार्च, १९५५ साली दिंडोरी , येथे झाला.
💠 सन १९८८ साली तेजोनिधी सद्गुरू प.पू. मोरे दादांच्या महानिर्वाणानंतर सेवा मार्गाची संपूर्ण जबाबदारी गुरूमाऊलींवर आली.
💠 सन १९९२ साली प.पू. गुरूमाऊलींनी त्र्यंबकेश्वर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या उभारणीला सुरूवात केली व सन २००३ साली भव्य दिव्य श्री गुरूपीठ बांधून पुर्ण झाले.
💠 प.पू. गुरूमाऊली दर गुरूवार व रविवारी श्री क्षेत्र दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात प्रश्नोत्तर करतात. हजारो दुःखी, पिडीत, संकटग्रस्त लोक आपापल्या समस्या, प्रश्न व अडचणी घेवुन माऊलींकडे येतात. प.पू. गुरूमाऊली त्यांच्या समस्येनुसार सेवा देतात व दिलेली सेवा भाविक सेवेक-याने मनोभावे पुर्ण करताच. कितीही गंभीर संकट, समस्या असेल तरीही ती दुर होते व प्रश्न मार्गी लागतो. हा लाखो समर्थ सेवेक-यांचा अनुभव आहे.
💠 दर महीण्याच्या चौथ्या शनिवारी प.पू. गुरूमाऊलींची त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरूपीठावर मासिक सत्संग मिटींग असते. त्यासाठी राज्यासह देश विदेशातुन हजारो सेवेकरी प.पू. गुरूमाऊलींचे अमृततुल्य हितगुज ऐकण्यासाठी गुरूपीठावर येत असतात.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी हजारो मेळावे, श्री स्वामी विजय रथ यात्रा या माध्यमातुन गावोगावात ग्राम अभियानाच्या माध्यमातुन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करून सेवा केंद्रांची उभारणी केली. आजमितीला राज्यासह देश विदेशात तब्बल ७००० पेक्षा अधीक सेवा केंद्र कार्यरत आहेत.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी सन २००७ साली सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी कोटीचंडी यागाची सांगता करून विश्वकल्याणासाठी ऐतिहासीक अब्जचंडी यागाचा संकल्प सोडला आणि ख-या अर्थाने सेवेक-यांमध्ये उत्साह संचारला व लाखो सेवेकरी तन मन धनाने स्वामी सेवेला लागले.
💠 सन २०११ साली प.पू. गुरूमाऊलींनी श्री गुरूपीठावर श्री स्वामींच्या सोबतच अष्टसिद्ध शक्तीपीठांची सुद्धा स्थापना केली. यामध्ये ( तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तश्रृंगी माता, महालक्ष्मी, श्री कालभैरव, पंचमुखी हनुमान, अन्नपुर्णा माता ) या देवी दैवतांची सुद्धा प्रतिष्ठापणा केली. यामुळे गुरूपीठाची शक्ती व चैतन्य प्रचंड वाढले.
💠 गेली ३४ वर्षे प.पू. गुरूमाऊलींनी अखंड जनसेवेचे व्रत अंगिकारले आहे. गुरूमाऊली दिंडोरी दरबारात दिवसाचे १८ - १८ तास प्रश्नोत्तरे करून दिन दुःखीतांचे दुःख व प्रश्न सोडवत आहेत. शेकडो हजारो मैलांचा प्रवास करून गावो गावासह राज्यात व देश विदेशात भ्रमंती करून स्वामी कार्याचा ध्वज व स्वामी सेवा घराघरात व मनामनात पोहचवण्याचे महत्तम कार्य केले आहे .
💠 प.पू. गुरूमाऊलींनी प्रत्येक सेवा केंद्रात बालसंस्काराला प्रथम स्थान दिले आहे. व प्रत्येक सेवा केंद्रात दर रविवारी बालसंस्कार वर्ग झालाच पाहीजे असा गुरूमाऊलींचा अट्टहास असतो.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी समस्त सेवा केंद्रामध्ये १८ विभागाची कार्यप्रणाली राबवली आहे. ग्राम व नागरी विकास अभियानातुन गाव, खेडे व शहरांचा आध्यात्मीक, भौतीक व परमार्थीक विकास व्हावा अशी गुरूमाऊलींची इच्छा आहे.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी माता भगिनींनी १०० टक्के अध्यात्मीक अधीकार देवुन समस्त आदिशक्ती स्वरूप स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. समस्त माता भगिनी सेवा केंद्रातील आरती, उत्सव, पारायणे, सेवांमध्ये उत्साहाने भाग घेत असतात. तसेच मराठी अस्मीता मराठी संस्कृती, सण वार व्रत वैकल्ये मांडणी या माध्यमातुन माता भगिनी सेवा केंद्रासह परीसरात प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरांचा जागर करत आहे.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी त्र्यंबकेश्वरला श्री स्वामी समर्थ गुरूपीठ , गोशाळा, प्रसादालय, सेवेकरी निवास तसेच गाणगापुर, पिठापुर, नरसोबाची वाडी या ठिकाणीही श्री दत्तधामांची उभारणी केली आहे. आता त्र्यंबकेश्वरला गोशाळेच्या शेजारी अतीभव्य ऐतिहासीक सद्गुरू प.पू. मोरे दादा चॅरीटेबल हाॅस्पीटल सुद्धा उभारले जाणार आहे.
💠 प.पू. गुरूमाऊलींनी गाणगापुर, पिठापुर, कुरवपूर, नरसोबाची वाडी या ठिकाणी एकदिवसीय भव्य श्री गुरूचरीत्र पारायणे लाखो सेवेक-यांकडुन करवुन घेतली. तसेच काशी, मथुरा, वाराणसी, बालाजी, नैमीषारण्य यासह असंख्य ठिकाणी सेवेक-यांकडुन मेळावे व अती उच्च कोटीची सेवा करवुन घेवुन असंख्य सेवेक-यांच्या जिवनात अध्यात्माची ज्योत प्रज्वलीत केली....
🙏🪷 *श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली नमो नमः* 🪷🙏
Click here to claim your Sponsored Listing.
