Yashwant Jadhav - यशवंत जाधव

Yashwant Jadhav - यशवंत जाधव

Share

शिवसेना उपनेते | मा. अध्यक्ष स्थायी समिती, बृहनमुंबई महानगरपालिका | मा. सभागृह नेता, बृहनमुंबई महानगरपालिका | रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख.

श्री. यशवंत कमलाकर जाधव
शिवसेना उपनेते
नगरसेवक - १९९७, २००७, २०१७ (बृहन्मुंबई महानगरपालिका)
सभागृह नेता - २०१७
अध्यक्ष - स्थायी समिती २०१८, २०१९, २०२०, २०२१
अध्यक्ष - स्थापत्य समिती (शहर) २००० ते २००१
अध्यक्ष - प्रभाग समिती ( A,B, & E Ward) २००१ ते २००२
अध्यक्ष - बाजार व उद्यान समिती २००७ ते २००९
सदस्य - स्थायी समिती १९९७ ते २००२ आणि २००९ ते २०१२
VJTI बोर्ड मेंबर - १९९७ ते २००२
प्रिंस वेल्स म्यु

01/06/2026

शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती शायना एन.सी. यांची पक्षाच्या 'प्रभारी राष्ट्रीय सचिव' पदी झालेल्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 💐

आपल्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होऊन शिवसेनेचे विचार देशभर अधिक प्रभावीपणे पोहोचतील, असा विश्वास आहे. आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Shaina Nc Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

01/06/2026

शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी श्री. शशिकांत निकम यांची विभागप्रमुखपदी आणि सौ. रेश्माताई सकपाळ गावकर यांची महिला विभागप्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन! 🌹

शिवसेनेच्या विचारांचा प्रसार करत जनतेच्या सेवेसाठी आपण दोघेही नवी ऊर्जा आणि उत्साहाने कार्य कराल, ही खात्री आहे.

पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

01/06/2026

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते मा. श्री. सदा सरवणकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि जनसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना!

01/06/2026

महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहून विकासाची नवी दिशा देणाऱ्या आपल्या नेतृत्वास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच सदिच्छा.

01/06/2026

शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने मा. श्री. संतोष नलावडे यांची दक्षिण मुंबई लोकसभा सहप्रमुखपदी, मा. श्री. संजय (नाना) आंबोले यांची शिवडी-वरळी विधानसभा समन्वयकपदी, कुणाल (सनी) प्रभुणे यांची शिवडी विधानसभा प्रमुख पदी तसेच मा. सौ. अनुराधा इनामदार यांची महिला समन्वयकपदी झालेल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐

शिवसेनेची विचारधारा घराघरात पोहोचविणे, संघटना अधिक सक्षम करणे आणि जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक प्रभावीपणे उभा करण्याच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीत आपण निश्चितच उल्लेखनीय कार्य कराल, असा दृढ विश्वास आहे.

आपल्या यशस्वी व उज्ज्वल कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!

01/06/2026

शिवसेना सचिव मा. श्री. भाऊसाहेब चौधरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक व राजकीय कार्यात निरंतर यश लाभो, ही सदिच्छा.

Bhausaheb Chaudhari - भाऊसाहेब चौधरी

Photos from Yamini Yashwant Jadhav's post 31/05/2026

मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका तसेच स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल मालाड येथील सिल्वर ओक - लिली बँक्वेट येथे माझे भावंड, नातेवाईक आणि जिवलग मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभात मिळालेल्या प्रेम, सन्मान आणि शुभेच्छांनी मी भारावून गेले आहे.

आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास, प्रेम आणि सदिच्छा हीच माझी खरी प्रेरणा आणि ताकद आहे. हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून जनतेच्या सेवेसाठी अधिक समर्पितपणे कार्य करण्याची नवी ऊर्जा देणारा आहे.

मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल.

पुन्हा एकदा या प्रेमळ सत्कारासाठी आणि मनापासून दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!




31/05/2026

आज घेतलेला तंबाखूमुक्तीचा निर्णय उद्याच्या निरोगी आयुष्याचा पाया ठरू शकतो. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपत व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी पुढाकार घेऊया.




31/05/2026

‘ज्ञान प्रसारक सभा’च्या माध्यमातून शिक्षण आणि समाजप्रबोधनाची चळवळ बळकट करत ज्ञानाचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे थोर समाजसुधारक डॉ. भाऊ दाजी लाड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.




Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Mumbai
400010