CMOMaharashtra

CMOMaharashtra

Share

मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन
Official Page of Chief Minister Office, Maharashtra

The Chief Minister of Maharashtra, a western Indian state, is the head of the Government of Maharashtra. As per the Constitution of India, the governor is the state's de jure head, but de facto executive authority rests with the chief minister. Following elections to the Maharashtra Legislative Assembly, the governor usually invites the party (or coalition) with a majority of seats to form the gov

08/05/2026

आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 08 मे 2026

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200700/

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200523/

इंडियन ऑइलच्या सीएसआर उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200706/

Devendra Fadnavis

Photos from CMOMaharashtra's post 08/05/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई येथे अंधेरी आर.एस. टपाल कार्यालयाच्या नूतनीकृत वास्तूच्या स्पेशल कव्हरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis Jyotiraditya M Scindia Ameet Satam India Post

08/05/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज मुंबई येथे जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'भविष्यसज्ज नूतनीकृत अंधेरी आर.एस. टपाल कार्यालयाच्या इमारतीची तसेच अत्याधुनिक सेवांची पाहणी केली.
यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Devendra Fadnavis Jyotiraditya M Scindia Ameet Satam India Post

Photos from CMOMaharashtra's post 08/05/2026

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया'चे उदघाटन व कोनशिला अनावरण.
यावेळी आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸Inauguration and stone plaque unveiling of the 'Renovated Future Ready Andheri R.S. Post Office' under the Jan Sewa Connect Project at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Jyotiraditya Scindia.
MLA Ameet Satam and other dignitaries were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे इनके करकमलों से जन सेवा कनेक्ट परियोजना के अंतर्गत 'नवीनीकृत भविष्य के लिए तैयार अंधेरी आर.एस. डाकघर' का उदघाटन व कोनशिला अनावरण।
इस अवसर पर विधायक अमीत साटम एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

जनतेला अधिक सक्षम सेवा देणारे भविष्यसज्ज पोस्ट ऑफिस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज अंधेरी, मुंबई येथे जन सेवा कनेक्ट प्रकल्पांतर्गत 'नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी आर.एस. टपाल कार्यालया'चे उदघाटन व कोनशिला अनावरण पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोस्ट विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत नव्या स्वरूपातील पोस्ट ऑफिस आता जनतेच्या सेवेत दाखल होत असल्याचा आनंद आहे. वारसा व आधुनिकतेचा सुंदर संगम साधत नव्याने उभारण्यात आलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांना अधिक सक्षम व आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.

मानवी संवेदनांचा वाहक म्हणून पोस्ट विभागाने आजपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, हा विभाग सामाजिक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इंटरनेट, मेसेज सेवा आणि ई-मेलच्या युगातही काळानुरूप बदल स्वीकारत स्वतःची उपयुक्तता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि पोस्ट विभागाने हे यशस्वीपणे साध्य केले आहे. पोस्ट विभागाची ताकद आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विभागाला कालबाह्य होऊ न देता नव्या युगाशी सुसंगत बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

पोस्टल बँकेच्या माध्यमातून गावागावांत बँकिंग सेवा पोहोचली आणि आर्थिक समावेशनात पोस्ट विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. आज विविध क्षेत्रांशी स्पर्धा करत पोस्ट विभागाने 16 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. हा विभाग आजही सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून कार्य करत आहे. या नूतनीकृत टपाल कार्यालयात वारसा आणि विकास या दोन्हींचा समावेश पाहायला मिळतो. आधुनिक सुविधांनी सज्ज असे सुंदर पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जवळपास 2200 ठिकाणी अशा प्रकारची आधुनिक टपाल कार्यालये उभारली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

🕡 6.35pm | 8-5-2026📍Andheri, Mumbai | संध्या. ६.३५ वा. | ८-५-२०२६📍अंधेरी, मुंबई.

Devendra Fadnavis Jyotiraditya M Scindia Ameet Satam India Post

08/05/2026

| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची 'जन सेवा कनेक्ट योजनेंतर्गत नूतनीकृत अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रम' येथे प्रमुख उपस्थिती

Devendra Fadnavis Jyotiraditya M Scindia

08/05/2026

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

🔸Madhya Pradesh Minister Vishvas Sarang paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Fadnavis welcomed him.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मध्य प्रदेश सरकार के मंत्री विश्वास सारंग इन्होंने मुंबई स्थित वर्षा आवास पर सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।

🕒3.10pm | 8-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. ३.१० वा. | ८-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.

Devendra Fadnavis Vishvas Kailash Sarang

Photos from CMOMaharashtra's post 08/05/2026

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक.
यावेळी मंत्री संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Soil and Water Conservation Department.
Minister Sanjay Rathod and senior officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मृदा एवं जलसंरक्षण विभाग की समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री संजय राठोड एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक पार पडली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत. तसेच जिल्ह्यांना सुधारित आराखडे देऊन कामांना गती द्यावी. जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील 10% कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत.

केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत-जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांअंतर्गत नालाखोलीकरणाची कामे करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये, यासाठी नाल्यांच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

🕐 12.50pm | 8-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.५० वा. | ८-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.

Devendra Fadnavis Sanjay Rathod-संजय राठोड

Photos from CMOMaharashtra's post 08/05/2026

Today’s News ( 08 May, 2026) :

07/05/2026

आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 07 मे 2026

व्हिएतनामच्या अध्यक्षांचे मुंबईत आगमन; राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

https://mahasamvad.in/200505/

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://mahasamvad.in/200603/

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

https://mahasamvad.in/200523/

Devendra Fadnavis

Just a moment...

Photos from CMOMaharashtra's post 07/05/2026

Tạm biệt-Until next time! 🇻🇳

🔸व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम मुंबई येथून रवाना, यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
याप्रसंगी मंत्री जयकुमार रावल, व इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

🔸Governor Jishnu Dev Varma and CM Devendra Fadnavis seeing off President of Vietnam, H.E. Mr. To Lam, as he departs from Mumbai.
Minister Jaykumar Raval and other dignitaries were present.

🔸वियतनाम के राष्ट्रपति तो लाम मुंबई से रवाना, इस अवसर पर राज्यपाल जिष्णू देव वर्मा और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री जयकुमार रावल, एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕣 8.20pm | 7-5-2026 📍Mumbai | रा. ८.२० वा. | ७-५-२०२६ 📍मुंबई.

Devendra Fadnavis Governor of Maharashtra Jaykumar Rawal Viet Nam Government Portal

Photos from CMOMaharashtra's post 07/05/2026

🔸व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्या सन्मानार्थ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर , उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, मुंबईच्या महापौर रितू तावडे, व्हिएतनामचे शिष्टमंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

🔸CM Devendra Fadnavis at the special dinner organised by Governor Jishnu Dev Varma in honour of President of Vietnam, To Lam.
Legislative Council Chairman Prof Ram Shinde, Assembly Speaker Adv Rahul Narwekar, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Rawal, Mumbai Mayor Ritu Tawde, Vietnamese delegation and other dignitaries were present.

🔸वियतनाम के राष्ट्रपति तो लाम इनके सम्मान में राज्यपाल जिष्णू देव वर्मा इनके द्वारा आयोजित स्नेहभोजन कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी उपस्थिति।
इस अवसर पर विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल,
मुंबई की महापौर रितू तावडे, वियतनाम का प्रतिनिधिमंडल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।

🕕 6pm | 7-5-2026📍Lok Bhavan, Mumbai | संध्या. ६ वा. | ७-५-२०२६📍लोकभवन, मुंबई.

Governor of Maharashtra Devendra Fadnavis Ram Shinde Rahul Narwekar - राहुल नार्वेकर Sunetra Ajit Pawar Mangal Prabhat Lodha Jaykumar Rawal Ritu Tawde Viet Nam Government Portal

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mantralaya
Mumbai
400032