PARAG Pratishthan

PARAG Pratishthan

Share

Social, Educational and Cultural Activities.

12/06/2025

"अत्रेमय" प्रयोग ७ वा

Photos from PARAG Pratishthan's post 26/10/2024

पराग🙏
"असेन मी-नसेन मी"
पंडीत यशवंत देव यांची सांगितीक मैफील
शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक नाट्यगृह,शिवाजी पार्क,दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
विनामूल्य प्रवेशिका हव्या असल्यास त्वरित
डॉ अशोक मांजरेकर(अध्यक्ष) आणि आर्ची गांगण साठे (चिटणीस) यांच्याशी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा .
धन्यवाद!

Photos from PARAG Pratishthan's post 23/10/2024

नाट्यपराग आणि पराग प्रतिष्ठान
या दोन सहयोगी संस्था सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात १९७८ पासुन सातत्याने कार्यरत आहे.
गेली पाच वर्षे पितृपक्षात संस्थेतर्फे अन्नयज्ञ अंतर्गत आदिवासी पाड्यावर जीवनोपयोगी सामग्रीचे वाटप तसेच अन्नधान्य वितरण करण्यात येते.
यापूर्वी वांगणी,बदलापूर, भिवंडी, रायगड येथील आदिवासी, कातकरी पाड्यावर जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप तसेच दिवाळी फराळ वाटप असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यावर्षी "अन्नयज्ञ" चे ६वे वर्ष -शहापूर तालुक्यातील माहुली गावी रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी किराणा वस्तूंचे वाटप तसेच विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीर व औषधे वितरण करण्यात आले.
गेली पाच वर्षे वरील उपक्रमांसाठी ग्रामस्थांचे आणि
तेथील माननीय व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे.

Photos from PARAG Pratishthan's post 28/02/2024

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित पथनाट्य स्पर्धेतील काही क्षणचित्रे
महिला सक्षमीकरण या गटात पराग प्रतिष्ठानचे पथनाट्य "छोटी छोटी सी बात" ह्याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
छोटी छोटी सी बात - लेखन,दिग्दर्शन - अभिजित कांबळी
सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष- कबीर जगताप
सर्वोत्कृष्ट वादक- अभिराग कांबळी

24/09/2023

🟪 *पराग*🙏
*पितृपक्षातील अन्नयज्ञ*
*वर्ष पाचवे*
२९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष आरंभ होत आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. गेल्या वर्षी १५६ कुटुंबांना अन्नपाकिटे देण्यात आली. सभासद,हितचिंतक आणि
अन्नाचा घास भुकेल्यांच्या मुखी देण्याचा ध्यास असलेले, समाजाप्रती जाणीव असलेले नागरीक यांनी सढळ हस्ते आर्थिक सहभाग नोंदविला.
*यावर्षी अन्नयज्ञ रविवार १ ऑक्टोबर २०२३*👇
*जिल्हा परिषद शाळा,* *पादिरपाडा,बारवी DAM जवळ,बदलापूर ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे*
पादिरपाडा व वाकड्याची वाडी येथील कुटुंब संख्या १०० असून विद्यार्थी संख्या १८ आहे.

*गेल्या वर्षी ₹१००/- मूल्याचे एकूण १५० अन्नसंच वितरण करण्यात आले. यावर्षी १०० अन्नसंचाची आवश्यकता आहे . तसेच तेथील विद्यार्थ्यांना दप्तराची गरज आहे.*
आपल्या तृप्तीचे आणि समाधानाच्या अन्नाचे एक ताट पूर्वजांच्या आणि भूकेल्यांच्या मुखात जावे हीच इच्छा सर्वांच्या मनात आहेच.
Gpay केल्यानंतर दिलेल्या नंबर वर Screenshort पाठवावा ही विनंती 🙏🏻.

धन्यवाद!
चिटणीस
खजिनदार
अध्यक्ष

26/08/2023

"अत्रेमय" प्रयोग 4 था रवींद्र नाट्य मंदिर येथे यशस्वीरीत्या पार पडला

Photos from PARAG Pratishthan's post 04/07/2023

🟪 *पराग*🙏
२९ जून २०२३
*आषाढी एकादशी*
*विविध उपक्रमांचे आयोजन*
संस्थेचे आणि संस्थामित्र कलावंत
यांनी साहित्यिक पू. ल. देशपांडे लिखीत आणि अभिजीत कांबळी दिग्दर्शित "विठ्ठल तो आला आला" ही एकांकिका पराग कट्टयावर सादर केली. सर्वच कलावंतानी अल्पावधीत, वेळ मिळेल तेंव्हा आणि प्रसंगी ऑनलाईन रिहर्सल केली आणि परिणामकारक रितीने अप्रतीमपणे सादर केली. पावसाने कलाकारांवर वृष्टी केली
आणि रसिकांनी टाळ्यांची बरसात केली. एकांकिकेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले.
------------------------------------------
आषाढी एकादशीचेनिमित्त साधून संस्थेच्या
*अभ्यास पूरक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत मुंबई महापालिका शाळेतील १४ विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्थेने आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे.यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने स्विकारले आहे हे आपणास ज्ञात आहेच.*
------------------------------------------
*संस्थेचे हितचिंतक आणि सातत्याने संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी असणारे श्री. सार्थक खैरनार आणि* *सहकाऱ्यांनी "विठ्ठल गिती गावा"*
*हा भक्तिसंगिताचा अप्रतिम कार्यक्रम सादर केला आणि वातावरण भक्तिसंगितात आणि विठ्ठलनामात रंगून गेले.
------------------------------------------
*रसिक श्रोत्यांनी विविध उपक्रमांना उत्स्फूर्त दाद दिली.*
संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक मांजरेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आर्थिक नियोजन केले. कार्यक्रमास मेघना ज्वेलर्स यांचे प्रायोजकत्व लाभले.चिटणीस श्रीमती आर्ची गांगण साठे यांनी उपस्थितांचे व देणगीदार, जाहिरातदार, निळकंठ साऊंड सर्व्हिस आणि सभासदांचे आभार व्यक्त करुन भविष्यातील समाजोपयोगी उपक्रमाकरिता तत्पर असावे असे आवाहन केले.
------------------------------------------
उपवास स्पेशल अल्पोपाहाराचा आस्वाद घेऊन एका रंगतदार क्षणांचा आनंद घेऊन कार्यक्रम नियोजीत वेळेत संपन्न झाला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
चिटणीस
खजिनदार
अध्यक्ष

28/06/2023

चला विठू माऊली च्या अभंगात रंगून जाऊयात 🙏🙏🙏
अहो त्यासाठी फार कुठे लांब जाण्याची गरज नाही, आपल्या भटवाडीतच, घाटकोपर पराग प्रतिष्ठान मध्ये आपल्या साठी घेऊन येत आहोत *विठ्ठल गीति गावा* हा अभंग
आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि सोबत एकांकिका.
येत्या आषाढी एकादशी च्या दिवशी 29 जून 2023 ला संध्याकाळी 7 वाजता
आपल्या भटवाडी मध्ये पराग प्रतिष्ठान संस्थेच्या प्रांगणात

🙏🙏चला एकत्रित विठूचा गजर करूयात 🙏🙏

01/06/2023

At:Nashik ,kalidas kalamandir
5.00p.m ,on 2nd june2023
Third show of "Atremay"

01/06/2023
Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400084