महाराष्ट्राचे दर्शन

महाराष्ट्राचे दर्शन

Share

It is a nice place

अवघा महाराष्ट्र माझा
लाल काळी माती इथली
अठरापगड जाती
कनखर आहेत मनं आमची
फडके झेँडा हाती
शिवरायांचे वंशज आम्ही
कृष्णा कोयना माता
विठूराया बाप आमचा
सह्रयाद्रि आहे सखा
इथे जन्मला शेर शिवबा
इथे जन्मली गानकोकिळा
इथे जन्मले लोकमान्य
इथे जन्मले ज्ञानबा तुका
अभेद्य आहे अजोड आहे
महाराष्ट्र माझा इथे
जन्मलो इथे वाढलो
पावन झाला जन्म आमुचा
अखंड वादळे झेलत राहील महाराष्ट्र
माझा अवघा महाराष्ट्र माझा

कासारटाका - 
मालवण शहरापासून सुमारे ११ कि. मी. वर असणारे कासारटाका हे धार्मिक ठिकाण. येथे असलेली हिरवीगार वनराई, त्यात खळखळत वाहणारे नदीनाले आणि येथील ओहोळावर वसलेले एक घुमटीवजा मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका. या बैरागी कासार टाक्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे.
शिवपूर्वकाळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा येथील लोक नद्या डोंगरातून वाट काढत पायी चालत व्यापारउदीम करत. त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांना कंकण भरण्यासाठी गावोगावी हिंडायचेत. असा एक कासार मालवणहून चौके मार्गे आपल्या धामापूर गावात जायचा. पहाटेच्या प्रहरी घराच्या बाहेर पडलेला हा कासार सुर्य माथ्यावर आला की मालवणला पोहोचायचा.
मग दिवसभर महिलांच्या हातात कंकण भरुन सुर्य पश्चिमेला झुकला की उरलेल्या कंकणाचे गाठोडे घेऊन व कमरेला पैशाची थैली खोचून घरी परतायचा. हा या कासाराचा नित्यक्रम बनला होता. हा कासार घरी परतताना भरपूर पैसा अडका घेऊन येतो. याचा सुगावा काही लुटारुंना लागला आणि एक दिवस हा कासार घरी परतताना डोंगरात लपून बसलेल्या लुटारुंनी त्या कासाराला चहुबाजूने घेरुन त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्या कारासाने याला नकार देताच त्या निर्दयी लुटारुंनी कासाराची मान धडावेगळी करुन पैसा-अडका लुटून ते पसार झाले.
कासाराची धडावेगळी झालेली मान पाण्याच्या डबक्यात पडली. काही कालावधीनंतर कासाराचा अतृप्त आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरु लागला व त्या निर्जन डोंगरामधून जाणा-या वाटसरुंना मदत करु लागला. म्हणून लोक त्या कासाराला नवस बोलू लागले व मनोकामना पूर्ण होताच नवस फेडू लागले. नवसाला पावणा-या या कासाराची मान टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी कासारटाका हे नाव पडले.
बैरागी कासाराला मटणाचे जेवण फार आवडायचे. घरोघरी कंकण विकून आल्यावर मटण आणून जेवण करायचे आणि त्यावर मस्तपैकी ताव मारायचा आणि शांतपणे झोपायचे हा त्याचा दिनक्रम बनला होता. या कासारटाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की, आपली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला जेवणाचा नवस बोलतात.
नवस फेडण्यासाठी भाविकांना येथेच जेवण बनवावे लागते. कासारटाक्याच्या डोंगरात पुरुष मंडळीच ओहोळाच्या पाण्यात अन्न शिजवितात. येथे शिजविलेल्या अन्नांची चव न्यारीच असते. येथे शिजविलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते. या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा. पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठया संख्येने येथे उपस्थिती दर्शवितात.
#kasartaka #malvan #temple #river #waterfalls #chicken #malvani #manus 30/01/2020

https://www.instagram.com/p/B78IHAcl0-g/?igshid=1bqd67w3hrod

कासारटाका - मालवण शहरापासून सुमारे ११ कि. मी. वर असणारे कासारटाका हे धार्मिक ठिकाण. येथे असलेली हिरवीगार वनराई, त्यात खळखळत वाहणारे नदीनाले आणि येथील ओहोळावर वसलेले एक घुमटीवजा मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका. या बैरागी कासार टाक्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे. शिवपूर्वकाळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा येथील लोक नद्या डोंगरातून वाट काढत पायी चालत व्यापारउदीम करत. त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांना कंकण भरण्यासाठी गावोगावी हिंडायचेत. असा एक कासार मालवणहून चौके मार्गे आपल्या धामापूर गावात जायचा. पहाटेच्या प्रहरी घराच्या बाहेर पडलेला हा कासार सुर्य माथ्यावर आला की मालवणला पोहोचायचा. मग दिवसभर महिलांच्या हातात कंकण भरुन सुर्य पश्चिमेला झुकला की उरलेल्या कंकणाचे गाठोडे घेऊन व कमरेला पैशाची थैली खोचून घरी परतायचा. हा या कासाराचा नित्यक्रम बनला होता. हा कासार घरी परतताना भरपूर पैसा अडका घेऊन येतो. याचा सुगावा काही लुटारुंना लागला आणि एक दिवस हा कासार घरी परतताना डोंगरात लपून बसलेल्या लुटारुंनी त्या कासाराला चहुबाजूने घेरुन त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्या कारासाने याला नकार देताच त्या निर्दयी लुटारुंनी कासाराची मान धडावेगळी करुन पैसा-अडका लुटून ते पसार झाले. कासाराची धडावेगळी झालेली मान पाण्याच्या डबक्यात पडली. काही कालावधीनंतर कासाराचा अतृप्त आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरु लागला व त्या निर्जन डोंगरामधून जाणा-या वाटसरुंना मदत करु लागला. म्हणून लोक त्या कासाराला नवस बोलू लागले व मनोकामना पूर्ण होताच नवस फेडू लागले. नवसाला पावणा-या या कासाराची मान टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी कासारटाका हे नाव पडले. बैरागी कासाराला मटणाचे जेवण फार आवडायचे. घरोघरी कंकण विकून आल्यावर मटण आणून जेवण करायचे आणि त्यावर मस्तपैकी ताव मारायचा आणि शांतपणे झोपायचे हा त्याचा दिनक्रम बनला होता. या कासारटाक्याला मटणाच्या जेवणाचा नवस बोलला की, आपली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची भावना असल्यामुळे आजही लोक कासाराला जेवणाचा नवस बोलतात. नवस फेडण्यासाठी भाविकांना येथेच जेवण बनवावे लागते. कासारटाक्याच्या डोंगरात पुरुष मंडळीच ओहोळाच्या पाण्यात अन्न शिजवितात. येथे शिजविलेल्या अन्नांची चव न्यारीच असते. येथे शिजविलेले अन्न घरी नेऊ नये असे सांगितले जाते. या ठिकाणी पूर्वी महिलांना प्रवेश नसायचा. पण आता पुरुषांबरोबरच महिलाही मोठया संख्येने येथे उपस्थिती दर्शवितात. #kasartaka #malvan #temple #river #waterfalls #chicken #malvani #manus

Photos 11/09/2019

Malvan

08/10/2018

Malvan

Pratap Patil 09/07/2017

Posted by Fan of the Week free version.

Pratap Patil Pratap Patil is this week's fan. Want to be next? Click to apply.

Ajit Dham 02/07/2017

Posted by Fan of the Week free version.

Ajit Dham Ajit Dham is this week's fan. Want to be next? Click to apply.

Ajinkya Londhe 19/02/2017

Posted by Fan of the Week free version.

Ajinkya Londhe Ajinkya Londhe is this week's fan. Want to be next? Click to apply.

Krutika Patil 12/02/2017

Posted by Fan of the Week free version.

Krutika Patil Krutika Patil is this week's fan. Want to be next? Click to apply.

Subhash Chate 05/02/2017

Posted by Fan of the Week free version.

Subhash Chate Subhash Chate is this week's fan. Want to be next? Click to apply.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Mumbai