Gajanan Narayan Rane

Gajanan Narayan Rane

Share

सरचिटणीस | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
(अधिकृत फेसबुक पेज)

Photos from Gajanan Narayan Rane's post 14/06/2026

आदरणीय राजसाहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!!

12/06/2026

२०० कामगारांच्या रोजगाराचा आणि हक्काचा लढा!

भिवंडी येथील पुर्वीची आताची कंपनीने ११ महिन्यांपूर्वी २०० कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकले होते. हक्काचा रोजगार हिरावून घेतलेल्या या मराठी तरुणांना पूर्वलक्षित पगारासह पुन्हा कामावर घ्यावे, याच प्रमुख मागणीसाठी आज व्यवस्थापनासोबत चर्चा केली.

अन्याय कितीही मोठा असो, कामगारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि न्याय मिळवून देणारच!




10/06/2026

देशाच्या भविष्याला सुदृढ ठेवणाऱ्या डॉक्टरांवर उपासमार आणि २५ वर्षे सेवा करूनही LIC कामगारांवर अन्याय? हे मनसे कधीच सहन करणार नाही! 🥺🚩
आज 'श्रमिक गड' येथे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले प्रश्न मांडले.
🔹 BMC RBSK योजना: मार्च २०२६ पासून पगार नसलेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहणार!
🔹 LIC अस्थायी कामगार: हक्काच्या कायमस्वरूपी (Permanency) स्टेटससाठी हा लढा आता थेट दिल्ली दरबारी (DFS) जाणार!
या दोन्ही गंभीर प्रश्नांवर लवकरच आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे आणि युवा नेते श्री. अमित साहेब यांच्याशी चर्चा करून, साहेबांच्याच मार्गदर्शनाने दिल्लीत बैठक घेण्यासाठी पुढील पावले उचलली जातील.
लढा न्याय्य हक्कांचा, खंबीर पाठिंबा मनसेचा! ✊🔥

#ठाकरे

06/06/2026

महिला कामगारांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध....!

पालघरच्या 'मे. मस्तांग इंटरप्राईजेस' कंपनीत महिला कामगारांना दिली जाणारी वागणूक आणि मानसिक त्रास अत्यंत संतापजनक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री. यतिष देशमुख यांची कामगारांसह भेट घेऊन निवेदन दिले आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.🛑⚖️

#पालघर #ठाणे #मुंबई #ठाकरे

06/06/2026

झाले बहु, होतील बहु, परि या सम हाच....!

कपाळी अष्टगंधाचा टिळा, हाती भवानी तलवार, पाठीशी जगदंबेचा आशीर्वाद आणि काळजात रयतेची माया... अशा अद्भूत रसायनातून घडलेले माझे राजे 'छत्रपती' झाले, तो हा सुवर्णक्षण....!

_इतिहासालाही ज्याचा अभिमान वाटावा, अशा शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा....!!!_

🙏🏼🙏🏼🙏🏼

#शिवराज्याभिषेक

05/06/2026

**हिंजवडी आयटी पार्क मधील कामगार विरोधी धोरणांचा आणखी एक संतापजनक प्रकार!** 😡🛑
**न्याय हक्कासाठी लढा! ⚖️**
पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधील एका निष्पाप महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ, अपमान आणि कामाच्या ठिकाणी केलेल्या हलगर्जीपणामुळे झालेला **गर्भपात (Miscarriage)**, हा अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष प्रकार आहे.
पीडितेने आवाज उठवताच तिला धमकावून बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले. कॉर्पोरेट कंपन्यांची ही दडपशाही आता खपवून घेतली जाणार नाही!
या अन्यायाविरुद्ध आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी **'महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना'** खंबीरपणे उभी राहील! ✊🚩
#मनसे #पुणेशहर

02/06/2026

🚩 Colgate Palmolive मधील कामगारांचा विजय! ✊

मनसे कामगार सेनेच्या लढ्यामुळे कामगारांचा पगार व नोकरी कायम ठेवण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले.

🚩 जय महाराष्ट्र!
#मनसे #मनसेकामगारसेना #ठाकरे #मुंबई

30/05/2026

आदित्य बिर्ला रिसर्च सेंटर तळोजा येथे गेल्या 15 ते वीस वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांना 2019 पासून आजतागायत पगारवाढ न मिळाल्यामुळे कामगारांनी त्यांच्या मागण्यासाठी आणि पगारवाढीसाठी सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारले.
कामगारांच्या न्याय्य मागण्यासाठी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने च्या व्यवस्थापनासोबत बैठक केली

#ठाकरे #मुंबई #पनवेल

Want your business to be the top-listed Government Service?

Website