Dalit Youth Panther-दलित युथ पॅंथर

Dalit Youth Panther-दलित युथ पॅंथर

Share

Social Reforming

Photos from Dalit Youth Panther-दलित युथ पॅंथर's post 01/06/2026

दलित पँथर चा ५४ वर्धापन दिन शुक्रवार दिनांक २९ मे रोजी चैत्यभूमी येथे उत्साहात संपन्न
मुंबई: दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी ७० च्या दशकात स्थापन झालेल्या दलित पँथरला ह्या वर्षी ५४ वर्ष होत आहेत.
२९ मे हा दलित पँथर चा स्थापना दिवस आहे पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ आणि ज वी पवार यांनी दलित पँथर ला रस्त्यावर जन्म दिला होता हा दिवस दलित युथ पँथर प्रतिवर्षी चैत्यभूमी येथे दलित पँथर चा वर्धापनदिन म्हणून साजरा करत असते.
ह्या वर्षीच्या वर्धापन दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रम मध्ये दलित पँथर चे २ दिग्गज नेते ज वी पवार व अविनाश महातेकर एकाच मंचावर अनेक वर्षा नंतर आले होते.
दलित पँथर वर्धापन दिना निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना पँथर पुरस्कार देऊन गौरवण्यात येते ह्या वर्षी चा पँथर पुरस्कार भावनिक क्षणाचा ठरला. पँथर चे ज्येष्ठ नेते माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे यांना मरणोत्तर पँथर पुरस्कार जाहीर झाला होता सदर पुरस्कार त्यांच्या पत्नी सूर्यकांता गाडे यांनी स्वीकारला तर आक्रमक रिपब्लिकन नेते मनोज भाई संसारे याचा पुरस्कार त्यांच्या मातोश्री यांनी स्वीकारला, सम्राट वृत्तपत्र संस्थापक बबन कांबळे यांना ही ह्या वर्षीचा पँथर पुरस्कार देण्यात आला तो त्यांचे सुपुत्र यांनी स्वीकारला पँथर पुरस्कार व्यतिरिक्त ह्या वर्षी विशेष पुरस्कार ही देण्यात आले
आरोग्य क्षेत्रात गेली २५ वर्ष रुग्ण सेवा करणाऱ्या एक्मे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. विनंती पोळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.अर्चना गणेश हांडोरे तर ह्या वर्षीची ज्युनिअर मिस इंडिया कॉन्फिडंट जिया सुनील गायकवाड यांना हे पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातील विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत संदेश विठ्ठल उमप यांनी बुद्ध, भीम गीते व गाण्याच्या माध्यमातून पँथरना मानवंदना दिली.
सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना दलित पँथर चे सहसंस्थापक ज वी.पवार यांनी आज पँथर च्या नावाने काम करणाऱ्या विविध संघटनांना एकत्र करण्याचा संकल्प केला तर आगामी निवडणुकी आधी रामदास आठवले यांना भाजपच्या गोटातुन पुन्हा परत आणण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मा. अविनाश महातेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश मोहिते यांनी तरुणांनी रस्त्यावरच्या लढाई साठी सज्ज होऊन, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात अधिक आक्रमक आंदोलन उभे करण्याचे आव्हान केले.

31/05/2026

राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे चारित्र्य आपल्याला शिकविते की सत्य,संयम,दानशीलता आणि सहनशीलते शिवाय उच्चगुण नाहीत.हे गुण त्यांच्या ठायी वसले होते म्हणुन तर आहिल्यादेवी आज आपल्याला आदर्शवत वाटतात.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

29/05/2026

दलित पँथर वर्धापन दिन सोहळा
🗓️ दिनांक: २९ मे २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 ठिकाण: चैत्यभूमी, दादर, मुंबई

आयोजक: दलित युथ पँथर

28/05/2026

स्नेह निमंत्रण 🙏🙏
दलित पँथर वर्धापन दिन सोहळा
🗓️ दिनांक: २९ मे २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 ठिकाण: चैत्यभूमी, दादर, मुंबई
आयोजक: दलित युथ पँथर

27/05/2026

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मुर्तिस विनम्र अभिवादन.

27/05/2026

स्नेह निमंत्रण
दलित पँथर वर्धापन दिन सोहळा
🗓️ दिनांक: २९ मे २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 ठिकाण: चैत्यभूमी, दादर, मुंबई

Photos from Dalit Youth Panther-दलित युथ पॅंथर's post 26/05/2026

दलित पँथर वर्धापन दिन सोहळा
🗓️ दिनांक: २९ मे २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 ठिकाण: चैत्यभूमी, दादर, मुंबई
पँथर पुरस्कार
मा. दि. गंगाधर गाडे साहेब (ज्येष्ठ पँथर नेते, माजी मंत्री)
मा. दि. मनोज भाई संसारे (रिपब्लिकन नेते)
मा. बबन कांबळे (संस्थापक, दैनिक सम्राट)

विशेष पुरस्कार
डॉ. विनंती पोळ (संचालिका, अक्मे हॉस्पिटल)
डॉ. अर्चना हांडोरे (मुख्याध्यापिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज)
कु. जिया सुनिल गायकवाड (ज्युनियर मिस इंडिया कॉन्फिडट २०२६)

आयोजक: दलित युथ पँथर

25/05/2026

शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ सायंकाळी ६ वाजता.
ठिकाण चैत्यभूमी,दादर,मुंबई येथे दलित पँथर वर्धापन दिनाच्या सोहळ्या साठी मी आपली वाट पाहतो आहे.
- ज. वी. पवार (सहसंस्थापक दलित पँथर, जेष्ठ साहित्यिक, विचारवंत)

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

N M Joshi Marg
Mumbai
400027