Gajanan Rajmane

Gajanan Rajmane

Share

https://amzn.in/d/bJb1OIN

खांद्यावरचे स्टार्स📚
"सकारात्मक दृष्टी ठेवून प्रत्येक समस्येचे केलेले निवारण, किंबहुना छोटे परिवर्तन किती मोठा बदल घडवू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण !" डॉ. प्रकाश बाबा आमटे.
खालील अमेझॉन लिंक वर जाऊन पुस्तक मागवू शकता.

Photos from Gajanan Rajmane's post 26/03/2026

📚🌿 "याच झोपडीत आम्ही 24 जण एकत्र राहत होतो," UPSC परीक्षेत यश मिळविलेला प्रवीण सांगत होता. या पावन झोपडीत थोडा वेळ बसलो, साखर खाल्ली. त्याला व त्याच्या परिवाराला भेटून खूपच आनंद झाला.
एकदम सालस,बुद्धिमान, निर्मल दूरदृष्टी असलेला प्रवीण; अधिकारी म्हणून खूप मोठा होईल. 💫 मुक्ता आजी, आमच्या बनपुरीच्या विनोदवीर गणादाजी यमगर यांची बहीण. माझी आई तिला मायेने भेटली. या वयात पण ती गप्प बसली नव्हती, शेळ्यांच्या लेंड्या केरसुणीच्या बुडक्याने लोटीत होती.
मुक्ता आजीच्या आणि प्रवीणच्या गळ्यात वारकरी तुळशीची माळ. तिला पंढरपूरच्या विठ्ठला चे दर्शन घ्यायचे होते. पण तिच्याच झोपडीत आता राम आलाय, शबरीच्या कथे सारखा. आम्हाला ही तो दिसत होता. प्रवीणच्या कष्टाने आणि तिच्या भक्तीने त्याला यावे लागले. त्याच्या यशाने झोपडी आता पावन झाली आहे. घरात राम येणे, कदाचित यालाच म्हणत असतील...!

#खांद्यावरचेस्टार्स


#रामनवमी

21/03/2026

🎊🌿Azeem !
तुला मी शोधतच होतो आणि तुझा मला फोन आला. किती मोठा झाला आहेस तू...!

#खांद्यावरचेस्टार्स


Photos from Gajanan Rajmane's post 10/03/2026

🎊📚
मराठी साहित्यात अभिरुची, चिंतन आणि दर्जाची परंपरा जपणाऱ्या ‘ललित’ मासिकाने अनेक नामवंत लेखकांना व्यासपीठ दिले आहे. अशा प्रतिष्ठित ‘ललित’ मासिकात माझ्या ‘खांद्यावरचे स्टार्स’ या पुस्तकाचे समीक्षण प्रसिद्ध होणे, ही लेखक म्हणून मोठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. ‘ललित’ परिवाराचे मनःपूर्वक आभार. ही दखल माझ्यासाठी नवी ऊर्जा आहे.
" मला वाटते की यातील एखादे प्रकरण शालेय शिक्षणात समाविष्ट करावे मूल्य शिक्षण म्हणून!
प्रा. सुहासिनी कीर्तीकर
यांचे हे शेवटचे वाक्य पुस्तकासाठीचा मोठा सन्मान आहे.
📚✨
#ललित
#खांद्यावरचेस्टार्स

#मराठीसाहित्य

07/03/2026

🎊📚आटपाडी, सांगली साठी सर्वोच्च अभिमान ! प्रवीण ने UPSC परीक्षेत मिळविलेले यश खूपच प्रेरणादायी आहे.
मु .मिटकी, पोस्ट. बनपुरी अशा गावात राहणारा प्रवीण कोळपे, २०२१ मध्ये वडील वारले आणि आपल्या या यशाचे श्रेय काबाड कष्ट करणाऱ्या आईला देतो. २५ फेब्रुवारी रोजी तो दिल्लीत भेटला. त्याला फोन केला आणि महाराष्ट्र सदन येथे तासभर भेटलो. लक्षपाल ही तिथेच अचानक भेटला. दिल्लीत कुठे राहतो विचारल्यावर, जिथे कमी पैशात राहणे शक्य होते तिथे राहत होता. आता त्याला महाराष्ट्र सदनाची दारे किंबहुना भारतातील कोणत्याही उच्च अतिथी गृहाची दारे खुली असतील. तो जिंकला आहे. त्याने शांतपणे, अलिप्त राहून प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच्या व्हॉट्सअँप वरील स्टेटस वाक्य भावते, " Just because it's taking time, it doesn't mean it is not happening... ✨Very Soon🔥
पाच वेळा पूर्व परीक्षा देणारा, प्रवीण विचारांची स्पष्टता व कष्टाची तयारी ठेवून यात उतरलेला होता. त्याने परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे.🌿 तो सहावीत असताना रयत शिक्षण संस्थेच्या श्री. सिद्धनाथ विद्यालय, खरसुंडी येथे अनिल यमगर आणि माझ्या सत्कारा प्रसंगी मिळालेली प्रेरणा आवर्जून त्याने भेटीत बोलून दाखवली. आता त्याचे शेकडो सत्कार होतील. तो या सत्कारामधून अनेकांमध्ये प्रेरणेची ज्वाला ओतेल आणि त्याच्यासारखे असे डोंगरात तयार होणारे हिरे अनेक तयार होतील. खात्रीने तो प्रशासनात सामान्यांचा मसिया बनून त्यांचे कल्याण करीत राहील. प्रवीण, खूप खूप कौतुक आणि अभिनंदन!
काबाडकष्ट करणाऱ्या साहेबांच्या आईस वंदन!



#खांद्यावरचेस्टार्स

Photos from Gajanan Rajmane's post 20/02/2026

🥇🎉आपल्या महाराष्ट्र टीम ने अखिल भारतीय पोलीस कमांडो कॉम्पिटिशन मधील स्नायपर स्पर्धेमध्ये 1. गोल्ड मेडल मिळविले. 2. NSG, सिल्वर; 3. SPG, ब्राँझ. मानेसर, दिल्ली येथे ही स्पर्धा पार पडली. भारतातील एकूण 17 स्नायपर टीम्सनी यामध्ये भाग घेतला होता.




Photos from Gajanan Rajmane's post 09/02/2026

🌿📚बामनाचा पत्रा, या पत्र्याने अनेकाना सावली दिली. इथे गदिमांनी शब्दांचा अविनाशी यज्ञ रचला, चोहोबाजूने काळीभोर जमीन आणि मध्यंतरी आण्णा आपल्या जादुई लेखणीने शब्द समिधा वाहत होते.✍️ इथेच या आधुनिक वाल्मिकी ने गीतरामायण रचले आणि साहित्य भक्तांना दैवी वेड लावून सोडले. आण्णा चित्रपट कथा, भावगीत, लावणी, कादंबरी अशा सर्व प्रकारच्या साहित्य रसाचे धनी. व्यंकटेश माडगूळकर तात्या, यांचा माणदेशी माणूस इथलाच. धर्मा रामोशी, तांबोळ्याची खाला, नामा मास्तर, बन्या बापू ... भावनांचं काहूर माजवणाऱ्या या पात्रांना तात्यांनी अजरामर केलं. या बामनाच्या पत्र्यावर येऊन अनेक लेखक इथली माती कपाळी लावतात. मला या वर्षीचा व्यंकटेश माडगूळकर साहित्य गौरव पुरस्कार इथे प्रधान केला, माडगूळकर परिवाराचा मी शतशः ऋणी आहे.👏 इंद्रजीत भालेराव सरांना गदिमा साहित्य पुरस्कार प्रदान केला, त्यांच्याबरोबर या साहित्यिक श्रेष्ठींनी फुललेल्या ठिकाणी मी मंचावर असणे किती आनंदी देणारे होते! या माझ्या पुस्तकाला मिळालेला पहिला वहिला पुरस्कार, खांद्यावरचे स्टार्स या पुस्तकांमधील शब्द भावनांचा प्रसाद ग्रहण करणाऱ्या माझ्या सर्व वाचकांना समर्पित करतो.🎊🫂
खूप खूप धन्यवाद!
#खांद्यावरचेस्टार्स
#गदिमा


05/02/2026

📚🫂खूप खूप धन्यवाद सुधांशू, मित्र म्हणून तू बेस्ट आहेसच, परंतु वाचनातून सादर झालेली तुझी रचनात्मकता अतिसुंदर आहे...!🎊
किती सुंदर व्हिडिओ बनविला आहेस!📺
#खांद्यावरचेस्टार्स



Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Mumbai