AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

Share

The All India Democratic Women's Association is an independent left oriented women's organisation.

28/05/2026

26/05/2026

अचुक!

23/05/2026

#
CITU

04/05/2026

👆 जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत ठाणे-पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने आज 3 मे रोजी महिलांना 33 टक्के आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी मोर्चा काढून डहाणू-जव्हार मुख्य रस्ता अर्धा तास अडवून धरला. मोर्चात 300 हून अधिक महिला सहभागी होत्या. नेतृत्व लहानी दौडा, सुनीता शिंगडा, नीलिमा वानले, प्राची हातिवलेकर इत्यादीनी केले.

04/05/2026

जनवादी महिला संघटनेच्या राज्य कमिटीने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत ठाणे-पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने आज 3 मे रोजी महिलांना 33 टक्के आरक्षण त्वरित लागू करावे या मागणीसाठी मोर्चा काढून डहाणू-जव्हार मुख्य रस्ता अर्धा तास अडवून धरला. मोर्चात 300 हून अधिक महिला सहभागी होत्या. नेतृत्व लहानी दौडा, सुनीता शिंगडा, नीलिमा वानले, प्राची हातिवलेकर इत्यादीनी केले.

24/04/2026

सोलापूरात विवाहित महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याची घटना; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोलापूर, दि. २३ एप्रिल २०२६ – सोलापूर शहरात घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेत नर्गिस फैजान शेख (वय ३२, रा. लोकमान्य नगर, मजरेवाडी) यांना त्यांच्या पतीने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडितेवर दीर्घकाळ शारीरिक व मानसिक छळ होत होता. तसेच माहेरून पैसे व दागिने आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देत आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (खून) तसेच ४९८ अ (कौटुंबिक छळ), ३४ (सामूहिक हेतू), १२० ब (कट) आणि आवश्यक असल्यास ३०४ ब (हुंडाबळी मृत्यू) या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेच्या राज्य अध्यक्षा नसीमा शेख म्हणाल्या, “या प्रकरणात साक्षीदार फुटू नयेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने थेट हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक आहे. पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे.”

तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, प्रकरणाचा जलद व निष्पक्ष तपास करावा आणि मृत पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत व आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य अध्यक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते, जिल्हा सचिव शेवंता देशमुख, उपाध्यक्ष सुनंदा बल्ला, लिंगवा सोलापूरे, ॲड. अनिल वासम, गंगुबाई कनकी, प्रिया कोतलापुरे, रजनी दंडी, रहिसा शेख आदी उपस्थित होते.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

18/04/2026
14/04/2026

भारतीय घटनेचे शिल्पकार दलित, शोषित व महिलांचे कैवारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA)
महाराष्ट्र

12/04/2026

जमसंच्या राज्य कमिटी बैठकीत राज्याच्या खजिनदार रेखा देशपांडे यांनी 'अंधश्रद्धा व महिला' या विषयावर प्रात्यक्षिकासहित व्याख्यान दिले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अशीच व्याख्याने/कार्यशाळा जिल्हा पातळीवर होणार आहेत.

Photos from AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र 's post 31/03/2026

भीम डोंगर, नालासोपारा पूर्व येथे दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम डीवायएफआय आणि जमसं वसई-विरार विभाग समिती यांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला २२ विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

31/03/2026

सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांच्या वतीने तसेच अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
नागपूर जिल्ह्यातील राजकमल चौक येथे निदर्शने करण्यात आली.

Want your business to be the top-listed Government Service?

Telephone