09/05/2026
अभ्युदयनगर, काळाचौकी येथील म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकास प्रकल्पाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी मे. एम. जी. एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा. लि., मे. एन. एन. पी बिल्डकॉन प्रा. लि. आणि मे. ओनेस्ट शेल्टर्स प्रा. लि. यांच्या समूहाची निविदा प्राधिकरणाने स्वीकृत केली आहे. सध्याच्या २१० चौरस फुट चटई क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या मोबदल्यात रहिवाशांना प्रत्येकी ६४१ चौरस फुट प्रस्तावित चटई क्षेत्रफळाची पुनर्विकसित सदनिका मिळणार आहे. तसेच, या प्रकल्पासाठी विकासकाला स्वीकृती पत्र (Letter of Acceptance) देखील प्रदान करण्यात आले आहे. यामुळे अभ्युदय नगरमधील रहिवाशांच्या हक्काच्या आणि आधुनिक घराच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
18/04/2026
Mumbai continues to grow, and so do its needs.
The Motilal Nagar Redevelopment Project is a step in that direction, towards safer homes, better access, and more organised urban living.
It reflects a larger focus on creating neighbourhoods where daily needs come closer to home, making everyday life simpler and more connected.
At its core, it is about building a more liveable Mumbai for the years ahead.
11/04/2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या भाडे तत्त्वावरील परवडणाऱ्या गृहनिर्माण धोरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत म्हाडामार्फत तयार करण्यात आलेल्या मसुदा धोरणाचे सादरीकरण करण्यात आले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अत्यंत सकारात्मक व रचनात्मक चर्चा झाली.
शहरी भागात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे, नागरिकांसाठी सुलभ, समावेशक व तंत्रज्ञानाधारित डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करणे तसेच प्रभावी प्रशासनिक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
मसुदा धोरणामध्ये पारदर्शकता, सुलभता व संस्थात्मक बळकटी यांवर आधारित संरचित दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. यामध्ये म्हाडाला राज्य भाडे गृहनिर्माण विकास व नियामक प्राधिकरण म्हणून नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव, वैधानिक राज्यस्तरीय भाडे गृहनिर्माण पोर्टलची निर्मिती, वेळबद्ध वाद निवारण यंत्रणा तसेच घरांची नोंदणी, करार, पोलिस सूचना, देयके व तक्रार निवारण यांसह संपूर्ण डिजिटल भाडे प्रक्रिया उभारण्याचे महत्त्वपूर्ण उपाय सुचविण्यात आले आहेत.
तसेच मागणी व पुरवठा यामध्ये संतुलन राखत गृहनिर्माण उपलब्धता सुनिश्चित करणे, पारदर्शक करार प्रणाली उभारणे आणि विश्वासार्ह व वेळबद्ध तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करून वादांचे जलद निपटारा करण्यावर या धोरणाचा भर आहे.
या धोरणामध्ये विद्यार्थी, कामगार महिला, ज्येष्ठ नागरिक, औद्योगिक कामगार, प्रकल्पग्रस्त नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी व रुग्ण, बेघर व्यक्ती तसेच विविध उत्पन्न गटांतील कुटुंबे अशा व्यापक लाभार्थी गटांचा समावेश करण्यात आला आहे.
10/04/2026
मा. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी ‘न्यू चंद्रपूर’साठीच्या व्हिजन प्लॅनबाबत विशेष चर्चा झाली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी म्हाडा हे विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) असून, या भागाला भव्य मेगा टाउनशिप म्हणून विकसित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
म्हाडावर त्यांनी दाखवलेला हा विश्वास आमच्यासाठी गौरवास्पद असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हाडा सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद केले.
09/04/2026
कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने भगीरथी हाउसिंग प्रा. लि आणि माथी डेव्हलपर्स प्रा. लि यांना स्वीकृती पत्र (लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स) देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रकल्पामुळे आठ हजार भाडेकरू-रहिवाशांना हक्काचे नवीन घर मिळणार आहे. म्हाडाच्या विशेष प्रकल्प कक्षामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.