Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस

Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस

Share

नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत फेसबुक पेज. आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉल 112. Official account of Navi Mumbai Police. For any emergency DIAL 112.

Photos from Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस's post 05/03/2026

📈 कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक फसवे लोक शेअर मार्केट आणि ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. बनावट स्टॉक टिप्स, इनसाइडर माहिती किंवा खोट्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या जाळ्यात अडकू नका.

⚠️ सतर्क रहा, तपासूनच गुंतवणूक करा.

📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112
📞Financial Intelligence Unit (FIU): 7700920766


Photos from Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस's post 04/03/2026

🚨 मॅट्रिमोनियल स्कॅमचा पडाफाश!

नवी मुंबई पोलिसांनी ₹८९.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक केली आहे.
ऑनलाईन ओळखी करताना सतर्क राहा — आकर्षक आश्वासनांमागे फसवणूक लपलेली असू शकते.

कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित नवी मुंबई पोलिस हेल्पलाईन 📞 88-28-112-112 वर संपर्क साधा.
आपली जागरूकता हीच सायबर गुन्ह्यांवरील सर्वात मोठी ढाल आहे. 🛡️

Photos from Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस's post 27/02/2026

मराठी ही फक्त भाषा नाही,
ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अभिमानाची ओळख आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना
नवी मुंबई पोलीस कडून हार्दिक शुभेच्छा!🙏🏻✨

#मराठी_भाषा_गौरव_दिन

21/02/2026

पोलीस आयुक्तालय नवी मुंबई:-
🛑 उमेदवारांना सूचना
नवी मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/बँड्समन भरती 2024-25 च्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रकाची माहिती.

14/02/2026

📢 महत्त्वाची सूचना – नवी मुंबई पोलीस

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालय, सेक्टर १७, कळंबोली (पिन ४१०२१८) येथे करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी व अडचण असल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर – नवी मुंबई पोलीस 🚔

Photos from Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस's post 26/01/2026

नवी मुंबई पोलिसांच्या वतीने ७७व्या प्रजासत्ताक दिनाचा गौरवपूर्ण सोहळा 🇮🇳
शिस्त, कर्तव्य आणि देशसेवेच्या भावनेतून हा ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण आणि सुरक्षित भारतासाठी नवी मुंबई पोलीस सदैव तत्पर.


26/01/2026

कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा अभिमान.
नवी मुंबई पोलिस तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳


15/01/2026

मतदार यादीतील आपले नाव शोधण्यात अडचण येत असल्यास
मताधिकार (Matadhikar) ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा
आणि आपले नाव व बूथ क्रमांक तपासा.

📲 ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.stateelection2&hl=en_IN&pli=1

— नवी मुंबई पोलीस आयुक्तालय

26/12/2025

बाल अत्याचार थांबवा. गप्प राहू नका. आवाज उठा.
📞 Navi Mumbai Police Helpline: 08828 1 12112


Photos from Navi Mumbai Police - नवी मुंबई पोलीस's post 19/12/2025

मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला ₹33,13,299/- किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस नागरिकांच्या विश्वासासाठी सदैव तत्पर✨



16/12/2025

“तुमचे अकाउंट खरंच सुरक्षित आहे का?” 🔐

फक्त पासवर्ड पुरेसा नाही.
सायबर फसवणूक एकाच चुकांवर होते. ⚠️


🔹 सर्व डिव्हाइसवर Two-Factor Authentication (2FA) सुरू ठेवा
🔹 बँक, UPI, ई-मेल आणि सोशल मीडिया अकाउंट्स सुरक्षित ठेवा


🛡️ एक अतिरिक्त सुरक्षा स्तर
✅ OTP / Authenticator शिवाय लॉगिन शक्य नाही
✅ अनधिकृत प्रवेश त्वरित रोखता येतो
✅ आर्थिक व डिजिटल नुकसान टाळता येते


📱 आजच Two-Factor Authentication सक्रिय करा —
सुरक्षित डिजिटल आयुष्याची ही पहिली पायरी


📞 Navi Mumbai Police Helpline – 88-28-112-112

11/12/2025

“सोशल मीडियावर अनावश्यक माहिती शेअर करू नका" -गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात! ⚠️

🔹 तुमची बँक माहिती, OTP, कार्ड नंबर किंवा डॉक्युमेंट्स कधीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका.
🔹 फेक अकाउंट्स, डीएम आणि अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणं टाळा.


🛡️ सावध रहा, सजग रहा:
✅ वैयक्तिक डॉक्युमेंट्स आणि फोटो ‘Private’ ठेवा.
✅ Banking किंवा ID details कोणासोबतही शेअर करू नका.
✅ अनोळखी संदेशांतील माहिती विचारपूर्वक वाचा.
✅ फसवणूक दिसताच त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.


📵 तुमची माहिती सुरक्षित ठेवा — एका चुकीच्या पोस्टने ओळख चोरी होऊ शकते!
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर!


📞 Navi Mumbai Police Helpline – 88-28-112-112

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Commissioner Of Police Navi Mumbai Sector 10, Opposite RBI Bank CBD Belapur Navi
Mumbai
400614