CPIM Mumbai

CPIM Mumbai

Share

The CPI(M) was formed at the Seventh Congress of the Communist Party of India held in Calcutta from

Photos from CPIM Mumbai's post 05/05/2026

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) पश्चिम उपनगर तालुका मुंबई कमिटी च्या वतीने आज कार्ल मार्क्स यांची 208 वी जन्मदिन अंधेरी कार्यालयात साजरी करण्यात आली.

पक्ष तालुका कमिटी सदस्य कॉ अंजु दवे यांच्या हस्ते कार्ल मार्क्स यांच्या फोटोला पुष्पहार घालून घोषणा देण्यात आला.

या वेळी पक्ष जिल्हा कमिटी सदस्य के नारायणान व कमल रावत हे उपस्थित होते. मुंबई जिल्हा सचिव कॉ शैलेंद्र कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

वर्गसंघर्ष आज स्पष्ट होत असून धर्म जात भाषा याचा वापर श्रमिक वर्गामध्ये फूट पाडण्यासाठी केला जात आहे. श्रमिक वर्गाचे होत असलेले शोषण, वरकड मूल्य, या सर्वां संदर्भात उपस्थित प्रतिनिधिना संक्षिप्त मार्गदर्शन केले. मार्क्सवाद लेनीनवाद जिंदाबाद, समाजवाद जिंदाबाद, या घोषणासह अभिवादन करण्यात आले.

05/05/2026

https://www.facebook.com/share/18o8mKT6iN/

Today marks the 208th birth anniversary of Karl Marx, the man who gave socialism a scientific foundation. Marx revolutionized the conception of world history and elucidated the relationship between capital and labour, laying the grounds for scientific socialism and the movement to overthrow capitalist society and liberate the modern proletariat, and thereby to end class rule, servitude, and exploitation. From Paris to Petrograd to Punnapra-Vayalar, his ideas have guided and galvanized revolutionary action to transform society. Marx's name will endure through the ages, and so also will his work.

Photos from CPIM Mumbai's post 02/05/2026

भायंदर पश्चिम में सी आई टी यू CITU संलग्न म्युनिसिपल कामगार एकता यूनियन कार्यालय का उद्घाटन और मे दिन का कार्यक्रम
In Bhayandar West, the inauguration of the CITU-affiliated Municipal Kamgar Ekta Union office and the program of May Day.

Photos from CPIM Mumbai's post 02/05/2026

May day procession of NaviMumbai held at Vashi yesterday.

02/05/2026

May Day procession organised by CITU-VasaiVirar at Nalasopara.

सी.आय.टी.यू. वसई-विरार के ओर से
नालासोपारा में मई दिवस की जुलूस

02/05/2026

Joint May Day procession in Mumbai of various trade unions!

Photos from CPIM Mumbai's post 06/04/2026

माकपच्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या आवाहनानुसार बुवाबाजी–भोंदुगिरीच्या विरोधात माकपचे मुंबईत जबरदस्त आंदोलन

अंधेरी – नालासोपारा – बेलापूर येथे संतप्त निदर्शने

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व वसईचे तहसीलदार यांना निवेदन

बुवाबाजी करणाऱ्या व त्यात सामील असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सर्व गुन्हेगारांवर कारवाई तसेच 39 आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समितीने केले होते.

या आवाहनानुसार मुंबईत आज अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिम,नालासोपारा, बेलापूर स्टेशन येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना राज्यस्तरीय निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख मागणी अशोक खरात वर कठोर काइवाई करा तसेच बुवा बाजी व भोंदुगिरीच्या प्रवृत्तीला साथ देणार्‍या 39 आमदारांचे राजीनामे घ्या या होत्या.

मुंबई शहर च्या निवासी जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी माकपचे मुंबई जिल्हा सचिव शैलेन्द्र कांबळे व पश्चिम उपनगर तालुका समिती सदस्य अन्थोनी ग्रॅब्रियल व दिनेश जाधव हे उपस्थित होते. निवेदनावर चर्चा करीत मागण्यानवर त्वरित कार्‍यवाही करावी व निवेदन राज्य सरकारला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

पश्चिम उपनगर पट्ट्यात अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिम येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. यात ८०-९० स्त्री पुरुषांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पश्चिम उपनगर तालुका समितीचे सचिव कॉ चंद्रकांत बोजगर हे होते.

बुवाबाजी भोंदुगिरी के खिलाफ आम जनता एक हो’, अशोक, खरात वर कठोर कारवाई करा, अशोक खरात च्या समर्थांनार्थ व बुवाबाजीच्या समरेथांर्थ असणार्‍या ३९ लोकप्रतींनिधीचा राजीनामा घ्या, वैज्ञानिक संविधान के देश मे बुवाबाजी भोंदुगिरी नही चलेगी, या घोषणांनी अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरातील हजारो नागरिकांचे फक्त लक्ष वेधले नाही तर त्यांना या समस्यांवर विचार करण्यास भाग पाडले.

सदर आंदोलनाला पश्चिम तालुका समिती सदस्य व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉ अंजु दवे, सीआयटीयू चे नेते कॉ राजेंद्र जाधव, डीवायएफआय चे नेते दीपक विश्वकर्मा यांनी संबोधित केले.

कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव चंद्रकांत बोजगर यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शन ज्येष्ठ कामगार नेते, सीआयटीयू चे राज्य सचिव व वैज्ञानिक डॉ विवेक मोंटेरो यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्या मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना प्रखर प्रश्न विचारले. डॉ नरेंद्र दाभोळकर यांना मारणार्‍या प्रवृत्ती आज भोंदू – बुवाबाजीला चालना व राजकीय आश्रय देत असल्याचे सांगत संविधानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्वांवर आणि प्रामुख्याने या अवैज्ञानिक विचारसरणी वर हल्ला चढवत याला संपूर्णपणे हाणून पाडण्याचे आवाहन केले.

यावेळी पक्ष जिल्हा समिती सदस्य कॉ. के नारायनण, कॉ. कमल रावत, तालुका सदस्य रुहुल अमिन, अन्थोनी ग्रॅब्रियल, रशिदा सय्यद, माधुरी बोजगर, आदर्श विद्यालय शाखा सचिव रमेश शिगवन हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी पक्षाचे मुंबई जिल्हा सचिव कॉ. शैलेन्द्र कांबळे यांनी सरकारच्या बुवाबाजी भोंदुगिरीला आश्रय देणाच्या विरोधात बोलत सरकारला यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. जादूटोणा विरोधी कायदा फक्त कागदावर ठेवला असून तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागेल. कायदा बनण्यासाठी देखील डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. पुन्हा तसा संघर्ष आपल्याला या प्रवृत्ती विरोधात करावा लागणार असल्याचे आणि त्या संघर्षात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले. या नंतर जबरदस्त घोषणांसह कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला.

नालासोपारा येथील शिर्डी नगर येथे माकपच्या आवाहनानुसार निदर्शने घेण्यात आली. यात एकूण २५-३० लोका व प्रामुख्याने अर्थात 22 महिलांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माकप पश्चिम उपनगर तालुका समिती सदस्य कॉ. मुकेश शर्मा यांनी केला. अनिस चे कार्यकर्ते संदेश घोलप यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन माकपच्या राज्य समिती सदस्य कॉ. प्रीती शेखर यांनी केले. यावेळी वसई चे तहसीलदार दीपक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. कॉ. मुकेश शर्मा, कॉ कांती पद्मशाली, कॉ राजा भारसाकले यांनी निवेदन देऊन चर्चा केली.

बेलापूर स्टेशन च्या बाहेर देखील संतप्त निदर्शने करण्यात आली. यात २०-२५ लोकांचा सहभाग होता. जबरदासत घोषणा देण्यात आळया. पक्ष जिल्हा कमिटी सदस्या कॉ रेखा देशपाडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कॉ राजीव देशपांडे व कामगार व महिला नेत्या कॉ त्रीशीला कांबळे यांनी देखील सरकारच्या भोंदुगिरीला समर्थन देणाच्या विरोधात आणि जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी आपल्याला जबरदासत संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगत या संघर्षात ३९ लोकप्रतिनिधी व अधिकार्यान्न्वर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

#अंधश्रद्धा_विरोधात_महाराष्ट्र

06/04/2026

06/04/2026

भोंदू बाबा अशोक खरात का समर्थन करने वाले 39 आमदार और सरकारी अधिकारियों के खिलाफ मुकदमा चलाएं!

अंधश्रद्धा विरोधी कानून का कड़ाई से पालन सुनिश्चित करें!!

निषेध प्रदर्शन

सोमवार, 6 अप्रैल 2026
शाम 6:30 बजे
शिरडी नगर रिक्शा स्टैंड, नालासोपारा पूर्व

भारत की कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)
सीपीआईएम वसई-विरार विभाग समिति

20/03/2026

महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारताच्या कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने लाडवली, महाड येथे मानवी हक्क परिषदेत बोलताना लोकशाहिर संभाजी भगत

20/03/2026

Chavdar Tale Satyagraha Shatabdi Karyakram

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Janshakti MARG
Mumbai
400013