Vidhayak Bharti

Vidhayak Bharti

Share

'Vidhayak Bharti' is a rights-based, non-profit working for the promotion and preservation of child rights and child protection in society.

Photos from Vidhayak Bharti's post 01/06/2026

माहेर वाशिन मेळाव्यात चला पालकत्व समृद्ध करूयात...
या भूमिकेतून बाल गृहातून बाहेर पडल्यावर लग्न झालेल्या मुलींना हक्काचे माहेर मिळावे म्हणून गेल्या ४ वर्षापासून माहेर वाशिन मेळावा आयोजित करण्यात येतो #सनाथ_फाउंडेशन च्या #गायत्री यांच्या पुढाकाराने ही परंपरा सुरू झालीय.
या निमित्ताने ४०० हून अधिक मुली आपल्या मुलांसोबत माहेर पण अनुभवण्यासाठी एकत्रित मिरज इथे जमल्या आहेत.
एकट्या मुलींचे प्रश्न फारच गंभीर आहेत त्यात त्यांना कुटुंबातून साथ मिळेलच असे नाही या मुलींसाठी ही हक्काची जागा म्हणून या मेळाव्यासाठी मुली वाट पाहत आवर्जून येत असतात.
कुटुंबातील वातावरणात राहता न आल्यामुळे आपल्या मुलांच्या संगोपनात अनेक अडचणी या मुलींना येत आहेत.
म्हणूनच त्यांच्या सोबत पालकत्व या विषयावर #विधायक_भारतीचे #संतोष_शिंदे यांनी त्यांच्यात मिसळून या विषयावर सकारात्मक संवाद साधला.
जिवंत उदरहरणे घेत छान चर्चा रंगली. अनेक माहेर वाशिन मुलींनी या संवादाचा निश्चित उपयोग करून घेऊ यासाठी तयारी दाखवली.
विशेष म्हणजे अनेक मुलींनी आपल्या कुटुंबातील सह जीवनाच्या चांगले आणि वाईट अनुभव शेअर केले.
या सर्व मुलींनी #बाबांची_कार्यशाळा घेण्याची विनंती केलीय
लवकरच त्याचे नियोजन करण्यात येईल
सर्व माहेरवाशीन मुलींचे #धन्यवाद! 🙏

Santosh Shinde Ankita Shivgan Leela Patade Snehal S S Rane Pradnya Kamble Madhura Ganesh Vidhayak Bharti

01/06/2026



Santosh Shinde Ankita Shivgan Leela Patade Snehal S S Rane Pradnya Kamble Madhura Ganesh Vidhayak Bharti

31/05/2026



Santosh Shinde Ankita Shivgan Leela Patade Snehal S S Rane Pradnya Kamble Madhura Ganesh Vidhayak Bharti

Photos from Vidhayak Bharti's post 29/05/2026

शुक्रवार: 29 मे, 2026
चिल्ड्रेन एड सोसायटीच्या शतक महोत्सव कार्यक्रमातील डोंगरी बालगृह / निरीक्षण गृह येथील Donor appreciation ceremony मध्ये
• बाल न्याय मंडळ, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या अध्यक्षा मा. पांडुळे मॅडम आणि मा. चव्हाण मॅडम,
• जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई शहराचे सचिव मा. पवनकुमार तापाडिया सर,
• डोंगरी पोलीस ठाण्याचे व. पो. नि. बांगर सर,
• चिल्ड्रेन एड सोसायटीचे मुख्य सचिव मा. भावसार सर,
• JSW foundation च्या एज्युकेशन हेड मा. सविता मुंढे मॅडम,
• प्रिझन मिनिस्ट्रीचे फादर,
• ग्लोबल फॉउंडेशनचे मा. हबीब सर,
• अधिक्षक मा. राहुल कंठीकर सर
या मान्यवरांच्या उपस्थितीत डोंगरी बालगृह/निरीक्षण गृहासोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना आजच्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विधायक भारतीतर्फे लीला पाताडे आणि स्नेहल राणे कार्यक्रमात सहभागी होते.
•••
Santosh Shinde Ankita Shivgan Leela Patade Snehal S S Rane Pradnya Kamble Madhura Ganesh Vidhayak Bharti Children's Aid Society, Mumbai

Photos from Vidhayak Bharti's post 25/05/2026

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सन्माननीय अध्यक्ष आणि सदस्यांचे प्रशिक्षण आज रत्नागिरी इथे घेताना संतोष शिंदे सर...
बाल हक्क आयोग म्हणून काम करताना मुलाच्या संदर्भातील विविध कायदे आणि या कायद्याच्या अंमलबजावणीत आयोगाची भूमिका यावर सविस्तर मांडणी करण्यात आली. आज पूर्ण दिवस यावर चर्चा झाली.

24/05/2026
न्याय इतका SLOW का? | Fast Track Court चं सत्य | My Samashti | Podcast 23/05/2026

https://youtu.be/XmRT3gook_w?si=2kVvAhZgqs493cVZ
Santosh Shinde Ankita Shivgan Snehal S S Rane Madhura Ganesh Leela Patade Pradnya Kamble Vidhayak Bharti

न्याय इतका SLOW का? | Fast Track Court चं सत्य | My Samashti | Podcast मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळायला इतका उशीर का होतो?Fast Track Courts खरंच fast आहेत का?POCSO कायदे असूनही अने.....

19/05/2026

मुलांसोबत घडत असलेल्या घटना पाहता आपण सर्वांनी एकत्रित पुढाकार घेण्याची वेळ आलीय
।। जबाबदारी घेऊयात ।।
।। पुढाकार घेऊयात ।।
Santosh Shinde Snehal S S Rane Leela Patade Madhura Ganesh Pradnya Kamble Ankita Shivgan

16/05/2026

मुलांसोबत घडत असलेल्या घटना पाहता आपण सर्वांनी एकत्रित पुढाकार घेण्याची वेळ आलीय
।। जबाबदारी घेऊयात ।।
।। पुढाकार घेऊयात ।।
Santosh Shinde Snehal S S Rane Leela Patade Madhura Ganesh Pradnya Kamble Ankita Shivgan

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Mumbai
400034