Governor of Maharashtra

Governor of Maharashtra

Share

The Governor of Maharashtra is the Constitutional Head of State of Maharashtra and exercises power

01/06/2026

The State Foundation Days of Sikkim and Goa were celebrated through cultural performances at Maharashtra Lok Bhavan today in the presence of Maharashtra Governor Jishnu Dev Varma.

Photos from Governor of Maharashtra's post 01/06/2026

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोक भवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते लोकनृत्यासह सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते.

The State Foundation Days of Sikkim and Goa were celebrated through cultural performances at Maharashtra Lok Bhavan today in the presence of Maharashtra Governor Jishnu Dev Varma.

Organised in collaboration with the Ratan Tata Maharashtra State Skills University, the programme featured students of the University presenting folk songs and traditional dances of Sikkim and Goa, showcasing the cultural heritage of the two States.

Speaking on the occasion, Governor Jishnu Dev Varma said that celebrating the State Foundation Days of different States provides an opportunity to appreciate their unique cultures and traditions and helps strengthen the spirit of national integration.

Vice-Chancellor of Ratan Tata Maharashtra State Skills University Dr. Apoorva Palkar, Joint Secretary to the Governor S. Ramamoorthy, Comptroller of the Governor's Households Dr. Nishikant Deshpande, and members of the Sikkim community residing in Mumbai for education and professional pursuits were present.

31/05/2026

प्रसिद्ध गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुखद आहे. सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यात माधुर्य होते, तरल भाव होता व पावित्र्य होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत थेट हृदयाला भिडणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना आहे. सुमन कल्याणपूर यांचे संगीत अजरामर आहे. राज्यातील जनतेच्या तसेच संगीत रसिकांच्या वतीने मी दिवंगत सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो.

The news of the passing of renowned singer Padmabhushan Suman Kalyanpur is deeply saddening. Suman Kalyanpur’s voice had sweetness, delicacy and purity. Every song she rendered had the rare ability to touch the hearts of listeners. With her passing, the world of music has lost a divine soul. Suman Kalyanpur’s music is immortal and will continue to inspire generations to come. On behalf of the people of Maharashtra and music lovers, I pay my tributes to the departed soul and convey my deepest condolences to her family members in this hour of grief.

Photos from Governor of Maharashtra's post 31/05/2026

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन मुंबई येथे अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

Maharashtra Governor Jishnu Dev Varma offered floral tributes to the portrait of Punyashlok Ahilyadevi Holkar on the occasion of her birth anniversary at Lok Bhavan, Mumbai.

30/05/2026

*विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प* *- राज्यपाल जिष्णू देव वर्मा*

*खारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ*

नवी मुंबई, दि. ३० (विमाका) : विज्ञान मानवी शरीराला बरे करण्याचे कार्य करते, तर अध्यात्म मन, आत्मा आणि जगण्याची इच्छाशक्ती बळकट करण्याचे सामर्थ्य प्रदान करते. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधला गेल्यास जीवनाकडे पाहण्याचा अधिक समग्र (होलिस्टिक) दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

खारघर येथील इस्कॉन (ISKCON) मंदिरात आयोजित ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ (HCHR) या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी इस्कॉन नवी मुंबईचे मंदिराध्यक्ष डॉ. सूर दास, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, भक्तिवेदांत कॉलेजचे संचालक डॉ. व्ही. सेवक दास, कॅल्विन सेउंगवॉन यी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, डॉ. विक्रम गोटा, डॉ. अमित जोशी, डॉ. रजनीश कामत, डॉ. अविनाश टिप्पणी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक, तज्ज्ञ डॉक्टर, कर्करोग रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, खारघर येथील इस्कॉन मंदिर हे केवळ दगड, सिमेंट आणि वाळूने उभारलेले बांधकाम नसून ते श्रद्धा, भक्ती आणि लाखो लोकांच्या प्रार्थनांचे प्रतीक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. स्वामी विवेकानंदांप्रमाणेच ‘भगवद्गीते’चा वैश्विक संदेश जगभर पोहोचविणाऱ्या इस्कॉनचे संस्थापक-आचार्य परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

भगवद्गीतेतील ‘आत्मा अमर आहे’ हा संदेश दुःख, संकट आणि निराशेच्या काळात मानवाला धैर्य, आशा आणि मानसिक बळ प्रदान करतो, असे सांगून राज्यपालांनी अध्यात्माच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

कर्करोग हे आज मानवजातीसमोरील एक गंभीर आरोग्य आव्हान असून जगभरात दरवर्षी सुमारे २ कोटी, तर भारतात १४ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे उपचारपद्धतीत मोठी प्रगती झाली असली, तरी कर्करोगाचा परिणाम रुग्णांच्या मानसिक, भावनिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही होत असतो. ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’ हा उपक्रम या सर्व पैलूंचा विचार करून रुग्णांना सर्वांगीण आधार देणारा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा उपक्रम भारताच्या समृद्ध ‘आयुष’ परंपरेवर आधारित असून त्यामध्ये आयुर्वेद, योग, ध्यान आणि वैदिक तत्त्वज्ञानाचा समावेश आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ॲक्टरेक’ (ACTREC) येथील आयुष केंद्राच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला हा कार्यक्रम कर्करोग रुग्ण, कर्करोगमुक्त झालेले रुग्ण (सर्व्हायव्हर्स) तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

देशभरातून मोठ्या संख्येने कर्करोग रुग्ण उपचारासाठी मुंबई आणि नवी मुंबई येथे येतात. अशा रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कर्करोग रुग्णालयांच्या परिसरात सुसज्ज व परवडणाऱ्या निवास सुविधांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे सांगून, यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने तसेच इस्कॉनसारख्या सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन नवी मुंबईचे मंदिर अध्यक्ष डॉ. सूर दास यांनी केले.

00000

--

30/05/2026

हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाली.

Photos from Governor of Maharashtra's post 30/05/2026

इस्कॉनच्या भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनतर्फे विकसित करण्यात आलेल्या समग्र कर्करोग उपचार पुनर्वसन केंद्र - ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज खारघर येथील इस्कॉन मंदिर परिसरात संपन्न झाले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते संगीतकार शशांक कट्टी यांनी तयार केलेल्या ‘कृष्ण संजीवनी’ या समग्र संगीत उपचार (Holistic Music Therapy) उपक्रमाचे संगीत ट्रॅक्स स्वरूपात लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला इस्कॉन मंदिर खारघरचे अध्यक्ष डॉ. सूर दास, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, भक्तिवेदांत कॉलेज ऑफ वैदिक एज्युकेशनचे संचालक डॉ. वैष्णवांग्री सेवक दास तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Governor Jishnu Dev Varma inaugurated the Holistic Cancer Healing Retreat created by the Bhaktivedanta College of Vedic Education at ISKCON temple at Kharghar Navi Mumbai.

The Governor also launched the holistic music therapy 'Krishna Sanjeevani' created by musician Shashank Katti in the form of music tracks.

Temple President of ISKCON Kharghar Dr Sur Das, former MP Ramsheth Thakur, former MP Dr Sunil Gaikwad, Director of Bhakti Vedanta College of Vedic Education Dr Vaishavanghri Sevak Das, and others were present.

Photos from Governor of Maharashtra's post 30/05/2026

हेतू चॅरिटेबल ट्रस्ट व डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेस ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मालाड मुंबई येथे संपन्न झाली.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग महिलांना शिलाई मशीन, दृष्टिहीन व्यक्तींना AI स्मार्ट चष्मे, व्हीलचेयर, लॅपटॉप वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती ( सेवानिवृत्त) के के तातेड, हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखब चंद जैन, उद्योजक प्रवीण कोठारी, देवेंद्र जैन, नरेंद्र राठी, पी.जी. तापडिया आदी उपस्थित होते.

Maharashtra Governor Jishnu Dev Varma presided over the Summit, jointly organized by Hetu Charitable Trust and the District Legal Services Authority at Malad, Mumbai.

The Governor distributed sewing machines to divyang women, AI-powered smart glasses to visually impaired persons, wheelchairs, and laptops to beneficiaries as part of efforts to promote empowerment and self-reliance among Divyang citizens.

Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha, Justice Shyam Chandak and Justice Makarand Karnik, judges of the Bombay High Court, Justice (retd.) K. K. Tated, Chairman, Committee to Monitor Animal Welfare Laws, Secretary of Hetu Charitable Trust Rikhab Chand Jain, industrialists and donors Praveen Kothari, Devendra Jain, Narendra Rathi, and P. G. Tapadia, were present.

30/05/2026

'हेतू चॅरिटेबल ट्रस्ट' आणि 'विधी सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर जिल्हा' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग महोत्सव कार्यक्रमामध्ये राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर्स, महिलांना शिलाई यंत्रे, एआय (AI) स्मार्ट ग्लासेस आणि लॅपटॉप्स वितरीत करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सोबत दिलेल्या लिंक वरून पाहता येईल

Maharashtra Governor Jishnu Dev Varma will preside over the programme of distribution of Wheel Chairs, Sewing Machines, AI Smart Glasses and laptops to divyang persons at 1130 hrs on Saturday, 30th May 2026. The programme has been organised by Hetu Charitable Trust.

https://www.youtube.com/live/p5dhWDgMtJ0?si=NI2E7RUmMszoBcPX

29/05/2026

Maharashtra Governor Jishnu Dev Varma visited the Shrimad Bhagwat Katha Mahayajna Satsang organised on the occasion of Purushottam Maas at Jogeshwari, Mumbai.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Raj Bhavan, Malabar Hill
Mumbai
400035