03/10/2026
नांदेड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे नवा मोंढा येथील कार्यालयात ७ ऑक्टोंबर भारताचे निवडणुक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार हटाव साठी महामोर्चा काढण्यांत येणार आहे. या मोर्चाचे पूर्व नियोजनासाठी ऑल इंडिया आघाडीची बैठक खा.रविंद्र चव्हाण साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब,शहर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर,शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील बारसे, सीपीआय चे कॉ प्रदीप नागापूरकर,जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, सुरेशदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ पावडे, महानगर अध्यक्ष माजी उपमहापौर नगरसेवक अब्दूल गफ्फार साहेब, माजी उपमहापौर आनंद चव्हाण साहेब,नगरसेवक मुन्ना भाई अब्बास,शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम,सीपीएम विनोद गोविंदवार, राष्ट्रवादीचे तातेराव पाटील आलेगांवकर,महानगर प्रमुख मनोजयादव, सीपीएम कॉ गंगाधर गायकवाड, तालुकाध्यक्ष उमरी राजू पाटील बोळसेकर,सुरज शिंदे,गणेश कोकाटे आदी उपस्थित होते.