Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal

Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal, Government Organization, Adivasi Vikas Bhavan, 2nd floor, Near Gadkari Chowk, PIN:, Nashik.

01/04/2025

शबरी वित्त विकास महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा अभ्यास दौरा संपन्न 🌱

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे समन्वयक श्री. मच्छिंद्र पाटील यांच्या नेतृत्वात, शबरी वित्त महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारीगण आदिवासी विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अभ्यास दौऱ्यावर गेले. हा दौरा महाराष्ट्रातील बोरगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शासकीय योजनांचा प्रभाव आणि त्यांचे कार्यान्वयन यावर सखोल चर्चा करण्यात आली.

दौऱ्यात अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आदिवासी विकासाचे विविध पैलू पाहिले आणि सध्याच्या योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती समजून घेतली. यावेळी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांसोबत संवाद साधून, विकासासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करण्यात आले.

ही पुढाकार आदिवासी समाजाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी, सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Photos from Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal's post 02/03/2025

🌿 *शबरीच्या अधिकारी कर्मचार्यांनी अनुभवले आदिवासी बांधवांची जीवनशैली* 🌿

*एक दिवस आदिवासी बांधवांसमवेत उपक्रम* - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गावात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचार्यांनी २० आदिवासी कुटुंबांसमवेत एक दिवस व्यतीत केला. या उपक्रमामध्ये, आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेत, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रसंगांचा अभ्यास केला.

*कार्यशाळेचा एक भाग:*
शासकीय योजनांची माहिती, जीवनमान आणि त्यात होणारे बदल यावर चर्चा करण्यात आली. शासकीय प्रणालीमध्ये काम करताना, या अनुभवांचा उपयोग अधिकारी वर्गाला होईल, असे सांगितले. आदिवासी बांधवांसोबत एक दिवस घालविल्यामुळे, त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मिळाली.

*प्रतिक्रिया:*
💬 *"कार्यालयात काम करत असताना आपण ज्यांच्यासाठी काम करत आहोत त्या क्षेत्रावर असलेल्या लोकांची जाणिव व्हावी. एक दिवस आदिवासी बांधवांसोबत राहिल्याने अधिकारी वर्गाला काम करताना सोपे होईल."*
- लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

💬 *"आदिवासी बांधवांच्या जीवनातील समस्या आणि उपाय याची माहिती मिळाल्यामुळे भविष्यात काम करताना हा अनुभव मदतीला येईल."*
- निलेश खोंडे, व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ

Photos from Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal's post 14/02/2025

🌱 *स्थलांतरित कातकरी समाजाच्या आदिवासी बांधवांची आत्मनिर्भरतेकडे एक मोठं पाऊल!* 🌱

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे स्थलांतरित कातकरी समाजाच्या आदिवासी बांधवांना कर्ज देण्यात आले आणि त्यांनी त्या कर्जाचा उपयोग करून स्वतःची *वीट भट्टी* सुरू केली. आता हे आदिवासी बांधव, जे कधी स्थलांतरित होते, ते कायमस्वरूपी स्थानिक होऊन एका व्यवसायाचे *मालक* बनले आहेत.

हे एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे जे दर्शवते की योग्य मार्गदर्शन आणि मदतीने समाजाच्या प्रगतीचा मार्ग सुकर होऊ शकतो. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आपल्या आदिवासी बांधवांना स्वावलंबनाच्या दिशेने नेण्याचे कार्य करत आहे. 👏💚

या यशस्वी उपक्रमामुळे कातकरी समाजाचे भवितव्य उज्ज्वल आहे, आणि हे त्यांचं कर्तृत्व व स्वावलंबन सिद्ध करतो.

Photos from Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal's post 31/01/2025

राज्यभरात शबरीचे अधिकारी तपासणार लेखे
सहकार्य न करणाऱ्यांवर होणार कारवाई;

नाशिक

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तर्फे शेतकरी उत्पादक संघटनांना दिलेल्या निधी विनियोगाबाबत शबरी महामंडळाचे अधिकारी स्थळ तपासणी करून संघटनांचे कामे व्यवस्थित सुरू आहे का याबाबत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या स्थळ तपासणीमध्ये ज्या संघटनांचे लेखे नियमित असणार नाही तसेच ज्या संघटना कार्यशाळेला उपस्थित राहणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ च्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिला आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या राज्यभरात मुख्य कार्यालयासह १२ शाखा कार्यालये आहेत. राज्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १५६ शेतकरी उत्पादक संघटनांना निधी वितरण करण्यात आलेले आहे. या शेतकरी उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींना वेळोवेळी प्रशिक्षण आणि कार्यशाळा महामंडळाच्या मुख्यालयात महामंडळामार्फत देण्यात येत असते. त्यांचा व्यवसाय वृद्धीसाठी महामंडळाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत असते. या शेतकरी उत्पादक कंपन्या निधीचा विनियोग कसा करतात. खातेवहीचे नियमन आहे का, लेखा अद्यावतिकरण, अंदाजपत्रकात नमूद केलेल्या बाबींनुसार निधीचा विनियोग झालेला आहे का त्यासोबतच महामंडळाने दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित आहे का या गोष्टींची माहिती घेण्यासाठी शबरी महामंडळाचे अधिकारी वेळोवेळी फील्ड व्हिजिट करत आहेत. स्थळतपासणी मध्ये निधी वितरण केलेल्या शेतकरी उत्पादक संघटनांची सद्यस्थिती, खातेवही, लेखापरीक्षण, निधीचा विनियोग कसा केला आहे याची खात्री करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

चौकट
शबरी महामंडळामार्फत लेखे अद्यावतीकरण कार्यशाळा नुकतीच मुख्यालयात पार पडली. या कार्यशाळा नियमित घेण्यात येणार असून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फक्त कर्ज वितरण न करता त्यांचा विनियोग साचेबद्ध पद्धतीने होण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे.

Photos from Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal's post 13/01/2025

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या दैनंदिनी, कॅलेंडर आणि शुभेच्छापत्र यांचे अनावरण आदिवासी विकास मंत्री मा. प्रा. डॉ. अशोक उईके, आ. राजेश पाडवी, आ. किरण लहामटे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra DGIPR Ministry of Tribal Affairs, Government of India Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal Mla Ashok Uike Leena Bansod Msrlm Tribal Development Department, Government of Maharashtra ShabariNaturals Cmo, Maharashtra Jual Oram

28/12/2024

माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी मा.व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या हस्ते शबरी नॅचरलच्या प्रीमियम उत्पादनांची बास्केट भेट देण्यात आली.

यावेळी महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, नाशिक शाखा व्यवस्थापक मोनाली शिंदे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर आदी उपस्थित होते.

Deepak Vasant Kesarkar Leena Bansod Maharashtra DGIPR Ministry of Tribal Affairs, Government of India Tribal Development Department, Government of Maharashtra ShabariNaturals Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal Shabari Adivasi Mahamandal Mla Ashok Uike

Photos from ShabariNaturals's post 27/12/2024

Devotion, purity, and care inspire us at Shabari Naturals. Just as Shabari ensured the best for Lord Rama, we handpick every ingredient with the same promise of quality and tradition.

Because when it comes to honoring trust, only the essence of tradition and quality will do.

27/12/2024

Discover the timeless legacy of the Warli tribe—a 3000-year-old tradition born in the heart of Maharashtra. 🌿🎨 Once painted on humble mud walls, Warli art celebrates nature, daily life, and spiritual harmony. Crafted with natural pigments and simple tools, these intricate paintings tell stories of rituals, folklore, and the unity of the Warli community. From village walls to global galleries, this art form continues to thrive, symbolizing simplicity, sustainability, and the enduring spirit of the Warli people. 🌾

19/12/2024

तंत्रज्ञानानुसार अद्ययावत व्हा
व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या सूचना

Ministry of Tribal Affairs, Government of India Tribal Development Department, Government of Maharashtra Maharashtra DGIPR

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Adivasi Vikas Bhavan, 2nd Floor, Near Gadkari Chowk, PIN:
Nashik
422002