22/01/2026
सप्रेम नमस्कार🙏
सर्व कामगार बंधू व भगिनी यांना कळवण्यात आनंद होतो की आज दिनांक २२.०१.२०२६ रोजी सर्व जमा झालेले जुने कॅलेंडर हे गोदावरी पल्प & पेपर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड, लखमापूर ता. दिंडोरी या कंपनीत रीसायकल साठी जमा करण्यात आलेत.
`हा उपक्रम गोदावरी पल्प आणि पेपर लिमिटेड यांना पण आवडला व त्यांनी आपल्याला तसे पत्र पण दिले.`
*प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्या कामगार व अधिकारी बंधू व भगिनी यांनी आम्हाला या कार्यास सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही शतशः आभारी आहोत🙏🏻.*
*अखिल भारतीय मराठा महासंघ*
*एच. ए. एल. ओझर टाउनशिप*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
13/01/2026
ओझर टाउनशिप येथील अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा आयोजित राजमाता जिजाऊ यांची जयंती दि. १२ जानेवारी रोजी लोखंडे हॉल एच. ए. एल. टाऊनशिप मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. भैयासाहेब देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिम पूजन झाले.
गजानन फासाटे यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिजाऊंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतून रयेते चे स्वराज्य उदयाला आले व त्याच बरोबर जिजाऊ यांच्या कार्यकाळची माहिती दिली.
कामगार संघटने चे अध्यक्ष अनिल मंडलिक, प्रशांत आहेर, सचिन ढोमसे, दीपक टावरे यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून दीपक पाटील, रोशन कदम, अविनाश भंडारे, गिरीश वलवे, गिरीश पाटील, राकेश गर्जे, विश्वनाथ पगार, कमलेश बनकर, प्रमोद गोरे, विकास जाधव, राजेंद्र मोरे, सचिन धोंडगे, भूषण रौंदळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक शिंदे, ज्ञानेश्वर गुंड, कैलास रिकामे, प्रदीप दाते, गजानन फसाटे, विजय गायके, जिभाऊ पाचोरे, राहुल जाधव, गणेश चांदगुडे, अरुण शिंदे, नवनाथ कोंढाळकर आदी कार्यकारणी प्रयत्न केले.
13/01/2026
अखिल भारतीय मराठा महासंघ एच. ए. एल. ओझर टाउनशिप शाखेच्या वतीने मराठा दर्पण दिनदर्शिका २०२६, विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा ओझर येथील शिंदे लॉन्स ला उत्साहात साजरा करण्यात आला. सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्री. अजित शिरसाठ, श्री. गणेश क्लिनिक ओझर यांनी उपस्थिती दिली व मार्गदर्शन केले.
श्री. भैय्यासाहेब देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपिठावर मार्गदर्शकांसह श्री. यतीन कदम, श्री. प्रशांत आहेर, श्री. सचिन ढोमसे, श्री. संजय मोरे, श्री. दीपक टावरे, श्री. अशोक कदम, श्री. दिपक पाटील, श्री. अशोक शिंदे, श्री. मनोहर खालकर, श्री. सूर्यभान ठाकरे व सौ. योगिता कदम होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
शाखा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली.
डॉ. अजित शिरसाठ यांनी आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी व मुलांना मोबाईल पासून दूर ठेऊन त्यांना खेळांमध्ये रुची वाढवावी, एकाग्रता कशी वाढवावी असे उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित केले.
श्री. यतीन कदम, श्री. प्रशांत आहेर, श्री. सचिन ढोमसे, श्री. अशोक कदम, श्री. संजय मोरे, श्री. दीपक टावरे यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व मार्गदर्शन केले
सेवानिवृत्त सभासदांना शाल, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सर्टिफिकेट, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
भैय्यासाहेब देशमुख यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र वाळुंज यांनी केले.
श्री. गजानन फासाटे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी टाउनशिप शाखेचे अशोक शिंदे, कैलास रिकामे, प्रदीप दाते, ज्ञानेश्वर गुंड, गजानन फासाटे, विजय गायके, राहुल जाधव, अरुण शिंदे, गणेश चांदगुडे, संदीप झोमन, मंगेश चव्हाणके, जीभाऊ पाचोरे आणि कार्यकारणीने प्रयत्न केले.
26/09/2025
अखिल भारतीय मराठा महासंघ एच. ए. एल. ओझर टाउनशिप शाखेतर्फे माथाडी कामगार संघटनेचे प्रणेते, *मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे. अखिल भारतीय मराठा महासंघ संघटनेचे संस्थापक*
*_स्व. आ. अण्णासाहेब पाटील_* यांची जयंती २५ सप्टेंबर रोजी गुरुवार सकाळी लोखंडे हॉल एच. ए. एल. टाऊनशिप मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. भैय्यासाहेब देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
प्रशांत आहेर खजिनदार एच.ए.एल. कामगार संघटना, सचिन ढोमसे मा. सरचिटणीस एच.ए.एल. कामगार संघटना, एच. ए. एल. क्रेडिट सोसायटी चे चेअरमन संजय मोरे यांनी आपले मनोगत व मार्गदर्शन केले.
उमेश मोरे व प्रवीण मोकाशी यांनी सूत्रसंचलन व सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक शिंदे, कैलास रिकामे, प्रदीप दाते, विजय गायके, गजानन फासाटे, जिभाऊ पाचोरे व कार्यकारणीने प्रयत्न केले.
20/05/2025
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष (क्रीडा) श्री दीपक वसंतराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा २०२३-२४ चा मनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला त्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर टाउनशिप शाखेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पाटील कुटुंबाचे हार्दीक अभिनंदन व दीपक भाऊ यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
💐🌹🌹💐💐🌹💐🌹💐🌹💐
17/05/2025
अखिल भारतीय मराठा महासंघ एच. ए. एल. ओझर टाउनशिप शाखेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
एच. ए. एल. ओझर टाऊनशिप मधील किनो थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत नाशिक येथील सुप्रसिद्ध सुशील आय केअर तर्फे मोफत नेत्र तपासणी, नामांकित अपोलो हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी शिबिर, अष्टांग आयुर्वेद तर्फे नाडी परीक्षण शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता दीप प्रज्वलन नंतर सुशील आय केअर चे डॉ शरद पाटील सर यांनी नेत्र तपासणी व नेत्र काळजी कशी घ्यावी या संदर्भात उपयुक्त माहिती व मार्गदर्शन दिले, कार्यकमाचे प्रमुख पाहुणे वजिंदर सिंह GM फायनान्स यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर आधारित छावा सिनेमा दाखवण्यात आला. कार्यक्रमासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल अण्णा मंडलिक, सोसायटी चेअरमन संजय मोरे, कामगार कल्याण संस्थेचे जनरल सेक्रेटरी दीपक टावरे, रोशन कदम, अशोक कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अशोक शिंदे, कैलास रिकामे, दीपक टावरे, ज्ञानेश्वर गुंड, प्रदीप दाते, गजानन फासाटे, विजय गायके, राहुल जाधव, उमेश मोरे, जिभाऊ पाचोरे, अरुण शिंदे, रुपेश सनेर, जितेंद्र वाळुंज, भरत आहेर व आदी कार्यकारणीने परिश्रम घेतले.
17/05/2025
*अखिल भारतीय मराठा महासंघ एच. ए. एल. ओझर टाउनशिप शाखेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*
एच. ए. एल. ओझर टाऊनशिप मधील किनो थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत नाशिक येथील सुप्रसिद्ध सुशील आय केअर तर्फे मोफत नेत्र तपासणी, नामांकित अपोलो हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी शिबिर, अष्टांग आयुर्वेद तर्फे नाडी परीक्षण शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी साडेसहा वाजता दीप प्रज्वलन नंतर सुशील आय केअर चे डॉ शरद पाटील सर यांनी नेत्र तपासणी व नेत्र काळजी कशी घ्यावी या संदर्भात उपयुक्त माहिती व मार्गदर्शन दिले, कार्यकमाचे प्रमुख पाहुणे वजिंदर सिंह GM फायनान्स यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर आधारित छावा सिनेमा दाखवण्यात आला. कार्यक्रमासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल अण्णा मंडलिक, सोसायटी चेअरमन संजय मोरे, कामगार कल्याण संस्थेचे जनरल सेक्रेटरी दीपक टावरे, रोशन कदम, अशोक कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अशोक शिंदे, कैलास रिकामे, दीपक टावरे, ज्ञानेश्वर गुंड, प्रदीप दाते, गजानन फासाटे, विजय गायके, राहुल जाधव, उमेश मोरे, जिभाऊ पाचोरे, अरुण शिंदे, रुपेश सनेर, जितेंद्र वाळुंज, भरत आहेर व आदी कार्यकारणीने परिश्रम घेतले.
11/03/2025
*ओझर टाऊनशिप मराठा महासंघातर्फे महिला दिन उत्साहात साजरा*
अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा एच. ए. एल. ओझर टाऊनशिप शाखा आयोजित महिला दिनानिमित्त हळदीकुंकू सोहळा उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ. सरला जाधव या उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ. वैशाली निरगुडे या उपस्थित होत्या. व्यासपीठावर शोभा कदम, रोशनी पाटील, शुभांगी पाटील, जयश्री गोरे, धनश्री शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना वैशाली निरगुडे मॅडम यांनी महिलांनी स्वतःचे या आधुनिक युगात कसे संरक्षण केले पाहिजे व कुटुंब सांभाळत आपले करिअर कसे घडवावे आदी बाबत माहिती सांगून देशाचे जडणघडणं मध्ये महिलांचा विशेष असा सहभाग आहे असे उत्तम मार्गदर्शन केले. डॉ. सरला जाधव यांनी आज महिला सर्व क्षेत्रात काम करत आहेत त्याच बरोबर त्यांनी आपल्या कुटुंबाची व आपल्या शारीरिक स्वास्थ्य कसे उत्तम राहील याचे मार्गदर्शन केले. कुमारी स्वरा जाधव हिने जिजाऊ आणि महिला दिनानिमित छान असे व्याख्यान दिले.
कार्यक्रमात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळांच्या आयोजन करण्यात आले होते.
महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम झाला, वान वाटप झाले.
कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ. वंदना पाटील व सौ. वैशाली पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक शिंदे, कैलास रिकामे, प्रदीप दाते, ज्ञानेश्वर गुंड, गजानन फासाटे, विजय गायके, राहुल जाधव, अरुण शिंदे, रुपेश सनेर, मंगेश चव्हाणके, सचिन साळुंखे, संतोष भांगे व संपूर्ण कार्यकारिणी विशेष परिश्रम घेतले.
होम मिनिस्टर खेळ घेण्यासाठी जितेंद्र वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना पाटील व वैशाली पवार यांनी केले तर वैशाली पवार यांनी आभार मानले.