03/06/2026
बेजबाबदार चालकाचा व्हिडीओ व्हायरल, अन सिटीलिंकची तात्काळ कारवाई.
सिटीलिंक बससेवेतील एका चालकाचा बस चालवत असताना मोबाईलवर कॉन्फरन्स कॉलद्वारे संभाषण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर प्रकाराची सिटीलिंक प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याची भूमिका घेत संबंधित चालकाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत दिनांक २७/०५/२०२६ रोजी नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते शालीमार या मार्गावर धावणारी बस क्र. एम १५ जीव्ही ८०३३ या बसवर कामगिरीवर असणाऱ्या चालकाने बस चालविताना मोबाईलचा वापर केल्याचे निदर्शनास आले. ही बाब वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जाते. त्यामुळे संबंधित चालकाची कामगिरी तात्काळ बंद करण्यात आली असून पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सिटीलिंक प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. सर्व चालक व वाहकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतात. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी देखरेख अधिक प्रभावी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक सेवेमधील कोणतीही अनुचित बाब निदर्शनास आल्यास ती सिटीलिंक प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन देखील सिटीलिंकच्या वतीने करण्यात येत आहे.
03/06/2026
इंधन दरवाढ झाली असली तरी सद्यस्थितीत कोणतीही भाडेवाढ विचाराधीन नाही, सिटीलिंकचे स्पष्टीकरण.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन तसेच सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) प्रवासी भाडेवाढ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा विविध प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियामध्ये सुरू आहे. काही माध्यमांमधून यासंदर्भातील वृत्तेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
याबाबत सिटीलिंक व्यवस्थापन स्पष्ट करू इच्छिते की, सद्यस्थितीत प्रवासी भाडेवाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव अथवा निर्णय सिटीलिंक प्रशासनाच्या विचाराधीन नाही. इंधन दरवाढीमुळे संचालन खर्चात वाढ होत असली तरी प्रवासी भाडेवाढीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.
नागरिकांना व प्रवाशांना परवडणारी, सुरक्षित, विश्वासार्ह व दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हे सिटीलिंकचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रवासी भाडेवाढीबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्या व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून त्या वस्तुस्थितीशी सुसंगत नाहीत.
त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त प्रवाश्यांनी सिटीलिंक बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
28/05/2026
🌙✨ ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि च्या वतीने हार्दिक शुभेच्छा!
आपल्या जीवनात आनंद, शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो हीच सदिच्छा. 🌙🕌
28/05/2026
स्वातंत्रवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या विचारांमधून देशप्रेम, धैर्य आणि समर्पणाची प्रेरणा सदैव मिळत राहो.
27/05/2026
Your ride, our responsibility!
For route information, bus timings, and quick assistance, CITILINC is just one call away. 📞
Stay connected with Nashik’s smart public transport service and travel hassle-free every day!
📍 Route Queries
🕒 Bus Timings
📞 Helpline Support
20/05/2026
Don’t travel without a valid ticket or CITILINC bus pass! 🚌
For a safe, smooth, and hassle-free journey, always carry your valid ticket or bus pass while travelling.
Travelling without a ticket may lead to heavy fines and inconvenience to fellow passengers.
✅ Safe Travel
✅ Responsible Commuting
✅ Happy Journey with CITILINC
Follow CITILINC Nashik on social media for more updates and information.
18/05/2026
सोशल मिडियावरील व्सहायरल व्हिडीओ मागील सत्यता..!
सोशल मिडीयावर सिटीलिंक बस क्र. MH 15 GV 7995 चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये “सदर बसचा इन्श्युरन्स एक्स्पायर असून आणि अजून एक पण फाईन नाही आता किती दिवस झाले ते तुम्हीच ठरवा.” असे म्हटले आहे.
परंतु सदर व्हिडीओ फेक असून सदर व्हायरल व्हिडीओबाबतची सत्यता पुढीलप्रमाणे –
बस क्र. MH 15 GV 7995 चा २०२५ -२६ करिता काढण्यात आलेल्या इन्श्युरन्सची वैधता दि. ०१/०३/२०२६ पर्यंत होती. व त्याच दिवशी पुनश्च इन्श्युरन्स पॉलिसी अद्ययावत करण्यात आलेली आहे. गो डीजीट जनरल इन्श्युरन्स लि. ची हि पॉलिसी असून तिची वैधता दि. ०२/०३/२०२७ रोजी पर्यंत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सिटीलिंक बस क्र. MH 15 GV 7995 बाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कोणतेही तथ्य नाही.
तरी प्रवाश्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये..
कारण तुमचा विश्वास... हि आमची जबाबदारी...
16/05/2026
Honesty of Citilinc staff!
While traveling, a passenger's bag was left in the bus. But the honest driver, conductor and citilinc staff returned the said bag to the said passenger. A delighted passenger will therefore express his gratitude to the Citilinc staff.
#नाशिक
12/05/2026
🚍 Nashik is moving together with Citilinc!
A heartfelt thank you to all our passengers for making this journey successful.
📊 Total Ridership
🗓️ 1st April to 30th April 2026
👥 23,42,009 Passengers
Your trust inspires us to provide safer, greener and better public transport every day. 🌱✨
09/05/2026
तुमची एक सीट..कोणासाठी मोठा आधार ठरू शकते !
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुलांसह प्रवासी आणि दिव्यांग प्रवाशांना प्राधान्याने आसन देऊन प्रवास अधिक संवेदनशील आणि सुरक्षित बनवूया..!